✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विंडोज व्हिस्टा मध्ये काही गेम्स चालत नाहीत त्यासाठी काय करावे? व्हिस्टा सोबत आणखी एक ओ. एस. कशी टाकावी?

न
निमिष सोनार यांनी
Mon, 01/25/2010 - 10:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3132 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

एकाच मशीनर

मि.इंडिया
Mon, 01/25/2010 - 10:39 नवीन
एकाच मशीनर दोन ओ.एस. चालतात का हे माहीत नाही. पण मी खूप पूर्वी दोन हार्ड डिस्क एका मशीनला लावल्या होत्या. दोन्हीवर वेगवेगळ्या ओ.एस. होत्या. मशीन बूट करताना हवी ती हार्ड डिस्क निवडून वापरता येते. मात्र चालू मशीनवर बदलता येत नाही. प्रदीप
  • Log in or register to post comments

चालतात

देवदत्त
Mon, 01/25/2010 - 10:55 नवीन
एक मशीनवर, एकाच हार्डडिस्क वर दोन ओएस चालतात. सविस्तर नंतर लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मि.इंडिया

vista दादागिरी करते

चन्द्रशेखर सातव
Mon, 01/25/2010 - 11:29 नवीन
सोबती साहेब, दोन ओ.एस. एकाच मशीन वर निश्चित चालतात,पण आधी vista ओ.एस.टाकली असेल तर ती XP किवा ९८ सारख्या जुन्या ओ.एस install करून देत नाही. थोडक्यात म्हणजे vista ओ.एस जुन्या ओ.एस वर दादागिरी करते.त्यावर उपाय म्हणजे vista काढून XP टाकणे आणि नंतर मग त्यातूनच दुसऱ्या drive वरती vista टाकणे.त्याहीपेक्षा जालीम उपाय म्हणजे vista टाकूच नका भिक्कार ओ.एस आहे ती! Windows 7 हि ओ.एस vista पेक्षा कैक पटींनी चांगली आहे. त्यामध्ये सगळी applications बिनबोभाट चालतात,speed पण उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

व्हिस्टा नंतर

देवदत्त
Mon, 01/25/2010 - 20:55 नवीन
सातव साहेब, ती व्हिस्टाची दादागिरी नाही. सर्वच विंडोजमध्ये तसे आहे. एखादी आवृत्ती टाकताना ती आवृत्ती आधीच्या आवृत्तीचे विंडोज स्थापित आहे का ते पाहते. पण नंतरच्या आवृत्तीबद्दल त्याला माहीत नसते म्हणून ती अडचण येते. विंडोज स्थापित करताना, Win95-> Win98->XP-> Vista -> Window 7 अशा क्रमाने कराव्यात. ------------------------------------------- दुपारनंतर पुन्हा प्रतिसाद लिहितोय. म्हणून प्रतिसादांची संख्या वाढवत नाही. इथेच अद्ययावत करतो. व्हिस्टा नंतर मायक्रोसॉफ्टने संगणक सुरू करायच्या प्रक्रियेत थोडा बदल केला, त्याची मला पूर्ण माहिती नव्हती, जी त्यांच्या संकेतस्थळावर मिळाली. पण क्रम तोच राहील. जास्त माहिती मायक्रोसॉफ्टकडूनच येथे मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर सातव

वेगवेगळे

दिपक
Mon, 01/25/2010 - 11:34 नवीन
वेगवेगळे पार्टिशन करुन तुम्ही वेगवेगळ्या ओ.एस. टाकु शकता. पण दुसरी ओ.एस. वापरण्यासाठी तुम्हाला पीसी रिस्टार्ट करावा लागेल. विस्टा मध्येच तुम्हाला विन्डोज एक्स्पी किंवा अन्य ओ.एस. वापरायची असेल तर विमवेयर वर्कस्टेशन चांगले टुल आहे. नीड फ़ॉर स्पीड विस्टावर चालण्यासाठी इथे दिलेले सोल्युशन ट्राय करुन पहा.
  • Log in or register to post comments

हे पहा

विकास
Mon, 01/25/2010 - 23:06 नवीन
एकाच संगणकावर दोन ओएस टाकण्यासंबंधीचा अनुभव येथे विस्तृत आहे तसेच तिथली चर्चा देखील अधिक माहीती देईल. अर्थात, त्यामुळे तुम्हाला हवे असलेले गेम्स त्यावर चालतील का ते माहीत नाही. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

विस्टा मधे एक एक्स पी मोड आहे

एक
Mon, 01/25/2010 - 23:08 नवीन
तो वापरून बघितला का? XP चा एक virtual machine तयार केलं जातं आणि ते विस्टावर चालू शकतं. हे मायक्रोसॉफ्ट नेच पुरवलं आहे त्यांच्या साईट वरून २ प्रोग्रॅम्स डाऊन्लोड करावे लागतील. विम्वेयर तर उत्तम सोल्युशन आहे..कुठलिही os चालवू शकता.
  • Log in or register to post comments

एकेक

टारझन
Tue, 01/26/2010 - 22:11 नवीन
एकेक कमेंट्स वाचून हहपुवा झाली =)) देवदत्तची कमेंट मात्र तथ्य असणारी आहे :)
  • Log in or register to post comments

आणखी

देवदत्त
Tue, 01/26/2010 - 22:31 नवीन
आणखी एक.. व्हिस्टा मध्ये गेमच्या EXE च्या Properties मध्ये काँपॅटीबिलिटी मोड मध्ये Win XP निवडून प्रयत्न करा. XP मध्ये चालणारे काही सॉफ्टवेयर व्हिस्टा मध्ये चालत नव्हते, त्यांना ह्या प्रकारे मी वापरण्याजोगे केले. VMWare, MS Virual PC मध्ये आपण आभासी संगणक तयार करू शकतो, जे पूर्णपणे खर्‍या संगणकाप्रमाणेच चालते. पण त्यात आपल्या संगणकाची मेमरी विभागली जाते. त्यामुळे नीड फॉर स्पीड किंवा तत्सम गेमकरीता चांगला वेग आणि कार्यक्षमता पाहिजे असेल खर्‍या संगणकावरच टाकावे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा