मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मसाले भात

श्रद्धा. · · पाककृती
साहित्य :- २ वाट्या बासमती तांदुळ, १/२ वाटी कोथिंबीर, ३-४ मिरी, ४-५ लवंगा,२/३ तमालपत्री, १०/१२ काजू तुकडे, चिरलेला कोबी १ वाटी ,गाजराचे तुकडे एक वाटी, मोठे २ चमचे गोडा मसाला, चवीपुरते मीठ, २ मोठे चमचे तेल, १ मोठा चमचा तुप, राई, जीरे, हळद, हिंग,आले १ इंच उकललेले पाणी तांदळाच्या अडीचपट कृती :- तांदूळ धुवून १५ मिनीटे निथळत ठेवा. एका कढईत २ चमचे तेल गरम करून मोहोरी,जीरे,हिंग, हळद, काजू, लवंगा, मिरे, तमालपत्री घालून कोबी आणि गाजर घालुन परतुन घ्यावे नंतर त्यात तांदूळ घालुन परतून घ्यावे. तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे.आले किसुन घालावे, बारीक गॅसवर उकळी काढावी.मग त्यात गोडा मसाला, चवीपुरते मीठ घालावे. भांड्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ काढावी. भात शिजत आला की त्यात चमचाभर तुप सोडावे त्यामुळे भाताची शिते मोकळी राहतात. खाताना भातावर साजूक तूप आणि खवलेला ओला नारळ कोथिंबीर घालुन घ्या.

वाचने 10663 वाचनखूण प्रतिक्रिया 10

अवलिया 10/12/2009 - 14:02
वा वा छान छान ! घोसाळ्याची भजी ! मसाले भात.. आता कढी, मठ्ठा, बुंदिचे लाडु सगळं येवु द्या.. सगळं कसं लग्नाच्या मेजवानीत आल्यासारखे वाटते. नव्या संपादकांना खाउ पिवु घालुन फितवणं चांगलं चालु आहे. --अवलिया

In reply to by अवलिया

अप्रतिमच !!! दुपारच्या वेळी पाकृचा विभाग उघडु नये हेच खरे. अवांतर :- नान्या तु लग्न कर आता, मस्त जेवणावळ घालु आपण ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

प्रभो 10/12/2009 - 20:18
मस्त.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!