गेल्या वर्षी मद्राश्यांच्या प्रदेशात असताना डोसे , इडल्या, उतप्पे या पदार्थांनी अगदी उत आणला होता आणि तेव्हा पासुनच त्यांच नाव टाकल होतं.
तसा मी काही यांचा द्वेष्टा नाही पण सारख सारख तेच आणि तेच खाउन जीव कंटाळला होता.
आता बरेच दिवस झाले हाणुन तशी त्यांची आठवण येउ लागली म्हणुन हा प्रपंच....
साहित्यः
पीठासाठी दोनास एक या प्रमाणात तांदुळ आणि उडिद डाळ कमीत कमी ४-५ तास भिजत ठेवावे.
(उपलब्ध असल्यास साध्या तांदळा ऐवजी उकडा तांदुळ घ्यावा.)
१ वाटी शिळा भात. ( असल्यास)
१/२ छोटा चमचा यीस्ट्/इनो
कांदा,टोमॅट,भोपळी मिरची, हिरवी मिरची बारीक चिरुन.
चवीनुसार मीठ.
कृती:
४-५ तास भिजत ठेवलेले तांदुळ आणि उडिद डाळ वेग वेगळे वाटुन घ्या.
शिळा भात असल्यास तो पण मिक्सर मध्ये वाटुन घ्या. एका मोठ्या भांड्यात एकत्र कराव.
घरात यीस्ट् नसल्यास १/२ छोटा चमचा इनो टाकुन मिश्रण चांगले ढवळुन घ्याव.
भांड्यावर झाकण ठेवुन भांड जरा उबदार जागेत रात्र भर ठेवाव.
थंडीत पिठ चढत/फुलत नाही आश्यावेळी रात्रीच ओव्हन २-३ मिनिटांसाठी गरम करुन हे भांड त्यात ठेवाव.
ओव्हन नसेल तरी फिकर नॉट.. तवा १-२ मिनिटांसाठी गरम करुन हे भांड त्यावर ठेवा.
दुसर्या दिवशी हे अस दाम दुप्प्टीने वर येईल.
पीठात चवीनुसार मीठ टाका.
उतप्पा टाकताना आधी नॉनस्टीकचा तवा चांगला तापवुन घ्या. थोड पाणी शिंपडुन चुर्रर्रर्रर्रर्रर्र..आवाज आल्यावर त्यावर डावाने पीठ टाकुन थोड पसरवुन घ्याव.
बाजुने थोड तेल सोडुन १/२ मिनिट वर झाकण ठेवाव. झाकण काढुन मग वरुन कांदा, हिरव्या मिरच्या टाकुन परत झकुन ठेवा.
एक दिड मिनिटाने वरुन उतप्पा शिजल्यावर (जाळी पडेल) उलथण्याने उलटुन बाजुने तेल सोडावे. १-२ मिनटे खरपुस शिजु द्यावे.
हिरव्या चटणी सॉस सोबत वाढा.
थोडा बदल म्हणुन पुढच्या खेपेस कांद्या सोबतच भोपळी मिरची, टोमॅटो टाकुन ट्राय करा.
हिरव्या चटणी सॉस सोबत वाढा.
वाचने
22199
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.....लोण्
व्वा
सूंदर...
आयचा घो
असेच
In reply to आयचा घो by परिकथेतील राजकुमार
मस्त..
?
खरा बल्लवाचार्य.
पाणी सुटलय तोंडाला
लैच
पीठ जर
हेच
In reply to पीठ जर by प्राजु
अन्ना २ वोणियण उथप्पा मेरेकू भी...
मस्त
चटणी सॉस
या वेळी
समस्त वाचक
अरे काय रे हे गण्या!!
>>संदर्भ -
In reply to अरे काय रे हे गण्या!! by चतुरंग
स्टेपल फूड !
नेहमीप्रमाणेच
मस्त
परिणामकारक छायाचित्रे
१००% सहमत
In reply to परिणामकारक छायाचित्रे by नंदा
+२
In reply to १००% सहमत by विकास
+३
In reply to +२ by सहज
धावीस कॉप्या ??
In reply to +३ by बिपिन कार्यकर्ते
गणपा......