Skip to main content

व्हेज कटलेट

लेखक माधुरी दिक्षित यांनी मंगळवार, 08/12/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : आपल्या आवडीनुसार कोण्त्याही भाज्या बटाटा, मटार, गाजर, बीट, फ्लावर,कोबी, ईत्यादी, भाज्यांचे प्रमाण ही आपल्या आवडीनुसार. १ चमचा आल +लसुण +मिरची पेस्ट, चवीनुसार गरम मसाला, चाट मसाला,मीट्,कोथिंबीर,१ मोठा चमचा भाजलेला रवा, तेल क्रुती: १)बटाटे उकडून कुस्करुन घ्या,मटार हि वाफवुन बारीक करा,गाजर आणि बीट किसुन वाफवुन घ्या २)सगळ्या भाज्या,कोथिंबर,आल +लसुण +मिरची पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला , मीठ एकत्र करा मिश्रण सैल वाटल्यास एखादा ब्रेड स्लाईस बारीक करुन घाला. ३) ह्व्या त्या आकाराचे कटलेट करुन घ्या. ४)तव्यावर थोडे तेल टाकुन त्यावर रव्यात घोळवलेले कट्लेट शैलो फ्राय करा. ५)कटलेट तयार आहेत.

वाचने 13335
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

नेत्र सुख हवे. त्या शिवाय प्रतीसाद देणार कसा? (मला बोलवा फोटो काढायला, बरे काढतो असे मित्र म्हणतात )

फोटो ताक्लेत प्ण दिसत नाहीत, काय करु :(

अग बै फॉतो हवाच ना :t चुचु

फोटो?????? फोटो नसल्याने टार्‍याचे डोळे पाणावले... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

शिनेमा व ग्लॅमरस वातावरणातुन तुम्हाला खाद्यपदार्थ बनवण्यास कसा काय वेळ मिळतो हो? बाकी फोटो व पाकृ अगदी झक्कास जमली आहे. वेताळ

माधुरी अग्दी सुगरण हो !!! ;;) चुचु

मस्तच! -- मेघवेडा.

छान ! --अवलिया

छानच आहेत कटलेट्स! फोटू टाकल्यामुळे धाग्याला शोभा आली. रेवती

मस्तच. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सहीच आलेत. चवीलाही तितकेच मस्त असणार यात शंका नाहीच. फक्त उचलून खाता येत नाहीत ही हळहळ वाटतेय.:(

झकास्स्स... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

तोंडात लाळेचा पूर्र आला हो..!! - कोकणी फणस