कोल्ड कॉफी
कॉलेज मध्ये असताना मॅगीने वेड लावल होतं. (नाही हो मुली बद्दल नाही न्युडल्स बद्दल बोलतोय.) आमच्या सोमय्याच्या कँपस मध्ये मधोमध एक मॅगीच सेंटर होत.
२ रुपयाला कागदाच्या बशीत टिच भर गरमा गरम मॅगी मिळायची आणि जोडीला आसायची १ रुपयाची नेस्लेची गरमा गरम किंवा थंडगार कॉफी.
आर्ट्स आणि कॉमर्सची पोर पोरी सदान कदा तिकडे पडिक आसायची.
नुसत थंडगार पाणीच आसायच ती कॉफी म्हणजे. रंगाला थोड दुध आणि कॉफी फक्त वासापुरती . पण कोल्ड कॉफीच वेड लागल ते तिथुनच.
या वेडापायी मग घरच्या घरीच वेग वेगळे बदल करत गेलो.
गेल्या आठवड्यात घरी केलेली ही कोल्ड कॉफी.
साहित्य :
फुल क्रिम दुध,
साखर,
कॉफी,
असल्यास कंडेन्स मिल्क,
बर्फ,
मिक्सर/शेकर.
आईसक्रिम. (व्हॅनिला, बनाना कुठल्याही चवीचं )
चॉकलेट.
एका भांड्यात चॉकलेट वितळवुन घ्याव.
ज्या ग्लासमध्ये सर्व्ह करणार आसाल त्या ग्लास मध्ये वितळलेल्या चॉकलेटचे ओघळ सोडावे, आणि लगेच फ्रिज मध्ये ठेवावे.
मिक्सर मध्ये बर्फ क्रश (बारीक चुरा) करुन घ्यावा.
त्यात दुध्,साखर,आईसक्रिम,कॉफी,कंडेन्स मिल्क (असल्यास साखरेच प्रमाण कमी कराव) टाकुन चांगल फिरवुन घ्याव.
सर्व्ह करताना वरुन परत एक एक आईसक्रिम चा छोटा गोळा टाकावा.
वाचने
13385
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
मस्त!!!!!!!!
मस्त.... चुचु
व्वा! माझा
In reply to व्वा! माझा by स्वाती२
स्वातीताई
व्वा...
सुं द र
सुंदर... "१
गणपा
मस्तच...लई भारी.
वाह!!!!! गणपा
मस्त थंडीत
In reply to मस्त थंडीत by लवंगी
सेम हिअर...
मस्तच!!!! पुण
+१
जियो..... --प्र
बोलती
अबे...
ए बाबा गणपा
In reply to ए बाबा गणपा by चतुरंग
काय करावं बरं?
In reply to काय करावं बरं? by बिपिन कार्यकर्ते
फक्त गणपा
In reply to काय करावं बरं? by बिपिन कार्यकर्ते
इथे धाग्यावरच बोललास ते बरं केलंस
काय भयानक
शिंपल.
यम्म्मी....!!
च्या मारी धरुन फट्याक.