थोर कृषिवल 'अमित'जी हेच आमचे खरे स्फूर्तिस्थान. बाकी दादांच्या मूळ काव्याबद्दल सांगणे न लगे!
आज मावळात दंग 'अमित' हा तरी
जपून जा जरा कशी 'जयू' तुझ्या घरी!
तो लबाड वित्तचोर वाट लावतो
दाम देउनी खुशाल टोपी घालतो
गुंगवूनि संगती दलाल 'फासतो'
'चारतो' अजूनही तिथे खरोखरी!
त्याच 'अमर'सुंदरास हात जोडले
शेती लाटल्याविना कुणा न सोडले
कोणि राव कोणि रंक करुन टाकले!
एकटीच 'बाराबंकी' नाही ती तरी !
भू तिथे करुन दान वाद संपला;
थोर 'अमित' तो बनून काळ लोटला;
कृषक बनुनि आज फिरुनि तोच पातला
हाय! वाजली फिरून गाडी ती खरी!
चतुरंग
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8757
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
चतुरंगशेठ,
प्रासंगिक विडंबन उत्तम झाले आहे..
केशवसुमार
वा!
चतुरंगशेठ,
प्रासंगिक विडंबन उत्तम झाले आहे..
केशवसुमार
असेच म्हणतो
In reply to वा! by केशवसुमार
(सहमत)बेसनलाडू
असेच
In reply to वा! by केशवसुमार
म्हणतो.
व्यंकट
हेच ..
हेच म्हणते,केसु आणि बेला सारखेच.
प्रासंगिक विडंबन उत्तम!
स्वाती
खिख्खिखिख्खिख्खिखिख्खि...
In reply to हेच .. by स्वाती दिनेश
खिख्खिखिख्खिख्खिखिख्खि...(हे खिख्खि..चोली के पीछे मधल्या कुक्कुकुक्कुक्कु...सारखं बरं का..;)
धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
असेच
जोरदार विडंबन. आवडले.
छान
हाय! वाजली फिरून गाडी ती खरी!
ह्यातली गाडी कळली नाही !
बाकी छान !
- सर्किट
गाडी म्हणजे आपली नेहेमीची मोटरगाडी.
In reply to छान by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तो गाडीतून परत आलाय एवढेच सूचित करायचे आहे - काही खास वेगळा अर्थ सांगायचा नाहीये.
चतुरंग
झक्कास..!
जपून जा जरा कशी 'जयू' तुझ्या घरी!
ही ओळ सर्वात क्लास! :)
आपला,
(गुड्डीतल्या जयूचा प्रेमी) तात्या.
क्या बात है तात्या!
In reply to झक्कास..! by विसोबा खेचर
दोन वेण्या आणि फ्राक घातलेली;) कुठल्या कुठल्या आठवणी काढता बॉ!
चतुरंग
सह्ह्हि..
एकदम धडाकेबाज...
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
असेच अजून एक विडंबन
असेच एक विडंबन इथे वाचले.
https://www.maayboli.com/node/539
मीनल.
मिल्या
In reply to असेच अजून एक विडंबन by मीनल
मायबोलीवरचा मिल्या जबरन आहे..
- सर्किट
नव नविन माहिती
In reply to मिल्या by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मग काय ?
आहे की नाही नविन माहिती ?
तुझ म्हणणं पुन्हा एकदा खर ठरवल की मी .
मीनल.
ही कस्ली नवीन माहिती ??
In reply to नव नविन माहिती by मीनल
मान्च्युरियन आणि शेजवान, इतकीच शिळी बातमी ही, मीनल..
बाय द वे. एम एस जी, विषयी तुला कही नवीन माहिती द्ययची असेल, तर नक्की दे.
- सर्किट
आत्मचरित्र
In reply to ही कस्ली नवीन माहिती ?? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अरे रे !
मला वाटल चायनीज नाही ,गझल नाही ,निदान `मिल्या`ची तरी असेल बातमी तुझ्या करता नविन.
जाउ द्या काय?
एम एस जी--हो -
मीनल संजय गद्रे.
अरे मोठ्ठा ग्रंथ तो .आत्मचरित्र.
लिहीते आहे .लिहून झाला की पहिली कॉपी तुला .प्रॉमिस.
मीनल.
काय सांगतेस ?
In reply to आत्मचरित्र by मीनल
तुझ्या आत्मचरित्राच्या उत्कंठेत,
- सर्किट संजय गद्रे
संजयला
In reply to काय सांगतेस ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
संजयला नचिकेत हा एकच मुलगा आहे हे मला माहित होतं.
हा सर्किट कोणता?
आत्ताच छडा लावते, त्याला विचारून.
मीनल.
सर्व प्रकट, अप्रकट आस्वादकांचे आभार!
(अवांतर - मीनलताई, 'मायबोली' वरचे आपण दाखविलेले विडंबनही झकास आहे.)
चतुरंग
विडंबन
मला तुम्ही केलेले विडंबन जास्त आवडले.
बच्चन + सामाजिक परीस्थिती.
मीनल.