Skip to main content

सांता क्लॉज

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 25/12/2009 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
सांता क्लॉज नाताळ मधे खुप मजा असायची रात्री मोजा लावायाचो अन सकाळी उठल्यावर मज्जाच मज्जा सांता चॉकलेट्स,खाउ, खेळणी द्यायचा खुप मजा यायची, मग बाबांना विचारायाचो..... बाबा सांगाना, कुणी दिला हा खाऊ? खेळणी? सांता आला होता, तुला आवडतात म्हणुन दिलि.....बाबा मग मला का नाहि जाग केले?..... सांता म्हणाला त्याला झोपु द्या...बाबा म्हणाले. सांता कधिच भेटला नाहि एका नाताळला मोजा लावला अन हसत बसलो... काय रे लबाडा का हसतोस? बाबा.. बाबा मला सांताची गंमत कळाली आहे.. सांता बिंता काही नसतो.. बाबा च खाउ,खेळणी आणुन ठेवत असतात..हसत म्हणालो चला आमचा बाळ मोठा झाला..बाबा हसत म्हणालें मी बाबाकडें बघतच राहिलो.??? "अरे ज्या दिवशी तुम्हाला कळत ना कि सांता बिंता काही नसतो. त्या दिवसा पासुन तुमच बाल्य संपलेल असत" बाबा हसत म्हणाले... अविनाश.....
लेखनविषय:

वाचने 2659
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

"अरे ज्या दिवशी तुम्हाला कळत ना कि सांता बिंता काही नसतो. त्या दिवसा पासुन तुमच बाल्य संपलेल असत" सुरेख!!!!!!! चुचु

विशाल छान लिहलयस चुचुशी सहमत *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अत्यंत सुरेख ! आवडले मुक्तक ! ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©