दुधी भोपळ्याचे रायते
साहित्य : किसलेला दुधी भोपळा १ कप, गार दही २ कप( सायीचे असेल तर छान), बारीक चिरलेला
कांदा १ मोठा चमचा , बारीक चिरलेली कोथिंबीर १ मोठा चमचा, बारीक चिरलेला टोमॅटो १ मोठा चमचा,
जीरे पूड १ चमचा, चवीनुसार मीठ, साखर.........
कृती : साले काढुन किसलेला भोपळा पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्या आणि भोपळा थोडावेळ गार करायला ठेवा.
तोपर्यंत दही चांगले फेटून घ्या. मग ह्या दह्यामधे सगळे साहित्य टाकून चांगले मिक्स करा. दही गार असल्यामुळे
तुम्ही हा रायता लगेच खाऊ शकता किंवा १ तास फीज़ मधे ठेवा. हा गार रायता तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता.


वाचने
5059
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
वाह!
मागच्याच
वा ! छान !!
मस्त्च आहे
चलू
सुंदर !!
मस्त