Skip to main content

माझी प्रीत आहे

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 01/04/2008 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
हार माझी या घडीला , पण उद्याची जीत आहे कौतुकाचा मी भुकेला, आसवांना पीत आहे ! संपले जरी सूर कंठी , जिद्द आहे गायची दाटल्या कंठात माझ्या अन उद्याचे गीत आहे ! जा, सुखाने झोप तू , माझाच हा वनवास आहे सवय नाही भोगण्याची-त्या "सुखाला" भीत आहे ! जिंकला जो या पटावर तो सिकंदर खास आहे "हारलो का?" हे पहाणे , जिंकण्याची रीत आहे ! काय तुम्ही मागुती या जीवनाच्या नाचता? मुक्ती जे देहास देई, "मरण" माझी प्रीत आहे !
लेखनविषय:

वाचने 2916
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

optimistic विचार आहेत. पॉ़झिटिव्ह थिंकिंग!

कविता चांगली आहे. हार माझी या घडीला , पण उद्याची जीत आहे खरच पॉझिटीव्ह थिंकींग