कुत्र्याने खाणे नाकारणे ही कुत्र्याची इच्छा!!
कुत्र्याला दगड मारण्याची कृती, ओशाळुन लज्जित झालेल्या मनाची सर्वसाधारण प्रतिक्रिया होती.
माझे अन्न डावलल्याचा राग त्यातुन ध्वनीत होतो, अहंभाव आड आला. अन्यथा, खायला टाकुन तो निघुन गेला असता तरी काही फरक पडला नसता, तो खातोय की नाही याच्याशी काहीही देणे-घेणे नसले पाहीजे.
त्याच्याशी माणुसकीचा बादरायण संबंध जोडण्याचे कारण दिसत नाही.
ऊरलेले अन्न मुक्या प्राण्यांना देणे अथवा उकीरड्यावर फेकुन देणे, ही भारतीय खासीयत आहे. गरजेपुरते शिजवणे आम्हाला कधी माहीतच नसते.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
मी हा प्रसंग पाहातोय, हे त्या माणसाच्या लक्षात आलं होतं
हा कळीचा मुद्दा! आपण दिलेले अन्न कुत्रा (देखिल) नाकारतोय आणि मुख्य म्हणजे हे सारे कुणीतरी पाहतो आहे, यातून आलेल्या ओशाळलेपणातून त्याने दगड भिरकावले असावेत. अन्यथा (कुणी पाहणारे नसते तर) असे झाले नसते.
बाकी लिहिण्याची धाटणी आवडली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
क्षणापूर्वी, प्रेमानं त्या कुत्र्याला खाऊ घालणार्या त्या माणसाच्या हृदयातला माणूसकीचा, प्रेमाचा ओलावा खरा, की कुत्र्यानं पाठ फिरवताच त्यानं घेतलेलं रूप खरं?
दोन्ही खर आहे.
आपण एवढ प्रेमान आग्रह करुन खायला घालतोय पण हा खातच नाही हे अपेक्षाभंगाचे दु:ख तो दांडगाईने व्यक्त करतो आहे. दातृत्वाच्या गर्वाला त्या भुभु ने ठेच पोहोचवली.
एक माणुसः- यु यु यु यु
एक भुभु:- (मनात) हा माणुस आपल्याला एवढ प्रेमान कस काय बोलवतोय? हळूच दगड बिगड मारायचा विचार दिसतोय! छॅ नको जायला
माणुसः यु यु यु यु
भुभु:-(मनात) प्रेमान बोलावतोय तर जाव सगळी माणस काय सारखी नसतात. जाव कि नाही जाव?
माणुस- ( मनात) च्यायला हे कुत्तारड बी आपल्याला विचारत नाय दगड च घालतो. माजलय सालं.
भुभु जाण्याच्या इराद्याने पाउल उचलायला आणि त्याच्या दिशेने दगड यायला एकच वेळ. भुभु तेच पाउल पुढ घेउन कल्टी मारत सुटलो ब्वॉ याच्या तावडीतुन
भुभुगीत कार
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
माणसातली
विचार करण्यासारखी गोष्ट
मस्त! एकदम
+१
कळीचा मुद्दा
दोन्ही खरं