मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऊंधियु

श्रीयुत संतोष जोशी · · पाककृती
ऊंधियु साहित्य : भाज्या : लहान वांगी, लहान कांदा व बटाटा, कंद, सुरण, राजळी केळी, घेवडा, तुरीच्या शेंगा, ओल्या वालाच्या शेंगा, मटार, मेथी आणि सुरती पापडी ( ही नसेल तर ऊंधियु होणार नाही.) मसाला : ओलं खोबरं, कोथिंबीर, जीरा पावडर, हळद, तिखट, ओली लसूण, मीठ, लिंबाचा रस, साखर, दाण्याचं कूट. कच्चा मसाला ( धने,जीरं,लवंग,दालचिनी थोडं भाजून त्याची पूड.चवीपुरतं मीठ) इतर : तेल, पाणी, जीरं, मोहरी, बेसन, खायचा सोडा कृती : प्रथम मसाला करून घेणे : ओली लसूण बारीक वाटून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून (लसणीसह) बाजूला ठेवा.हा मसाला ऊंधियुची चव ठरवतो त्यामुळे तिखटाचे प्रमाण यामधे कमी जास्त अर्थात प्रत्येकाच्या चवीप्रमाणे ठेवणे सोपे जाते. मेथीचे गोळे : ( अर्थात मुठिया ) : मेथी स्वच्छ निवडून व धुवून बारीक चिरून थोडे मीठ लावून ठेवावी आणि १० मिनीटानी हाताने गच्च पिळून घ्यावी जेणेकरून कडवटपणा कमी होईल. मग त्यात बेसन,खायचा सोडा,चवीप्रमाणे मीठ,तिखट घालून घट्ट मळून घ्यावे व त्याचे लहान गोळे करून तेलात तळून घ्यावे. लहान वांगी थोडं देठ ठेवून मागील भागावर आडवी उभी चीर मारून घ्यावी.कांदा व बटाटा सुद्धा सोलून अशाच प्रकारे कापावा. राजळी केळी सालासकट कापावी. एका केळ्याचे ५ तुकडॆ करावे. कंद , सुरण सोलून चौकोनी तुकडे करून घ्यावे व तेलात तळून काढावे आणि त्यावर थोडॆ मीठ व तिखट शिंपडावे. घेवडा व सुरती पापडी निवडून घ्यावी , तूर, वाल व मटार शेंगा सोलून दाणे काढावे. हा सर्व शेंगांचा माल शिजवून घ्यावा. वांगी,कांदा,बटाटा व केळी कच्चीच ठेवावी. एका कढईत तेल व एका पातेल्यात पाणी गरम करण्यास ठेवावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात थोडॆ तेल गरम करून त्यात मोहरी , जीरं घालून फ़ोडणी तयार करावी. त्यात फ़क्त रंगापुरते हळद व तिखट घालावे. मग त्यात सर्व कच्च्या भाज्या वांगी,कांदा,बटाटा घालावा २ मिनीटे ढवळून मग थोडा मसाला व मुठिया घालावे. आता ढवळू नये. मग या मधल्या थरात केळी , कंद , सुरण व सर्व शेंगा व दाणे ( शिजवलेले ) घालून वरून सर्व मसाला व उरलेले मेथीचे गोळे घालावे. आता त्यात गरम केलेल्यापैकी आधी तेल साधारणपणे ३ स्टील च्या डावा भरून घालावे व नंतर गरम पाणी घालावे. साधारणपणे सर्वात वरच्या थराला जेमतेम दिसेल इतपतच पाणी घालावे. मग घट्ट झाकण लावून मंद आचेवर पूर्णपणे १ तास ऊंधियु शिजू द्यावा. १ तासाने झाकण काढून लांब दांड्याच्या कालथ्याने खालपासून एकदा थोडं हलवून वाफ़ आली का ते तपासावे. परत झाकण ठेवून १५ मिनीटे शिजू द्यावे. मग झाकण काढून नीट ढवळून वांगं , कांदा , बटाटा शिजला का ते बघून गरम गरम फ़ुलका आणि थंड ताकाबरोबर सर्व्ह करावे.

वाचने 7813 वाचनखूण प्रतिक्रिया 11

In reply to by स्वाती२

चित्रा 10/01/2010 - 20:47
माझाही! एकेकाळी अजिबात बघायचे नाही मी, आईला हा पदार्थ एवढा का आवडतो तेही कळायचे नाही. पण मोठी झाल्यावर आवडायला लागला.

jaypal 10/01/2010 - 17:37
सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्स छे *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात

प्रियाली 10/01/2010 - 19:07
काल रात्री उद्या करावा का काय असा विचार मनात डोकावला पण भाज्या आणण्यापासून तयारी असल्याने टाळण्याचे निश्चित केले आणि आज सकाळी सकाळी उंधियो नजरेस पडावा. अतिशय आवडती डिश.

समंजस 12/01/2010 - 12:21
छान पाककृती!!! बर्‍याच दिवसांपासून विचार करत होतो ऊंधियु खाण्याचा(विकत आणून) आता मात्र करून बघायचा विचार आहे :)

गणपा 12/01/2010 - 13:24
सही रे संतोष.. मस्त पाकृ. एकदा ट्राय मारायला हवा.