Skip to main content

मराठी कॅलेंडर

लेखक सखी यांनी सोमवार, 04/01/2010 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाकडे मराठी कॅलेंडर (जालावर किंवा पीडीफ) असेल तर इथे चढवता येईल का? मी गेले काही दिवस बरेच गुगलुन पाहीले पण सापडले नाही, म्हणून इथे धागा टाकत आहे. कदाचित परदेशात राहणा-या बाकी मिपाकरांनाही याचा उपयोग होईल. ०६ किंवा ०७ साली महारष्ट्र सरकारच्या वेबसाइटवर मराठी कॅलेंडर होते (बहुतेक करुन पर्यटन विभागात) पण यावर्षी अजुन तरी सापडले नाही. मदतीसाठी धन्यवाद.

वाचने 6153
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

माझ्याकडे पीडीएफ आहे... ऑफीसातुन चढवता येत नाहीये. घरुन गुगल डॉक्स वर चढवेन...

"नेटावरी कालनिर्णय असावे," असे वाटून मी कालनिर्णय.कॉम च्या संकेतस्थळावर गेलो तर जानेवारी महीना दिसला पण कालनिर्णय विकत घेण्याची सोय काही दिसली नाही. :-( -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by चतुरंग

धन्यवाद! :-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by पर्नल नेने मराठे

>>मागची बाजु पण करा यपलोड्..बरिच उप्य्युक्ट माहिति असते हो ना, पानाची मागची बाजूही अपलोड केली पाहिजे. हा महिना असा जाईल. पाकृती,बरीच माहिती, असते. कालनिर्णयाच्या जानेवारीच्या पानामागे 'ब्रह्मदेवाच्या गाठी' नावाचा सचिन मोटे यांचा लेख खुसखुशीत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by पर्नल नेने मराठे

चुचुतै वर दिलेले कालनिर्णय मी उपलोड केलेले नाही. स्क्रिब्ड संकेतस्थळावर कुणा शशी महाजन यांनी उपलोड केलेले आहे.

In reply to by अंतु बर्वा

कालनिर्णय संकेतस्थळावर कोठेही पंचांग डाउन्लोड करा असा पर्याय दिसला नाही. वर जे पंचांग प्रसिद्ध केले आहे ते करण्याआधी कालनिर्णयवाल्यांची परवानगी घ्यायची गरज नाही का? (पंचांगसागर)भेंडी P = NP