✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
Wed, 11/11/2009 - 17:59  ·  लेख
लेख
  • हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग २
  • हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ३
  • हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ४ (ऑलराऊंडर्स)
  • हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ५

Book traversal links for हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....

  • हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22438 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

मस्त हो

गणपा
Wed, 11/11/2009 - 18:15 नवीन
मस्त हो मॉर्गन राव, पण लेख फार आखडता घेतला आहात. अजुन वाचयल नि फोटो पाहायला आवडतील. बाकी राहुल द्रविड च्या कॉमेंटवरची इयान चॅपल प्रतिक्रिया अत्यंत समर्पक.. जिथे सगळे फलंदाज संपतात आणि गोलंदाज गळतात....तिथे आमचा सच्या सुरु होतो
  • Log in or register to post comments

मस्तच लेख

अमोल खरे
Wed, 11/11/2009 - 18:13 नवीन
मजा आली वाचताना. पुढील लेख येऊद्या पटापट. अवांतर-ह्याच वकार युनुसची अजय जाडेजा ने धुलाई केली होती ते आठवले. बहुदा वर्ल्डकपची मॅच होती.
  • Log in or register to post comments

बंगलोर

मिसळभोक्ता
गुरुवार, 11/12/2009 - 15:57 नवीन
बंगलोर, भारत-पाकिस्तान, वर्ल्ड-कपची क्वार्टर फायनल. पण त्या म्याच मधला फक्त एक क्षण आठवतो. वेंकटेश प्रसाद ला आमिर सोहेल ने चौकार मारला, आणि ब्याट बाऊंडरीकडे दाखवत खूण केली, की आता पुन्हा बघ ... दुसर्‍या बॉल ला प्रसादने सोहेलचं फर्निचर वाजवलं... -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

दुसर्‍या बॉल ला प्रसादने सोहेलचं फर्निचर वाजवलं...

मदनबाण
गुरुवार, 11/12/2009 - 16:07 नवीन
http://www.youtube.com/watch?v=y1s3aORd5Ws&feature=PlayList&p=4F4EBF36D09EA22B&playnext=1&playnext_from=PL&index=32 हाच तो क्षण... नेहमी लक्षात राहील असाच आहे. आमिर सोहेल चा माज मस्त उतरवला !!! मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

आजोबांनी

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 11/11/2009 - 18:14 नवीन
आजोबांनी आपल्या नातवाच्या केसांमधून हात फिरवावा तश्या मायेने दादा ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूला कुरवाळायचा एवढ्यासाठीच आपण गांगुलीचे पंखे आहोत... भारी जमलय , अजुन नविन शोपीसेस वाचायला आवडतील ....
  • Log in or register to post comments

तुमच्या

मदनबाण
Wed, 11/11/2009 - 18:15 नवीन
तुमच्या मनातल्या शोकेस मधले हे पहिले काही शोपीसेस भारी आवडले...अशीच शृंखला चालु ठेवा. :) (सचिनचा भक्त) मदनबाण..... If Cricket Is A Religion, Sachin Is God
  • Log in or register to post comments

जबरदस्त हो

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/11/2009 - 20:00 नवीन
जबरदस्त हो मॉर्गन साहेब. Image removed. हा आमचा दादा, ह्याच्यावर आमचा भारी जीव (आणी त्याचा नगमावर भारी जीव). अंमळ वादविवादात सापडला पण शेवटी दादा तो दादाच. ©º°¨¨°º© परा गांगुली ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्त लेख

संदीप चित्रे
Wed, 11/11/2009 - 20:29 नवीन
खूप छान आठवणी जाग्या केल्यात. गावसकरचा स्ट्रेट ड्राईव्ह, कपिलचा आउट स्विंगर, विश्वनाथचा स्क्वेअर कट, होल्डिंग आणि हॅडलीचा रन अप, इम्रान नावाचं देखणं वादळ आणि बोथम नावाचं वादग्रस्त वादळ, विव रिचर्डसचा बेदरकारणा..... लिहिते रहा; अजून भरपूर जणांबद्दल लिहू शकाल
  • Log in or register to post comments

+ १ अगदी अगदी असंच म्हणतो!

चतुरंग
गुरुवार, 11/12/2009 - 21:36 नवीन
लिहिते रहा. अजून बरीच मांदियाळी आहे. Image removed. (जॉन्टी र्‍होड्सच्या अफलातून फिल्डिंगचा चाहता)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

जबर्‍या........

जे.पी.मॉर्गन
Fri, 11/13/2009 - 17:21 नवीन
जाँट्याचं नाव यायलाच पाहीजे... ह्या माणसानी फील्डिंगची परिभाषाच बदलून टाकली नाय??? म्हणजे भारी फील्डर लई होते आणि आहेत.. पण "ह्यासम हाच".. सच्याची बॅटिंग तशी जाँट्याची फील्डिंग ! इंझमामचा ९२ च्या वर्ल्डकप मधला रन आऊट आणि सच्याचा आफ्रिकेत घेतलेला कॅच !!!! थरारक वगैरे विशेषणं पण कमी पडतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

जबरदस्त ...

छोटा डॉन
Wed, 11/11/2009 - 20:30 नवीन
मॉर्गन साहेब, एकदम जबरा लेख बॉस ... शैली एकदम खुसखुषीत आणि अप्रतिम आहे, बर्‍याच वाक्यांना दाद द्याविशी वाटयेत. पण लिखाण थोडं लांबवा बॉ. कणेकर आणि संझगिरी यांनी जेव्हा पासुन दळण टाकायला सुरवात केली त्यानंतर क्रिकेटरवरचं एवढं सुंदर लिखाण आजच वाचतो आहे, खुपच मस्त. अजुन येऊद्यात ... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments

मस्तच

प्रभो
Wed, 11/11/2009 - 22:23 नवीन
मस्तच लिव्हलय भाऊ... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

क्या बात

Nile
गुरुवार, 11/12/2009 - 00:03 नवीन
क्या बात है! कोपर्‍यावरच्या पानवाल्याच्या दुकानातील १४ इंचेस कलर टीव्ही वर क्रिकेट मॅचेस पहायचो ते दिवस आठवले! तुम्ही सांगीतलेल्या शॉट्स शिवाय, अझर चा फ्लीक! द्रविड्चे ड्राईव्ह, सचिनचे स्क्वेर कट्स! लाराचे ड्राईव्ह, गिलक्रीस्टचे स्क्वेअर ला ने मारलेले छक्के! बोंबला च्यायला, ह्या विकांताला जावं लागणार क्रिकेट खेळायला...
  • Log in or register to post comments

सुंदर

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/12/2009 - 10:13 नवीन
सुंदर लिखाण. आवडले. अवांतरः "हे जीवन म्हणजे क्रिकेटराजा हुकला तो संपला" हे सुनील गावस्करांनी गायलेले आणि शांताराम नांदगावकरांनी लिहीलेले गाणे कोणाकडे आहे का? छान गाणे आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

मस्त लेख !

अवलिया
Fri, 11/13/2009 - 18:33 नवीन
मस्त लेख ! आवडला ! :) --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

नुसते फोटो

टारझन
Fri, 11/13/2009 - 18:43 नवीन
नुसते फोटो पाहुनंच अंगाला काटा आला !! सगळेच फोटो भारी ... पण गांगुली शेवाग आणि जाँटीचा फोटो .. खल्लास
  • Log in or register to post comments

मस्त!

फारएन्ड
Sat, 11/14/2009 - 08:31 नवीन
मस्त फोटो आणि लेख! सचिन, दादा आणि द्रविड हे याच क्रमाने आमचेही फेवरिट. यात ऑफ ला ड्राईव्ह मारणारा 'क्लासी' दादा आणि एरव्हीचा कप्तान दादा यातही केवढा फरक होता ना :) अजून इतर खेळाडूंबद्दल असेच 'फीचर्स' वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

क्रिकेट

अमोल केळकर
Sat, 11/14/2009 - 09:33 नवीन
क्रिकेट वरील एक सुंदर लेख -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

एकनाथ सोलकर

प्रमोद देव
Sat, 11/14/2009 - 10:56 नवीन
फलंदाजाच्या आसपास उभे राहून बॅटची कड लागून उडालेले झेल घेणारा अफलातून एकनाथ सोलकर...नव्हे झेलकर. Image removed. १९७१साली ओव्हलवर इंग्लंडच्या ऍलन नॉटचा झेल घेताना एकनाथ सोलकर. स्लीपमध्ये सुनील गावस्कर आणि यष्टींच्या मागे आहे फरूक इंजिनियर. गोलंदाज(पाठमोरा) बहुदा चंद्रशेखर दिसतोय Image removed. १९७४साल.मैदान ओल्ड ट्रॅफल्ड-इंग्लंड. फलंदाज डेरेक अंडरवूड. सिली पॉईंटला सुनील गावस्कर आणि झेल घेणारा एकनाथ सोलकर!!!!!!!!!! गोलंदाजाच्या जादूपेक्षा सोलकरचे चापल्य आणि घारीची नजर ह्या दोन गुणांमुळेच गोलंदाजाच्या खात्यातल्या बळींची संख्या वाढलेली आहे. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

खत्तरनाक फोटो

जे.पी.मॉर्गन
Sat, 11/14/2009 - 15:07 नवीन
वेड फोटो आहेत ! च्यायला.. खूप काही बघायचे राहिले हो. आजोबा आम्हाला हॉल, ग्रिफिथ, अमरनाथ, नायडूंच्या गोष्टी सांगायचे... बाबा गावसकर, विश्वनाथ, रिचर्ड्स, गार्नर, ग्रॅहॅम पोलॉक च्या... आम्ही आमच्या पोरांना तेंडल्याच्या कथा सांगणार...हे असंच चालायचं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

माताय, काय अफलातून फोटू आहेत!!

चतुरंग
Sun, 11/15/2009 - 09:13 नवीन
इथे दिल्याबद्दल धन्यवाद!! एक्की बद्दल खूप ऐकून होतो पण हे फोटो पाहून खरंच खूप बरं वाटलं. काय एकेक खेळाडू होऊन गेले राव! जबरा!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

I will out you bloody

सुमीत भातखंडे
Tue, 11/17/2009 - 15:26 नवीन
I will out you bloody - एकनाथ सोलकर टू जेफ बॉयकॉट पण फोटू दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

हा हा हा !

जे.पी.मॉर्गन
Tue, 11/17/2009 - 16:07 नवीन
कमाल ! शब्दच नाहीत ! बॉयकॉट हे इंग्लिश ऐकूनच आउट झाला असेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

एक्कीचं गिर्‍हाईक!

प्रमोद देव
Tue, 11/17/2009 - 16:36 नवीन
बॉयकॉट हा सोलकरचा 'गिर्‍हाईक' होता. सोलकर हा अष्टपैलू होता. तो एक उपयुक्त फलंदाज होता. फलंदाजी करताना तो तासंतास खेळपट्टीवर नांगर टाकून बसायचा. धावा फारशा करत नसे तरी भागीदार्‍या मात्र बर्‍याच केल्या आहेत. तसेच तो मध्यमगती आणि फिरकी अशा दोन्ही प्रकारची गोलंदाजी करत असे. सोलकरची मध्यमगती बॉयकॉटला नेहमीच भारी पडलेय. बॉयकॉटला तो सांगून हमखास बाद करायचा. :D पण त्याचे खरे क्षेत्र म्हणायचे म्हणजे फलंदाजाजवळचे क्षेत्ररक्षण. फॉर्वर्ड शॉर्ट-लेग ही त्याची खास ठरलेली जागा होती. ह्या जागेवर त्याने घेतलेल्या अफलातून झेलांमुळे गोलंदाजांच्या खात्यात आयतीच वाढ झाली. कैक वेळेला फॉशॉले पेक्षाही जवळ तो उभा राहात असे. भिती हा शब्द त्याच्या शब्दकोशात नव्हता. सोलकरच्या वेळी त्याच्या बरोबरीनेच अबीद अली,अजित वाडेकर, वेंकटराघवन्‌ असे काही फलंदाजाच्या आसपास क्षेत्ररक्षण करणारे उत्कृष्ठ खेळाडू होते...पण ह्या सगळ्यांच्यात सोलकर प्रथम क्रमांकावर होता. सोलकरनंतर त्याची जागा घेणारा एकही क्षेत्ररक्षक आपल्याला मिळाला नाही. :( कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/16/2009 - 11:54 नवीन
मस्त लेख.....! अजून येऊ दे...
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम!!

मेघवेडा
Mon, 11/16/2009 - 19:17 नवीन
मस्तच एकदम! झकास!! तुमच्या कुठल्या कुठल्या वाक्यांचा इथे उल्लेख करू असं झालंय! बरीच वाक्ये दाद देण्याजोगी आहेत हो साहेब!! वर्णनाची जरा लांबी वाढवाल का? प्लीज! राहून राहून रिचर्डस चा उल्लेख करावासा वाटतो! वीरेंदर सेहवागच्या "आम्हा काय त्याचे" शाळेचा तो गुणवत्ता यादीतील मानकरी! नव्हे मुख्याध्यापकच कदाचित!!! त्याचे ते बेफिकिर चालणे, तीन बाद दहा असा धावफलक असतानाही बिनधास्त चौकाराने खाते उघडणे, "It's red, round and weighs about five ounces, in case you were wondering!" असे मोठ्या आवेशाने आणि मग्रुरीने सांगणर्‍या ग्रेग थॉमसला पुढच्या चेंडूवर षटकार खेचून (चेंडू गेला मैदानाबाहेरील नदीत!!) त्याला "Greg, you know what it looks like. Now go and find it." असे तितक्याच, नव्हे थोड्या जास्तच आवेशाने आणि मग्रुरीने सांगणारा रिचर्डस म्हणजे खरंच गोलंदाजांचा कर्दनकाळ!!! आपल्या १९७४ ते १९९१ या १७ वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही हेल्मेट न घालता खेळणं म्हणजे खरोखरीच दैदिप्यमान कामगिरी नाही का? आपला लेख मात्र खरोखरीच सुंदर आहे! येत राहू दे अजून साहेब!! वाट पाहू!!
  • Log in or register to post comments

झकास लेख

नंदन
Tue, 11/17/2009 - 02:09 नवीन
मस्त, खुसखुशीत लेख.
ह्याच्या खेळाचं एका वाक्यात वर्णन करायचं म्हणजे "आम्हा काय त्याचे". नाजुकपणा, संयम, शांतता वगैरे गोष्टी ह्याच्या वाटेला फारश्या जात नाहीत ! मागच्या बाकावर बसणार्‍या, एका इयत्तेत ३ वर्ष मुकाम केलेल्या विद्यार्थ्याच्या चेहेर्‍यावर मास्तर "छांदोग्योपनिषद" शिकवत असताना जे भाव असतील, साधार॑ण ते भाव चेहेर्‍यावर.
=)) परफेक्ट! बाकी मार्क वॉचे नबाबी फटके, खासकरून लेग ग्लान्स आणि स्टीव्ह वॉचा डावा गुडघा टेकवून ऑफस्पिनर्सना मिड-ऑनवरून भिरकावून देणारा षटकार हेही फटके लाजवाब.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मूँह की बात !

जे.पी.मॉर्गन
Tue, 11/17/2009 - 10:37 नवीन
"मार्क वॉचे नबाबी फटके, खासकरून लेग ग्लान्स आणि स्टीव्ह वॉचा डावा गुडघा टेकवून ऑफस्पिनर्सना मिड-ऑनवरून भिरकावून देणारा षटकार हेही फटके लाजवाब" एकदम परफेक्ट नंदन! पुढच्या लेखात येतच आहेत ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

वा मस्त

दिपक
Tue, 11/17/2009 - 11:20 नवीन
सही लेख... झकास वर्णन. सेहवागचं तर डिट्टो.. :) आम्हाला आवडणारे काही.. द्रवीड चा कव्हर ड्राईव्ह Image removed. दादा जेव्हा पुढे येऊन सिक्सर खेचतो तेव्हा... Image removed. पॉन्टीग चा कव्हर ड्राईव्ह Image removed.
  • Log in or register to post comments

जबरा

सुमीत भातखंडे
Tue, 11/17/2009 - 15:12 नवीन
जबराच. बाकी शब्दच नाहीत.
  • Log in or register to post comments

वा वा!

विसोबा खेचर
Wed, 11/18/2009 - 01:41 नवीन
वा वा! सुरेख चित्रयात्रा.. खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.. (ब्रायन लारा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

'सुलतान ऑफ स्विंग'

संदीप चित्रे
Wed, 11/18/2009 - 04:06 नवीन
हा त्याचा यॉर्कर !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा