खालील मत हे मिसळपाववर प्रस्तुत होणार्या लेखन मालिकांच्या प्रेमापोटी आणि पुढील भागांच्या प्रतिक्षेपोटी आणि उत्सुकतेपोटी... (गैरसमज नसावा.)
अहो वाट वाट म्हणजे बघायची तरी किती!!
आज येईल पुढचा भाग... नाही उद्या नक्की येईल... नाही परवा येईल बहुतेक... या आठवड्यात तरी यायला हवा... ह्या महिन्यात येईल असं वाटतंय... पण छ्या...
तात्यांचे रौशनी, सालस, धोंडोपंतांचे अच्युत गणपुले... एक ना अनेक! आम्ही मात्र ते वाचण्यासाठी इथे तिष्ठत असतो.
मान्य आहे कामाच्या रगाड्यात नाही जमत एखाद्याला किंवा नाही बैठक जमत तशी जी त्या दुनियेत पुन्हा घेउन जाईल आणि शब्द न शब्द आपोआपच स्फुरेल... ह्रदयातून... अगदी बेमालूमपणे...
अहो, पण ह्या व्यक्ती, त्यांचे पैलू तर आम्हांला नकळतपणे जगायला शिकवतात, आमच्या कामाच्या रगाड्यात आम्हांला इंद्रधनु दाखवितात, घटकाभर स्वतःचे दु:ख विसरुन हसवतात, स्वत:चा प्रवास थोडावेळ बाजूला ठेवून कोणी एक किती खडतर भुमिकेतून जाउ शकतो याचे शाश्वत दाखवतात!
काय मिसळपावकरी तुमचे काय मत आहे... तुम्ही बघताय की नाही वाट रौशनी, सालस, अच्युत गणपुले आणि अजून कितीतरी.. ज्यांची गाडी मिसळपाववर येता येता कुठेतरी अडून बसलिये...
एक शिफारस : सर्व भाग लिहून अद्ययावत पूर्ण झाले की मग ठराविक अंतराने एक एक करून मिसळपाववर चढवावेत.
वाचने
5238
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मान्य
सहमत...सहमत..
क्षमस्व..
Gentle Reminder
In reply to क्षमस्व.. by विसोबा खेचर
किंवा
In reply to Gentle Reminder by मनस्वी
यात माझी सफर सुद्धा धरा....
हाहाहा...
चला रे....
वास्तव..
In reply to चला रे.... by ब्रिटिश टिंग्या
:(
In reply to वास्तव.. by विसोबा खेचर
४०० - ५०० भाग
In reply to चला रे.... by ब्रिटिश टिंग्या
+ १