२४ जानेवारी. इंडियानापोलिस कोल्ट्स विरुद्ध न्युयॉर्क जेट्स. फुटबॉल म्हणजे पार्टी टाईम. तेव्हा पार्टी साठी चिकन विंग्ज.
साहित्य
१२ चिकन विंग्ज
२ टे. स्पून बटर
१/४ कप ऑल परपज फ्लोर
सॉस साठी
१ टे. स्पून फ्रँक रेड हॉट सॉस
३ टे. स्पून KC Masterpiece बार्बेक्यु सॉस (तुम्ही तुमच्या आवडीचे वापरु शकता)
किंवा
१ टे. स्पून बटर , वितळलेले
१ टे. स्पून व्हाइट व्हिनेगर
२-३ टी स्पून फ्रॅंक रेड हॉट सॉस
चिमुटभर मीठ
जोडीला सेलरी, ब्लू चीज ड्रेसिंग वगैरे आवडी प्रमाणे.
कृती
ओवन ४२५ F ला गरम करत ठेवा.
चिकन विंग्जचे जॉइंटवर कापुन तीन तुकडे करा. टोकाचा तुकडा टाकून द्या. जास्तीची स्किन कापुन टाका. चिकन विंग्ज पिठात घोळवून घ्या. विंग्जना लागलेले जास्तीचे पीठ झटकुन टाका. मोठ्या झीप लॉक बॅग मधे पीठ घेऊन त्यात विंग्ज टाकुन हलवले तर पसारा न होता हे काम होते.
१३x9 च्या पॅन मधे २ टे. स्पून बटर घालुन वितळवा. बटर वितळले की पॅन मधे विंग्ज सिंगल लेयर मधे ठेवा. ओवन मधे २० मिनिटे बेक करा. बाहेर काढुन उलटा आणि पुन्हा २०-२५ मिनिटे बेक करा. बाहेर काढुन पेपर नॅपकिन वर ड्रेन करत ठेवा. एकिकडे सॉसचे साहित्य मोठ्या बोल मधे नीट मिक्स करुन घ्या. त्यात चिकन विंग्ज घालून नीट ढवळा. विंग्जना सर्व बाजूने सॉस लागले पाहिजे.
चला तर मंडळी. थंडगार बीयर बरोबर आस्वाद घ्या चिकन विंग्जचा.
वाचने
6097
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा...!
जबरदस्त!!! म
ए१. माझा
भारीच की!
आई ग्गं...
मस्त
छानच आहे
स्वाती-२-तै,
>>इंडियानाप
In reply to स्वाती-२-तै, by बट्ट्याबोळ
कातिल !!
In reply to >>इंडियानाप by स्वाती२
सर्व
खल्लास
मस्त
उत्तम..!
मस्त...कधी