खयाली पुलाव
लेखनप्रकार
या आठवड्याची पाककृती - खयाली पुलाव
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही एवढी व्हिस्की त्यात टाकली.
"पाणी की सोडा?" त्याने विचारले.
"काही नको." केशवसुमार म्हणाला.
"म्हणजे? नीट घेणार की काय तू केशवा? त्रास होईल हो..." बेसनलाडू काळजीच्या स्वरात म्हणाला.
"नाही... काही नको, म्हणजे काहीच नको. मी पीत नाही."
"तू... पीत... नाहीस?" बेसनलाडवाने आश्चर्याने विचारले. "बापरे! म्हणजे तू अजिबातच.. अरे बापरे! तू काही खात नाहीस हे ऐकलं होतं"
"काय खात नाही?"
"हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?"
केशवसुमाराने खांदे उडवले. "काय होईल ते होईल बेला, तू असताना मी ही काळजी का करावी?"
----------------------------------------------------------------------
"हुकूम बदाम."
सर्किटचा आवाज आला. तो, सन्जोप आणि विसोबा पाच तीन दोन खेळत होते. सर्किटने शहारल्यासारखे करून अंगावरचे पांघरुण गच्च गुंडाळून घेतले.
"काय, थंडी वाजत्येय का तुला सरकू?" प्रेमाने सर्किटच्या पाठीवर हात टाकत सन्जोप म्हणाला.
"पानं बघू नको हां माझी.. सरक तिकडे...आणि मला थंडी वाजत्येय असं कोण म्हणालं तुला?"
"म्हणालं नाही कुणी. हे तुझं पांघरुण बघून वाटलं मला."
"पांघरुण नाही हे काही. कातडी आहे ती. तीही गेंड्याची."
"अच्छा अच्छा.. म्हणजे ती नुसती पांघरायची असते होय? मला वाटलं की ती खरोखर तशी करायची असते. सॉरी हां..." सन्जोप विनयानं म्हणाला. "कोण पान टाकणार आहे?"
"तूच" विसोबा म्हणाला.
----------------------------------------------------------------------
"काय कर्णा? तू शेवटी आलास म्हणायचास. मला वाटलं तुझंही मन विटलं की काय मिसळपाववरुन? काय? होतोस का परत संपादक?"
"आता पुन्हा तो विषय नको, तात्या. दुसरं काहीतरी बोल. आणि हे काय? हे कुणाचं पुस्तक?" तात्याच्या शेजारी पडलेले 'काजळमाया' उचलत आजानुकर्ण म्हणाला.
"माझंच"
"तू काही म्हण तात्या, जी.ए.कुलकर्णी हा कालबाह्य झालेला लेखक आहे, असं माझं मत आहे" कर्ण जोरात म्हणाला.
"हेच म्हणतो." सन्जोपने इस्पिकची उतारी केली. "काय ती फुटलेल्या बेडकाप्रमाणे ओंगळ आयुष्ये, चिकट, ओलसर कोळ्याच्या धाग्याप्रमाणे वासनंचे जाळे, गिधाडाप्रमाणे काळे, अशुभ आणि चोच, नखे रुतवून बसलेले काहीतरी... शी शी शी...तुला
ते वाचताना किळस वाटत नाही का रे? आणि आजकाल जी.ए. वाचतो तरी कोण रे तुझ्यासारख्यांशिवाय?"
"सगळ्या गोष्टी इतरांसाठी, प्रसिद्धीसाठी करायच्या असतात काय सन्जोपशेठ?"
विसोबाने सुपारी कातरत विचारले. " मी लिहितो ते काय लोकांनी मला चांगलं म्हणावं, प्रतिक्रिया द्याव्यात म्हणून काय? आपापली श्रद्धा असते. साला, प्रतिक्रिया आल्या काय, नाही आल्या काय, आपण लिहितो आपल्या आनंदासाठी. काय?"
----------------------------------------------------------------------
दुसरीकडे चित्तर एका हातात लिंबूपाण्याचा ग्लास आणि एका हातात शंकरपाळ्याची प्लेट घेऊन येताना दिसला. सर्वसाक्षीने पुढे केलेल्या सिगारेटला मानेनेच नाही म्हणून तो थेट सर्किटजवळ येऊन बसला.
"मेरा कुछ सामान... तुम्हारे पास रहा है..." सर्वसाक्षी स्वतःशीच गुणगुणत होता.
"क्या बात है साक्षीदेवा! साक्षात गुलजार!"
"फिर!"
----------------------------------------------------------------------
सर्वसाक्षी आणि विजुभाऊचे वेगळेच चालले होते.
"जुने जाऊद्या मरणालागुनि" की अशीच काहीशी ऒळ आहे ना रे ती? या इतिहासाच्या कचाट्यातून आपण कधी बाहेर पडणार कुणास ठाऊक."
"इन फॅक्ट, मला तर असं वाटायला लागलंय की लोकांना ही असली काहीतरी नशा पाहिजेच असते - वास्तव पचवायला." सर्वसाक्षी म्हणाला.
"आणि हिंदुत्वाच्या बिंदुत्वाच्या तर गफ्फा आहेत रे गफ्फा!" विजुभाऊ उसळला. "कसला अखंड भारत, कसला सनातन प्रभात आणि कसला विवेक? आज अखंड भारत पाहिजे म्हणून तुम्ही घेणार का पाकिस्तान आणि बांगला देशाला आपल्यात सामावून? आणि या
देशातले मुसलमान म्हणशील तर.."
"एक्झॅक्टली. मला तर आजकाल असं वाटतं की वुई आर अबाऊट टु विटनेस अनादर रिव्हॉल्यूशन. मराठी भाषेचंच घे...
एका कोपयातून ऐकू आलेल्या आरडाओरडीत सर्वसाक्षीचे पुढचे शब्द विरुन गेले.
----------------------------------------------------------------------
डबल बॅरल दिलीप संतापाने जांभळा झाला होता.
" हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो. त्यानं म्हनलं, केशवसुमारा, बर्या बोलानं परत ल्ह्यायला लाग, तरीबी केशवसुमार काय तोंडातली गुळनी सोडंना. मी म्हनलं, मायला आता एक लेखच लिहितो,"रसिकाग्रणी तात्या आनि मुजोर केशवसुमार". लायब्रीतनं सात पुस्तकं आनली आन रात्री दीड वाजंपर्यंत जागून लिवून काडला लेख. डोळं बग माझं आजुन सुजल्यागत दिसत्यात. आन हितं येऊन बगतो तर काय, ह्यो केशवसुमार तात्याच्या कुल्ल्याला कुल्ला लावून बसलेल्या. गणिम सूर्याजी पिसाळ..."
" हे बघ दिलीप.." प्रमोद त्याच्या दंडाला धरुन म्हणाला. "मलाही कधी कधी त्वेषानं वार करावासा वाटतो. मीही कधीतरी एकदा 'सहमत नाही' असं लिहून बघणार आहे. पण काय करणार सांग."
"लोकशाही तत्वांचा प्रचार आणि प्रसार या तत्वाशी प्रामाणिक राहिल्याचा मिसळपावला अभिमान वाटतो, दिलीप" विसोबा म्हणाला. "व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार आणि दडपशाही व कंपूबाजीमुक्त वावर हेच धोरण आपण आजवर सांभाळलेले आहे. मी बघ कसा जनरल डायरला रिटायर करून नवीन संपादक मंडळाच्या हातात संपादन सोपवून मोकळा झालो आहे. "
"पन तात्या, तुज्या संपादक मंडळात आमची वर्दी न्हायी लावलीस तू. मी न्हाई, प्रकाश घाटपांडे न्हाई, प्राजू न्हाई, गारंबीचा बापू न्हाई, नाना चेंगट न्हाई... यवडंच काय पन धोंडोपंतबी न्हाई. तू निवडलंस ते पोष्टमन, किमयागार आन आपासाहेब चौघुले या तिगास्नी. ह्ये काय तुजं कळंना राव..."
----------------------------------------------------------------------
"बरोबर." सर्किट म्हणाला. "त्याचबरोबर सदस्यांचा अनामिक रहाण्याचा मूलभूत अधिकार जपण्याच्या कामात माझा खारीचा वाटा आहे, याचा मला सार्थ आनंद आहे."
"आता हेच बघ दिलीप, वादग्रस्त मुद्द्यांचे मिसळपावला काही वावडे आहे असे नाही. 'ज्योतिषविषयक लेख वाचण्यापासून कसा बचाव कराल?' हा प्रकाश घाटपांडेचा लेख घे, किंवा 'सरळ, सोप्या मराठीत प्रतिसाद कसे द्यावेत' हा मुक्तसुनिताचा लेख घे' नाहीतर
अगदी अलीकडचा 'उथळ आणि बटबटीत प्रतिसादांपासून सुटका' हा छोट्या डॉनचा लेख बघ... इथे सगळ्यांनाच मुक्त वावराला वाव आहे."
"हेच म्हणतो." सर्किटने सिगरेट पेटवली. "मध्ये आपण 'मला आवडलेले आंतरजालावरील साहित्य' ही स्पर्धा जाहीर केली होती. त्यात दोनच एंट्रीज आल्या होत्या. 'उडत्या छबकड्या' वर माझा लेख आणि 'केशवसुमाराच्या विडंबनांतील प्रतिमा आणि प्रतिभा -एक तुलनात्मक अभ्यास' ही बेसनलाडूची एंट्री... पण आपण नाउमेद झालो का? नाही..."
"ग्रेट, सिंपली ग्रेट.." आता विजुभाऊने रिंगणात प्रवेश केला. "अरे, चार मराठी माणसं एकत्र आली की भांड्याला भांडं लागणारच दिलीप. पण चांगल्या गोष्टीचं कौतुक करणारेही आहेतच की इथं. आता तू मध्ये 'मला जबरदस्त आवडलेला एक आंतरजालीय दिवाळी अंक' या विषयावर लिहिलंस. आम्ही दिल्या की नाही - दिल्या म्हणजे तू नाहीस बरं का - तर आम्ही घातल्या की नाही प्रतिक्रिया? मी आणि सर्वसाक्षीनं मिळून 'मुघल संस्कृतीने आपल्याला काय दिले? ही मालिका लिहिली, तर तासाभरात बारा प्रतिक्रिया. तात्याचे लेख बघ 'बाबुजींच्या गाण्यातल्या हुकलेल्या जागा' आणि 'भाईकाका कुठे घसरले?' -तर 'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही'या आशयाच्या पंचेचाळीस प्रतिक्रिया. तात्पर्य काय, तर असं मनाला लावून घ्यायचं नसतं... "
"बरोबर आहे हां" आतापर्यंत गप्प बसलेला संजिव म्हणाला. मलाही हाच अनुभव आहे. 'सकाळी तोंडसुद्धा न धुता क्वार्टर लावण्याने आलेली प्रचिती' या माझ्या लेखाबाबत. त्यावेळी तर माझी ओळखही नव्हती कुणाशी."
----------------------------------------------------------------------
इकडे इनोबा, धमाल मुलगा आणि पिवळा डांबिस 'दिसामाजी काहीतरी वैचारिक वाचनाचे फायदे' या विषयावर गंभीरपणे बोलत होते.
"त्याचं काय आहे धमु.." इनोबा म्हणाला. "धमु नका रे म्हणू मला.." धमाल मुलगा कळवळला. "का? त्यात काय वाईट आहे? आता याला आपण पिडा म्हणतो, त्याला काही वाटतं का त्याचं?"
"ते ठीकच आहे रे. छोट्या टिंगीलाही आपण छो टि असंच म्हणतो, पण ते जाऊ दे. ते वैचारिक काय म्हणत होतास तू?"
"हां, तर इथं लिहिताना आपण काहीतरी गंभीर आणि वैचारिक लिहिलं पाहिजे. सारखं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकांसारखं कुठं या अण्णाला शुभेच्छा, या दादाचं अभिनंदन असं करत राहण्यात काही हशील नाही, काय?
----------------------------------------------------------------------
असे काथ्याकूट सुरुच राहिले!
----------------------------------------------------------------------
डिस्क्लेमरः वरील लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.
----------------------------------------------------------------------
वाचने
23233
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
झकास मैफल जमलीय!
In reply to झकास मैफल जमलीय! by पिवळा डांबिस
बाकी लेख
:))
आमचा एक साधा सोपा प्रतिसाद ..
लेख एकदम छान..
ज ब र द स्त
In reply to ज ब र द स्त by बेसनलाडू
+१
"बिझारो वर्ल्ड !"
जबरा
वाहवा
झक्कास ...
तुमी खरेच जब्बर लिवताय्.....
हा हा हा!!
शिव्या! :)
स्पेशल टच!
च्यामारी,
:)
रिटर्न ऑफ जी. एं. [आपलं जेडाय]
In reply to रिटर्न ऑफ जी. एं. [आपलं जेडाय] by सहज
जी. ए. वाचन बंद आहे.
मजा आला.
सर्वसाक्षी आणि विजुभाऊचे वेगळेच चालले होते.
बरे झाले मला ते तरी समजले
In reply to बरे झाले मला ते तरी समजले by विजुभाऊ
अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र...
:)
भट्टी मस्त जमली आहे.
मस्त......
जियो रावसाहेब
असामान्य चवीचा .......
खयाली पुलाव , कित्ता बी खाव !
अबब
वा, रावसाहेब वा !!!
संकेतस्थळावरील व्यक्तिचित्रांची चांगलीच खेचली आहे. लेखन बहारदार झाले आहे आणि ते आवडले.
बाकी आमच्या तोंडी खालील लेखनात ओव्या जरा लैच झाल्या, जाऊ द्या !!!! या निमित्ताने आपण आपली हौस तर भागवून घेतली. :)
" हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो.
सहमत !!!! ;) हाहाहाहाहा:)))))))))
'एक जबरदस्त फसलेला आंतरजालीय दिवाळी अंक' या विषयावर आपण कधीतरी आमचे खिसे चाचपणार हेही आम्हाला माहित होतं :)
खयाली पुलावात 'दिलीप' च्या मसाल्याचा लै वापर झाल्यासारखा वाटला !!!! :)
आणि जी.ए.कुलकर्णी हा कालबाह्य झालेला लेखक आहे, असं माझं मत आहे" कर्ण जोरात म्हणाला. हे शक्य तरी आहे का ? जी. ए.चे जगभरात दोनच वाचकच शिल्लक राहिले आहेत, एक आपण आणि आमचा मित्र कर्ण ;)'ज्योतिषविषयक लेख वाचण्यापासून कसा बचाव कराल?' हा प्रकाश घाटपांडेचा लेख घे,
:)))))) ह. ह. पु. वा. च्यायला आमच्या घाटपांडे साहेबांनी काय लिहावे आता !!!
अवांतर :) लेखनाच्या या आकृतीबंधाचा वापर आपल्यापासुनच आम्ही शिकलो. त्यावर आम्ही दोन प्रयोग केले. आणि आपलेही दोन झाले. आता नवीन काही तरी शोधा बॉ !!! :)
आपला
दिलीप
(डबल बॅरलवाला)
सन्जोप राव
In reply to सन्जोप राव by सृष्टीलावण्या
शब्दकळा
In reply to शब्दकळा by मुक्तसुनीत
बरोबर
In reply to बरोबर by धमाल मुलगा
:)
In reply to बरोबर by धमाल मुलगा
हां रे धमुल्या
In reply to हां रे धमुल्या by सृष्टीलावण्या
अग्रासन नको रे बाबा!!
नाकावर लिम्बु घासणे?
भगिनिमंडळावर तुमचा एवढा आकस का हो?
In reply to भगिनिमंडळावर तुमचा एवढा आकस का हो? by विजुभाऊ
:)
खयाली पुलाव झाला.....आता पियाली पुलाव
पुलाव आणि बिर्याणी यात एक्झॅक्ट फरक काय
In reply to पुलाव आणि बिर्याणी यात एक्झॅक्ट फरक काय by विजुभाऊ
मला माहित असलेले काही फरक
In reply to पुलाव आणि बिर्याणी यात एक्झॅक्ट फरक काय by विजुभाऊ
फरक....