श्री. || विकास ||
मला तुमचा प्रतिसाद व्यक्तिशः खटकला आहे. मूळ लेखावर काहीच टिप्पणी न करता केवळ शुद्धलेखनाकडे रोख ठेवणे या मुळे हा प्रतिसाद अवांतर ठरतोय हे पण आहेच. नवीन सदस्याने इतके चांगले लिहिले असताना त्यावर काहीच भाष्य न करणे हे बरोबर नाही. असो.
बिपिन कार्यकर्ते
अतिशय प्रांजळ लिखाण. (बाजूची मुलगी जरी सुंदर दिसली..तरी ..आता आधी आम्ही..ताजी भाजी कुठली आहे..दुधाचे कॅन १ घ्यावा कि २. ह्या कडे लक्ष अधिक लक्ष दुउ लागलो. हे तर एकदम तुझे अनुभवाचे बोल दिसताहेत! ;))
आपल्याकडे मुलांना बर्याच प्रमाणात ऐदी बनवून ठेवले जाते असे मला वाटते. म्हणजे कोणी जाणूनबुजून करते आहे असे म्हणण्यापेक्षा आपल्याकडची व्यवस्था तशी आहे. इतकी वर्षे चालून गेले पण आता मात्र बदलायला हवे मुलांनी. इथून पुढे बदलत्या गरजा, नोकरीनिमित्त दूरच्या गावी, परदेशात जावे लागणे नवे नाही, त्याची पूर्वतयारी ही व्हायलाच हवी. फक्त नोकरी कामधंदा म्हणजेच सर्व नाही. घरातल्या कामांना तुमचा यथायोग्य हातभार हा लागलाच पाहिजे.
मुलींना जसे स्वयंपाकघरात शिकवले जाते तसेच मुलांनाही स्वयंपाक शिकवायला हवा. वेगवेगळ्या भाज्या, डाळी ह्यांचे पदार्थ यायला हवेत.
स्वयंपाकाचा आनंद काही वेगळाच असतो कारण ती निर्मिती असते.
(छोटा बल्लव)चतुरंग
खर्या अर्थाने "जनातले-मनातले" असलेला हा लेखनप्रपंच आवडला.
यावरून मला उपनिषदांमधील एक गोष्ट आठवली. आत्ता संदर्भ आठवत नसल्याने नाव-गाव डिटेल्स सांगत नाही. गोष्ट कदाचीत थोडीफार वेगळी असलेही, पण त्यातील तात्पर्य लक्षात घेण्याजोगा आहे:
एक मुलगा एका गुरूतुल्य ऋषीकडे जातो आणि जीवनाचे ज्ञान मिळवण्याची आपली इच्छा बोलून दाखवत तसे ते द्यावे म्हणून विनंती करतो. ऋषीमहाराज आनंदाने तयार होतात फक्त एकच अट घालतात की त्या आधी त्यामुलाने १० गायींना घेऊन रानात जावे आणि त्याच्या १०० गायी झाल्यावर परत यावे... मुलगा पण आनंदाने तयार होतो आणि गायींना रानात घेऊन जातो. काही वर्षांनी १०० गायी घेऊन परत जेंव्हा गुरूकडे येतो, तेंव्हा गुरू म्हणतो की तुझ्या तोंडावरचे तेजच सांगत आहे की तुला जीवानाचे ज्ञान मिळाले म्हणून..
असो. तुमचे हे येथील पहीलेच लेखन दिसत आहे तेंव्हा, पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
काही वर्षांनी १०० गायी घेऊन परत जेंव्हा गुरूकडे येतो, तेंव्हा गुरू म्हणतो की तुझ्या तोंडावरचे तेजच सांगत आहे की तुला जीवानाचे ज्ञान मिळाले म्हणून..
ही कथा बहुधा कठोपनिषदात आहे.
त्या काळी गायी हे धन असायचे. पण ते उदाहरण अगदीच कालबाह्य आहे. गायी पाळूनच जर ज्ञान मिळाले असते तर गुरु कडे जायचेच कशाला?
ज्ञान म्हणजे नक्की काय? जॅक ऑफ ऑल ट्रेड्स.... की एखाद्याच विषयात पारंगत असणे आणि इतर विषयात भोपळा असणे?
गोष्टीमधले तात्पर्य लक्षात घेयचे असते. तशीच्या तशी घेयला मी काही गायी चरायला नेत अथवा हाकत बसलेलो नाही की येथे कुणाला तसा उपदेश करत नाही.
हे म्हणजे, "गांधीजींना राष्ट्रपिता म्हणतो म्हणून आपण पंचा का गुंडाळत नाही" असे विचारण्यातला अथवा "शिवरायाचे आठवावे रुप, शिवरायाचा आठवावा प्रताप" असे म्हणता क्षणी, दाढी वाढवून घोडदौड करा असे सांगितल्यासारखेच झाले.
असो, कुणाला तितकाच अर्थ लागत असेल तर इतरत्र संदर्भवीना निष्कर्ष कसे काढू शकता येते, हे समजते. तेंव्हा चालूंदेत...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
विकासशी शब्दशः सहमत.
हे म्हणजे असे झाले... माझ्या लहान मुलीला मी सिंहाची आणि उंदराची गोष्ट सांगताना, 'एकदा सिंह म्हणाला...' अशी सुरूवात केली की... तिने म्हणावं... 'हॅट्ट्ट... सिंह कधी बोलतो का?'
अहो, भावार्थ घ्या हो. बाकीचे जाऊ दे.
बिपिन कार्यकर्ते
छान लिहीले आहे.
असेच अनुभव येत असतात, घरातून, गल्लीतून, देशातून बाहेर पडल्यावर.
मिपावर शुद्धलेखनाला ** वर मारलेले आहे त्यामुळे जास्त सुचवण्या करीत नाही, पण लेखन थोडे तपासावे हा सल्ला. म्हणजे मग काही टाळण्यासारख्या चुका तरी टाळता येतात, आणि महत्त्वाच्या विषयांमध्ये एखाद्या शब्दाने शोध देताना तो घ्यायला सोपे जाते. आणि सुरूवातीला चुका होतात, पण त्या सवयीने टाळता येऊ शकतात. तेव्हा इथे नेहमी लिहीत जावे!
पुढील लेखनास शुभेच्छा, आणि मिपावर स्वागत.
व्याकरणातल्या अथवा टंकनातील चुकांमुळे आशय/अर्थहानी होणार नाही इतपत दक्षता घेतली तरी बास आहे. बाकी मिपावर शुद्धलेखन फाट्यावर मारले जाते हे जालश्रुत आहेच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मिष्टर गानु... छानच लिहिलंय. पहिलाच प्रयत्न आहे म्हणताय, पण त्या मानाने एकदम ए-वन लिहिलंय की हो!!! तुम्हाला लिहिता येतंय हे जाणवतंय. भाषा छान आणि प्रवाही आहे. कुठेही अडखळलो नाही वाचताना. हां.. थोडेसे शुद्धलेखनाकडे लक्ष द्या, फार अवघड नाही हो.
हे वाचताना मला माझे खोबारचे सुरूवातीचे दिवस आठवले. आयुष्यात पहिल्यांदा एक महिन्यापेक्षा जास्त घराबाहेर राहिलो होतो. स्वतःचे घर केले, ते चालवले, कुटुंबप्रमुख म्हणजे काय ते कळले... थोडक्यात काय तर... खोबारला मी मोठा झालो. तसेच तुम्ही आत्ता होताय. आणि ते छान शेअर केले आमच्याबरोबर.
अजून बरेच लिहा, वाचायला उत्सुक आहोत.
बिपिन कार्यकर्ते
चतुरंग, विकास, चित्राताई, बिपिनचे प्रतिसाद आवडले. तुमचं मनमोकळं प्रकटन आवडलं, अगदी समोर बसून गप्पा मारल्यासारखंच.
थोड्याफार प्रमाणात माझ्या बाबतीत हेच झालं, फक्त घरातच राहून!
अलिकडेच एका माझ्यापेक्षा लहान विद्यार्थ्याला सांगत होते, "संधी मिळाली तर नक्की घराबाहेर जा. कागदी पदवी मिळतेच, पण फुकटात बरंच जास्त शिकण्याची संधी सोडू नकोस."
शुद्धलेखनाचा फार बाऊ नकोच, पण थोड्या सवयीने "शुद्ध" लिहिता येईल. लिहीते रहा.
अदिती
खूप छान अनुभव कथन आहे हे. आणि हे पहिलच आहे तरी इतकं छान आहे.
>> एकटा राहिल्यामुळे मी ..अपसुख हा एकांत मिळायचा अनुभव मी घेतालाल आहे>>
ज्याला पर्सनल स्पेस म्हणतात ती बाहेर (कुटुम्बापासून दूर) गेल्यावर मिळते हे खरं आहे.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
प्रतिक्रिया
छान प्रयत्न...
छान
छान लिखाण
मिसळपाववर
श्री. ||
छान
मस्तच जमलये रे....
छान रे अभिषेक!
छान
काही
तात्पर्य
विकासशी
+१ अगदी अगदी!!
छान प्रकटन
छान
मस्त लेखन...!
खूप
आनन्दयात्
शुद्ध/अशुद्ध लेखन
मस्त लेख
गाडी जोरात आहे.....
मिष्टर
चतुरंग,
खूप छान
छान..