Skip to main content

मी ऑफ़िसमधे आणि घरी बनवलेल्या काही पुष्परचना...

लेखक श्रद्धा. यांनी शुक्रवार, 20/11/2009 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 21791
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

श्रद्धा फुल खुप छान दिसता आहेत ग :) फोटो मोठे कर ना जरा , फुल अजुन छान दिसतील

आपल्या पुष्प रचनेचा मोठा करयाचा एक प्रयत्न (पण पिक्सल फाटतायत मोबाईल कॅमेरा वापरला आहे का? किती मेगा पिक्सल?) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

छान श्रध्दा !! टुलीप आणी जर्बेराचा वापर वाढवला की अजुन शोभा येते !! सू हा स...

छान.. --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सकाळ पासुन पहातोय हा तिसरा फोटो. दर वेळी फोटो बदल तोय. कमाल आहे. आधीचे पण छान होते, ते कुठे गेले :/

मस्त आहेत पुष्प रचना. मी आणलेलं पुस्तक तसच पडलय. आता हे फोटो पाहून काहीतरी करुन बघावे असे वाटायला लागले.

ज ब रा !!!! =D> =D> =D> --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

वाह वाह ! एकदम मनमोहक. 'फुले म्हणजे देवाघरची मुले' असे कोणीसे म्हणलेच आहे. *हा विनोद आहे, लगेच चुक दाखवण्यासाठी जीवाचा आटापीटा करु नये.* ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

'फुले म्हणजे देवाघरची मुले' असे कोणीसे म्हणलेच आहे. हे पवित्र वचन आपलेच आहे. वेताळ

In reply to by वेताळ

बा वेताळा तुला तर माहिती आहेच की मी प्रसिद्धी पासुन कायम दुर राहतो ते. ©º°¨¨°º© परानल पाने फुले ©º°¨¨°º© आमचे राज्य

फारच सुरेख रचना. काय हो, जास्वंदाच्याही अशा सुंदर रचना करता येतात का? कारण आमच्या घरच्या जास्वंदानांही भरपूर फुले येतात -क्वचित ४० पर्यंत- पण त्यांचे काय करायचे हे कळत नाही. देवाला इतकी फुले वाहतादेखिल येत नाहीत (तसबिरीच फुलांनी झाकल्या जातात). तेव्हा मी ती अशी पेल्या-मगात भरून ठेवतो. तुम्ही काही रचना दाखवल्यात तर उत्तम! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

सुनिल जास्वंदीची फ़ुले तोडताना नुसती फ़ुले न तोडता साधारण ६/७ इंचाच्या फ़ांदीसहीत जर तोडलीत आणि ती एखाद्या पॉट मधे ठेवलीत तर छान दिसतील. त्याबरोबर जर बागेत गोल्डन दुरांदा असेल अथवा इतर काही शोभिवंत पाने ती पण रचना करताना घालु शकता.छान दिसेल.

In reply to by सुनील

सुनिल जास्वंदीची फ़ुले तोडताना नुसती फ़ुले न तोडता साधारण ६/७ इंचाच्या फ़ांदीसहीत जर तोडलीत आणि ती एखाद्या पॉट मधे ठेवलीत तर छान दिसतील. त्याबरोबर जर बागेत गोल्डन दुरांदा असेल अथवा इतर काही शोभिवंत पाने ती पण रचना करताना घालु शकता.छान दिसेल.

मस्त्च आहेत रचना .खरच क्लास वगैरे केलायस का ?अगदी प्रोफेशनल दिसताहेत.फारच सुरेख.

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

भाग्यश्री मी क्लास नाही केलेला पण माझ्या ऑफ़िसमधे नेहमीच देशी विदेशी पाहुणे येत असतात आणि नेहमीच अशा पुष्परचना बाहेरुन आणणे जमत नाही. तसेच जवळ ग्रीनहाउस असल्याने हवी तशी फ़ुले उपलब्ध होतात मग आम्हीच बनवतो.. कला होती अंगात पण आधी नीट जमत नव्हते... सवयीने छान जमायला लागले...

कधी वाळलेली फांदी किंवा पारंबी, वाळलेली रंगीत पाने, वेली ह्याचा वापरही खूप छान वाटतो. लाकडाच्या छोट्या खोडातही कधी विविध आकार दिसतात अशी खोडे रंगवून पुन्हापुन्हा वापरता येतात. प्रयत्न करुन पहा. चतुरंग

In reply to by विसोबा खेचर

तात्या फुले खरीच आहेत हो....ग्रीन हाउस मधील आहेत सर्व त्यामुळे मस्त असतात ही फुले आणि एकदा आणली की १०/१२ दिवस उत्तम राहतात.पण २ दिवसाआड परत थोडी कटींग करुन रचना केली की झाले.

वाह काय सुरेख सजवली आहेत.. मानल ब्वॉ तुम्हाला. सगळे फोटो एकत्र एकाच धाग्यात दिल्या बद्दल धन्यु.

मलापन आवड आहे अशा डेकोरेशनचि एखादे पुस्तक असल्यास सुचवा चाकरमानि ( साधि राहनि उच्च विचार सरनि)

तुम्ही सजवलेल्या या पुष्परचना पाहून खूप खूप बरं वाटायला लागलंय बघा... नाहीतरी मी जन्माचा प्रेम'रोगी' आहे हो..!!!

हा धागा पुनः वर काढणार्‍यांचे शतशः आभार! ह्या निमित्ताने माझ्या घरच्या जास्वंदीला डोळे भरून पुन्हा पाहता आले! (जास्वंदीवर माझा फार जीव!)