Skip to main content

बियर उपवासाला चालते का?

बियर उपवासाला चालते का?

Published on मंगळवार, 08/12/2009 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 3038
प्रतिक्रिया 44

चालते. सिगारेट हा मुख्य वास बियर उपवास.

अन्य काही बाही X( चुचु

पका काका अहो बियर फक्त उपासालाच चालते. इतरवेळी हार्ड ड्रिंक्स. ©º°¨¨°º© पियर ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>बियर फक्त उपासालाच चालते. इतरवेळी हार्ड ड्रिंक्स. :-)

बियरनी उपासाला चालायला आमची हरकत नाही. चखण्याला शक्यतो बटाटा वेफर्स,केळा वेफर्स, साबुदाणा खिचडी, खारे शेंगदाणे, बटाट्याचे पापड किंवा फलाअहार निवडावा. उपवासाच्या ईतर रेसिपीज सुचवाव्यात आणि पुण्यफलप्राप्ती मधे थोडासा हातभार लावावा अशी मा.गणोजिपंतांना विनंती करतो घाटपांडेकाका मतदान केल आहे पार्टी कधी ते बोला.

आधी एक टॉप टू बॉटम लार्ज मारायचा..... (व्हिस्की, रम काहीही) त्यानंतर बघा... चालायचं विचारताय ती तुम्हाला घेवून उडेल ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आपण चालवलं की सगळं चालतं! :D ही घ्या केली आम्ही तुमचा उपास सोडण्याची सोय! ;) (कोणत्याही दारवा न घेणारा)चतुरंग (विशेष सूचना - दारु न पिण्याबद्दल सारखं सारखं का सांगावं लागतं असं कुणीही खव मध्ये येऊन विचारु नये. ;) )

In reply to by श्रावण मोडक

अवांतर विचारण्याचे धाडस करणार्‍या श्रामोंचा निषेध!! ~X( (अधिक चर्चेसाठी कुठे जायचे ते ठाऊक असेलच?! ;) ) (साक्षात संपादक)चतुरंग

In reply to by श्रावण मोडक

बियर उपवासाला चालते की नाही याच विषयावर या धाग्यावर चर्चा अपेक्षित आहे. कृपया वैयक्तिक चर्चेसाठी खव किंवा व्यनीचा वापर करावा. --अवलिया

In reply to by श्रावण मोडक

येथे नविन संपादकांचा दृष्टीकोण काय असेल हे बघायला उत्सुक आहे. (हल्ली ब्रा म्हणता ब्राम्हणहत्या होऊन प्रतिक्रीया उडवल्या गेलेला) टारोबा

In reply to by टारझन

देवाची करणी आणि बियरमधे पाणी ! देवाचे नाव घेवुन उपवासाला बियर प्या नाहीतर रसभंग निश्चित होईल. --अवलिया

बाकी हा प्रश्न आहे ,का आमंत्रण हो काका ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रश्न हा उपदेश देण्यासाठी विचारला आहे की आमंत्रण देण्यासाठी विचारला आहे त्यावर उत्तर अवलंबून आहे ;)

बियर कधीही चालते .. पळते सुद्धा .. दुसर्‍यांच्या उपवासाशी तिला कै घेणं देणं ? -- टेडी बियर सद्ध्या ० प्रतिसाद ० लेखन मोड मधे आहोत पण ही प्रतिक्रिया केवळ "चुचु"साठी. चचे उडली तर माफ कर गं बये

दुस-याच्या पैशाने कधीही (उपवासाच्या किंवा बिनउपवासाच्या दिवशी) चालते.. :) स्वतःच्या पैशाने ज्या दिवशी प्यायची वेळ येते तो दिवस उपवासाचा समजुन न पिणे चांगले ! :) --अवलिया

चालेल की नक्कीच! न चालणार्‍यांनी 'बार्लीचे पाणी' किंवा 'बार्लीचे सत्त्व' समजून प्यावी! परवाच एकाने मला "पिईन तर 'उपवाशी', नाहीतर उपाशी!" असा पण केल्याचे सांगितले! -- मेघवेडा.

वा वा!! छान छान !!! चालुद्या चालुद्या !!!! पीताना आम्हालाही बोलवा म्हणजे झाल. -माझी खादाडी.

सर्वप्रथम तुम्ही उपवास करता का? करत असाल ते श्रद्धा म्हणून का उपवासाचे पदार्थ आवडतात म्हणून? जर दुसरे असेल तर त्यात नेहमीचे कशाला घ्या :) शिवायः आता नीरा चालते पण नीरेपासूनच तयार झालेली ताडी चालते असे कोणी म्हणल्याचे ऐकलेले नाही. :-) कारण अर्थातच ते अल्कोहोलीक पेय आहे. तेच बीयरच्या बाबतीत लागू होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला नॉन-अल्कोहोलीक बियर मिळाली तर चालू शकेल. उ.दा. "रूट बियर" कारण त्यात कॅलरीज सोडल्यातर बाकी काहीच नाही आहे ;) : Nutrition Facts Serving Size 08.1 fl oz (1 cup / 240 ml) Servings Per Container 01 Amount Per Serving Calories 120 Calories from Fat 00 % Daily Value* Total Fat 00 g 0% Saturated Fat 00 g 0% Trans Fat 00 g Cholesterol 00 mg 0% Sodium 45 mg 2% Potassium 00 mg 0% Total Carbohydrate 32 g 11% Dietary Fiber 00 g 0% Sugars 31 g Protein 00 g Vitamin A 00% Vitamin C 00% Calcium 00% Iron 00% *Percent Daily Values are based on a 2,000-calorie diet. Your Daily Values may be higher or lower depending on your calorie needs.

In reply to by विकास

नेहमीप्रमाणेच... अगदी मुद्देसूद ( आणि मुद्देमालासकट ) निरुपण!! जय हो!! =D> =D> =D> स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

बीयर ही भुसार प्रकारच्या धान्यापासून बनते. बरीचशी भुसार धान्ये उदा: गहु बाजरी ज्वारी . वगैरे त्या ऐवजी अधान्यपासून बनलेली म्हणजे उसाच्या मळीपासून बनलेली रम हा पर्याय योग्य ठरतो.

In reply to by विजुभाऊ

विजुभौ याच न्याया नुसार मग आमच्या मोहाच्या फुलाने कुणाच काय घोडं मारल हो :? (पहिल्या धारेतला) -गण्या.

In reply to by विकास

बाजरीचे नाव वाचुन आनंद झाला. ( बाजरीच्या भाकरीवर वाढलेला) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मद्यपानाच्या बाबतीत असे आढळून येते की, ऋग्वेदामधे सोम आणि सुरा या विषयी उल्लेख येतात. 'सोम'रस देवतांना चालत होते. आता 'सोम' मधे कंटेंट काय आहे, याची मला माहिती नाही. पण ज्या अर्थी 'सोम' देवांना चालते. त्या अर्थी 'पेया'त परिवर्तन होऊनम जर त्याचे आधुनिक स्वरुप 'बियर' असेल तर देवतांच्या उपवासाला चालायला हरकत नसावी. च्यायला याच्यातही एक भानगड आहे. 'सोम' पवित्र तर 'सुरा' अपवित्र. आता 'सुरा' कशापासून बनते तेही माहिती नाही. तेव्हा सारासार विचार करुन आम्ही या निष्कर्षाला येतो की, उपवासाला बियर चालत असावी. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण ज्या अर्थी 'सोम' देवांना चालते. त्या अर्थी 'पेया'त परिवर्तन होऊनम जर त्याचे आधुनिक स्वरुप 'बियर' असेल तर देवतांच्या उपवासाला चालायला हरकत नसावी
सोम देवांना चालते. पण उपवासाच्या वेळी चालते का? हा मुळ प्रश्न इतर वेळी बिअर चालते पण उपवासाच्या वेळी चालते का? हा चिंतनीय प्रश्न. विकासने सांगितल्या प्रमाणे उपवसाची म्हणुन वेगळी बियर आली तर बिअर खपावर त्याचा किती परिणाम होईल हा मार्केटिंगचा आढावा होउ शकतो. एके काळी उपवासाचे पदार्थ हॉटेल मधे मिळु शकतात हेच कर्मठ लोकांना मान्य नव्हतं. ( बिअर पिताना चिंतनशील) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मोहाची, द्राक्षाची, बटाट्याची, ताडा/माडाची दारू चालावी असे वाटते. तृणधान्याची दारू (बियर, व्हिस्की) उपासाला चालू नये असे वाटते. ("आंबलेले किंवा गाळलेले पदार्थ चालत नाहीत" असे माहीत नाही.) उपवासाच्या पदार्थांचे धर्मशास्त्रात काय उल्लेख आहेत? कारण उपासाचे कित्येक पदार्थ गेल्या ४-५ शतकांतच भारतात पोचलेले आहेत - बटाटा, रताळे, मिरच्या, साबूदाणा... @विकास : उपवासाचे पदार्थ हा एक स्वयंपाकप्रकार म्हणून आवडतो. वर्‍याच्या तांदुळाच्या भाताबरोबर दाण्याची आमटी, मोहरी टाळून जिर्‍याची फोडणी, वगैरे स्वाद एकत्रित जिव्हा-अनुभव म्हणून मजेदार असतात. "अमुक अन्नाबरोबर कुठले पेय सर्वात रुचकर लागणार?" हा प्रश्न चघळण्यासाठी "जिभेचे चोचले" ही श्रद्धा ;-) पुरते.

साबूदाणा, बटाटा हे पदार्थ परदेशातून आलेले आहेत व ते उपासाला चालतात. त्यावरून परदेशी दारू चालते असा (सोयिस्कर) निर्णय घ्यावा असे मला वाटते. (देशी दारू चालणार नाहीं, तरी मोसंबी, नारिंगी, हातभट्टीची दारू वर्ज्य समजावी.) ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

मी बर्‍याचदा निर्जळी उपवास/एकादशी करतो.. आणि त्या दिवशी मी बर्फसुध्दा न घालता दारू पितो.. ;-) पाणी चालत नाही ना!! काय करणार??? - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

बियर उपवासाला चालते पण बियरला उपवास चालत नाय हे नक्की

हात शिवशिवतायत 'अवांतर' प्रतिसाद द्यायला.. पण जाऊदेत!! - कोकणी फणस

हात शिवशिवतायत 'अवांतर' प्रतिसाद द्यायला.. पण जाऊदेत!! - कोकणी फणस

बियर उपवासाला चालते चकणा म्हणुन हे ट्राय करा.......................... From =================================== From

गेल्या सहस्रकात भारतावर परकीय आक्रमण झालं व अनेक शतके परकीयांची सत्ता असल्यामुळे धर्म टिकवणं कठीण होतं. सुमारे ३०-४० पिढ्यांच्या या काळात एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जेव्हा धार्मिक कृत्यांबद्दल वैचारिक देवाणघेवाण झाली त्यावेळी त्यातल्या मुख्य बाबी पुढे सरकताना दरवेळेस काही त्रुटी राहिल्या असणार. (याबद्दल त्या पिढ्यांनाही दोष देणं योग्य नाही. कारण पारतंत्र्यामध्ये "अस्तित्व टिकवणे" ही बाबसुद्धा आयुष्यभर पुरणारी असणार.) परिणामत: धर्म टिकवण्याच्या ब्युरोक्रॅटिक प्रयत्नांमध्ये व्रतवैकल्यांमागील पार्श्वभूमी समजून घेण्यात कुठेतरी लोच्या झाला आणि विपरीत रूढी अस्तित्वात आल्या. "उपवास" ही संकल्पना त्यातलीच एक. उपवासाचा मुख्य हेतू देवाचं स्मरण, देवाची आराधना, इ. करणे हा आहे. त्यात अनुष्ठान वगैरे असल्यास जागरण करावं लागतं. जागरण करण्यासाठी मिताहार घेणे आरोग्याच्या दृष्टीने जास्त चांगलं. ज्यांना शक्य आहे ते काहीही न खाता/पिता उपवास करू शकतात. पण धर्मात किंवा अध्यात्मात अशी सक्ती केलेली नाही. आपल्याला जेवढ झेपेल आणि जे मनापासून करणं जमेल तेवढंच करावं. उपवासाच्या दिवशी काय खावे/प्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. साबुदाणा, बटाटा, इ. गोष्टी पूर्वी भारतात पिकत नसत. मिरची भारतात पिकत नसे. या गोष्टी उपवासाला कशा चालतात मग? "कदाचित आपल्याकडे पिकत नाही, म्हणून खाललं तर चालेल", असा सोयीस्कर विचार पूर्वीच्या काळात झाला असावा. फलाहार, दूध या गोष्टी पचायला हकल्या असल्यामुळे उपवासाला चालत असाव्या. उपवासाला चालवल्या गेलेल्या गोष्टी चालण्यामागे आणखी एक कारण (माझा अंदाज) म्हणजे या सर्व गोष्टी रोजच्या वापरातल्या गोष्टींपेक्षा महाग असल्यामुळे पूर्वी गरीबीच्या काळात या वस्तूंचे पदार्थ अत्यंत कमीप्रमाणात होत असावेत. माझी आजी सांगते की तिच्या लहानपणी उपवासाच्या दिवशी फक्त वाटीभर साबुदाण्याची खिचडी (पूर्ण कुटुंबासाठी) होत असे. दोन घास खिचडी आणि पाणी एवढाच काय तो उपवासाच्या दिवशीचा आहार. एवढाच आहार असल्यास शेंगदाणे वगैरे वापरण्याचाही उलगडा होऊ शकतो. हाय कॅलरी असलेल्या वस्तू इतक्या अल्प प्रमाणात खालल्या जाणार असतील तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी त्या आवश्यकही असतील. माझं वैयक्तिक मत - आजच्या तारखेला "उपवासाला काय चालते? चालवून घ्यावे?” हा प्रश्न निरर्थक आहे. एकतर धार्मिक असणे किंवा नसणे हा वैयक्तिक प्रश्न आहे. संन्याशाने लग्न केल्यामुळे त्याला वाळीत टाकायचे दिवस मागे गेले आता. आपल्याला संन्यास घ्यायचा आहे की संसार करायचा आहे की दोघांमधला सुवर्णमध्य साधायचाय हे ठरवण्याइतकं व्यक्तिस्वातंत्र्य कायद्याने सर्वांना दिलं आहे. आता मी धार्मिक असेन तर वरील प्रश्न मला पडेल. अर्थात त्याचं उत्तरही माझं मलाच मिळेल. बियर प्यायल्याने जर उपवास मोडला असं "मला" वाटत नसेल, तर उपवास मोडला नाही. आणि साबुदाणा खिचडी खाऊन "उपवास मोडला" असं "मला" वाटलं पण इतरांना वाटलं नाही तरी उपवास मोडला. -प्रशांत

In reply to by प्रशांत उदय मनोहर

सहमत!.. सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/

In reply to by प्रशांत उदय मनोहर

अगदी लॉजिकल मुद्दा प्रशांत. मी स्वतः उपासापासून ४ प्लेट दूर असल्याने ह्याबद्दल फार विचार केला नव्हता पण आता ह्यामागच्या "फिलॉसॉफी"चं आकलन झालं. धन्यवाद

बियर उपवासाला चालते का?>>>>>>>> हा तर लय सोपा प्रश्न मालक. एक काम करा. बीयरची बाटली टेबलावर उभी ठेवा. अत्यंत गंभीर चेहरा करुन त्या बाटलीला प्रश्न विचारा. की बये माझा उपवास आहे. आज मी बीयर पिली तर, कबुल है (मुस्लिम काजी स्टाइल) / डु यु अ‍ॅक्सेप्ट ( पाद्री स्टाइल). जर बाटली आडवी झाली तर नाही चालत. जर उभेच राहिली तर चालते. (डावा कौल उजवा कौल ह्या टाइप हो म्हणजे हिंदु धर्म देखील कव्हर झाला.) हे आमच काहिबाहि.

साबूदाणा फर्मेंट करता आल्यास सगळेच प्रश्न चुटकीसरशी सुटतील! (फ्रेंचांना विचारले पाहिजे कारण त्यांनी बडीशेप यशस्वीपणे फर्मेंट केली आहे.) ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

In reply to by सुधीर काळे

अशी साबुदाण्याची बियर करता आली तर नक्की उपवासाची बियर म्हणुन पब मध्ये नक्की जोरदार खपेल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अंमळ जास्त झाली की बियरही चालते, मग उपवासाची असो वा मुखशुध्दीची !!! ;) आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

हा कौलच मुळी परस्परविरोधी आणि दांभिक आहे. जो बिअर पितो तो उपासाच्या वाटेला जात असेल असे वाटत नाही. तेंव्हा उपासाला बिअर चालेल का हा प्रश्नच अप्रस्तुत वाटतो. हे म्हणजे वारांगनेने वटसावित्रीची पूजा करु का असे विचारण्यासारखे आहे. असो. बिअर कुठेही आणि कधीही चालते(फक्त स्वतः गाडी चालवायची असेल तर नाही चालणार!) हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|