झित्रोन कुकन- लेमन केक
आमच्या त्सेंटाआजीची खासियत म्हणजे हा लेमन केक..
साहित्य-
२५० ग्राम साखर, २५० ग्राम मैदा, २५० ग्राम लोणी/तूप, ५ अंडी
२ चहाचे चमचे बेकिंग पावडर, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १ चिमूट मीठ
१००-१२५ ग्राम पिठीसाखर, ४ ते ५ लिंबांचा रस, लिंबाची किसलेली साल १ ते २ चमचे
कृती-
लोणी/तूप भरपूर फेटणे,नंतर साखर घालून फेटणे,मीठ घालून फेटणे,अंडी घालून फेटणे. वॅनिला इसेन्स घालून फेटणे.
लिंबाची साल घालून फेटणे. मैदा+बेकिंग पावडर एकत्र करणे व ते घालून फेटणे.
केक च्या साच्याला बटर लावून घेणे व त्यात ते मिश्रण ओतणे.
अवन प्रिहिट करणे, १८० अंश सेल्सिअस वर ५५ ते ६० मिनिटे बेक करणे.
केक तयार झाला की मोल्डमधून बाहेर काढणे व जाळीवर ठेवणे म्हणजे वाफ धरणार नाही. कोमट झाला की त्याला टोचणीने/विणायच्या सुईने (विणायच्या सुईशी माझा एवढाच संबंध! :) ) सर्व बाजूंनी भोके पाडणे.
लिंबांचा रस + पिठीसाखर एका ट्रे/मोठ्या ताटलीत घेणे व त्यात हा केक उलट सुलट सर्व बाजूंनी घोळवणे. कडा जास्त घोळवणे. रस सगळीकडे लागायला हवा आणि केक च्या आतही जायला हवा.
पिठीसाखरेने सजवणे.
गार झाल्यावर तुकडे करणे. गरम गरम कॉफीबरोबर खाणे.
(जर्मनांना केक बरोबर कॉफी लागतेच लागते! आपण जसे चहाफराळाला बोलावतो तसे ही मंडळी 'काफे उंड कुकन' साठी बोलावतात!)
हे तुकडे प्लास्टीक कागदात गुंडाळून प्लास्टीक डब्यात घालून डीप फ्रिझ मध्ये ठेवले तर ४/५ महिने टिकतात.
(अर्थात तसेही ते खाण्यातून उरायला तर हवेत..:) )


वाचने
9482
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
खल्लास!!!!!! स
ह्म्म
In reply to ह्म्म by सहज
+१
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
+ २ हॅ हॅ हॅ
मस्त फोटो...
व्वा! मस्त
मस्त
ज ह ब ह र्या हा!!!
In reply to ज ह ब ह र्या हा!!! by चतुरंग
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्तच!
छान दिसतो आहे
छ्या
मस्तच दिसतोय केक
अ फ ला तू न!!
स्वाती