पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही
खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही
बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही
भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो
नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही
काय मिळाले इतक्या ह्या तडजोडीनंतर
हिशोब याचा अजून काही लागत नाही
पुढे जायचे आहे येथे प्रत्येकाला
कुणाचसाठी कोणी आता थांबत नाही
असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या
उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही
खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी
मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2269
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है !
सुंदर गजल अनिरुद्ध!
असेच
In reply to सुंदर गजल अनिरुद्ध! by चतुरंग
नीरीच्छ
हॅहॅहॅ
खरं आहे.
In reply to हॅहॅहॅ by सहज
मस्त कविता आहे हो....
बर्याच दिवसांनी
चांगला प्रयत्न
धन्यवाद..