नमस्कार मंडळी,
इंडो-चायनिज् च्या दुसर्या भागात आपलं पुन्हा स्वागत.
आजची खादाडी आहे शेझवान ट्रिपल फ्राईड राईस.
चायनिज् पदार्थ करायला खुप सोप्पे असतात. फक्त त्यांच्या पुर्वतयारीला थोडा वेळ लागतो. भाज्या निवडुन त्या निगुतीने कापणे हे खर हुशारीच काम.
ते जमल की मग बाकीच हाय काय अन नाय काय!!!!!
साहित्यः
१ वाटी चिकन चे लहान तुकडे,
कोळंबी.
१/२ गाजर.
५-६ फरसबी.
२ पातीचे कांदे.
थोडासा कोबी.
१ भोपळी मिरची.
लसुण बारीक चिरलेला.
१ इंच आल्याचे जुलियंस.
१-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
सोयासॉस
शेझवान सॉस.
मीठ चवी नुसार.
तयार भात.
न्युडल्स्.
कृती:
न्युडल्स् आणि भात आधीच तयार करुन ठेवावे.
चिकन आणि कोळंबी यांना १-१ चमचा सोयासॉस व शेझवान सॉस लावुन १० मिनिट मुरत ठेवाव. (दोन्ही सॉस मध्ये मीठ असत त्यामुळे वेगळ लावायची गरज नाही)
एका पॅन मध्ये १ चमचा तेल घेउन त्यात चिकन आणि कोळंबी शिजवुन घ्यावी.
चिकन आणि कोळंबी एक बशीत काढुन, त्याच पॅन मध्ये शिजवलेल्या न्युडल्स परतुन घ्याव्या आणि बाजुला काढुन ठेवाव्या.
त्याच पॅनमध्ये १ चमचा तेलावर लसुण्-हिरवी मिरची, आल परतुन घ्याव.
आच मोठी करुन थोडा शेझवान सॉस आणि भाज्या टाकुन परतावे. चवी नुसार मीठ टाकावे. चिकन आणि कोळंबी टाकावी.
लगेच तयार भात टाकावा आणि नीट मिक्स करुन घ्याव.
वाढताना आधी खाली भाताचा थर लावावा, वरुन न्युडल्स पसरवाव्या, वाटल्यास एक अंड्याचा पोळा काढुन वर ठेवावा.
वाचने
16395
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गण्या लेका
असो तुझ्या
In reply to गण्या लेका by प्रभो
__/\__ काहीच
मस्त
१,२,३,४..........गणपाजींचा जयजयकार
दिल
छान
जरा आधी
आता यातले
छान
फ़ेवरेट
आधी डोळ्यांनी
डोळे अन
+१
In reply to डोळे अन by पाषाणभेद
व्वा
लाळेर आणायला जातोय.
मस्तच........
खुप मस्त....
वा!!