मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खव्याची पोळी

मितालि · · पाककृती
साहित्यः १ वाटी खवा, १/२ वाटी बेसन पीठ, तुप, १ चंमचा खसखस, १ चंमचा तीळ, २ चंमचे सुखे खोबरे, ३/४ वाटी साखर, वेलचीपुड ३/४ वाटी कणीक, ३/४ वाटी मैदा, मीठ, १ मोठा चमचा बटर, तेल. कृती: कणीक , मैदा, मीठ मिसळुन घ्या. बटर गरम करुन या पीठात घाला. पाणी घालुन पीठ मळुन घ्या. पोळयांच्या पीठा पेक्षा किंचित घट्ट मळा. तेल लाऊन १०-१५ मिनिटे झाकुन ठेवा. तुपावर खवा गुलाबी रंगावर परतुन घ्या. बेसन पण तुपावर खमंग भजुन घ्या. हे दोन्ही वेगवेगळे भाजायचे आणि थंड करत ठेवायचे. खसखस , तीळ , सुखे खोबरे वेगवेगळे भाजुन एकत्र पुङ करुन घ्या. आता खवा, साखर, खसखस तीळ खोबरे पुड, बेसन , वेलची पुड एकत्र करुन निट मिसळुन घ्या. मिश्रणात गुठळ्या राहता नयेत. कणकेच्या दोन छोट्या पार्‍या लाटुन त्याच्या मध्ये या मिश्रण घालुन बंद करा. हलक्या हाताने मैद्यावर या पोळ्या लाटा व मध्यम आचेवर तव्यावर तुप लावुन भाजुन घ्या.

वाचने 5432 वाचनखूण प्रतिक्रिया 7

पाषाणभेद Fri, 01/01/2010 - 09:12
पुरणाच्या पोळीचा आधूनिक अवतारच जणू. घ्या अन खा. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

In reply to by पाषाणभेद

>>पुरणाच्या पोळीचा आधूनिक अवतारच जणू. घ्या अन खा. अगदी असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे [गुळोणीत यथेच्छ पुरणपोळी हादडणारा]

In reply to by परिकथेतील राजकुमार

गणपा Sat, 01/16/2010 - 18:26
अगदी अगदी आलोच हा पाणि आणि पायावर पाणी टाकुन ;)