Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मड्डम on Sun, 11/08/2009 - 14:51
  • Log in or register to post comments
  • 16660 views

प्रतिक्रिया

Submitted by विकास on Tue, 11/10/2009 - 00:11

In reply to शेवटचे by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

एकेरी स्पष्टीकरण

त्या बातम्यांमध्ये बंबई असे म्हणण्याचे काय कारण असावे याचे स्प्ष्टीकरण मी माझ्या प्रतिसादात देण्याचा प्रयत्न केला आहे. तसा प्रयत्न तुम्ही मूळ लेखातील खालील वाक्यांसदर्भात दिलेला दिसला नाही, ज्यात निव्वळ दिशाभूल आहे:
जर आपला मुंबईचे नाव बदलायला किंवा चुकीचे उच्‍चारायला विरोध असेल तर हाच न्‍याय इतर राज्‍यातील शहरांना का नको... मात्र तसे नाही. आपण बिहारची राजधानी पटना असतानाही सरळ पाटणा म्हणणार. मध्‍यप्रदेशातील भोपाल शहराला सरळ भोपाळ म्हणणार, इतकेच काय चेन्नईला मद्रास म्हणणारे आणि इंदौरला इंदूर म्हणण्‍याचा अट्टहास आपलाच ना? त्‍याच पध्‍दतीने बेंगलोर किंवा बेंगलूरूचे नाव बंगळुरू आणि ग्वाहाटीचे गुवाहाटी किंवा गौहत्ती करणारेही आपणच ना? असे अनेक नावे असू शकतील.
हेच तत्त्व मराठी भाषिकांनीही पाळावे असे तुमचे मत असावे. अर्थातच. आणि माझ्या माहीतीप्रमाणे इतरत्र नाव बदलण्याच्या विरोधात मराठी माणसाने अथवा मराठी माध्यमांनी कधी आवाज केल्याचे ऐकीवात नाही. तेच तत्व सर्वत्र असावे इतकेच म्हणणे आहे. ते तुम्हाला मान्य आहे का? त्याही पुढे जाउन मी इतकेच म्हणेन की इतरत्रपण सामान्य माणसाला मुंबईच्या नाव बदलण्याचे किती पडले असेल या विषयी शंका आहे. तो फरक पाडणारे हे राजकारणी आणि तथाकथीत बुद्धीवंत आहेत असे माझे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Tue, 11/10/2009 - 00:17

In reply to एकेरी स्पष्टीकरण by विकास

Permalink

मूळ चर्चाप्रस्ताव

श्री विकास, मूळ चर्चाप्रस्तावावर चर्चा करावीशी वाटली नाही. नावांचा उल्लेख सामान्य लोक सोयीनुसार करतात, असे माझे मत आहे. मूळ चर्चाप्रस्तावाबाबत काहीच मत नोंदवू इच्छित नाही.
तेच तत्व सर्वत्र असावे इतकेच म्हणणे आहे. ते तुम्हाला मान्य आहे का?
हेच तत्त्व सार्वत्रिक असावे असेच मलाही वाटते पण मी एखाद्या भाषेच्या मर्यादांना विचारात घेण्यास तयार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 11/10/2009 - 00:26

In reply to मूळ चर्चाप्रस्ताव by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

हे बरं आहे...

मूळ चर्चाप्रस्तावाबाबत काहीच मत नोंदवू इच्छित नाही. हे बरं आहे. म्हणजे माझे प्रतिसाद ज्या चर्चेस/लेखास अनुलक्षून आहेत त्याचा संदर्भ न घेताच त्यावर (माझ्या प्रतिसादावर) उपचर्चा घडवून आणायची... चांगले बुद्धीवादी आहात.... ... पण मी एखाद्या भाषेच्या मर्यादांना विचारात घेण्यास तयार आहे. मी कुठे भाषेच्या मर्यादांचा विचार करत नाही आहे? पण भाषेच्या मर्यादांचा विचार हा उच्चारात करणे एक आणि लिहीताना अथवा इतर भाषेतील मूळ शब्दांनाच त्यासाठी विरोध करत इतर भाषांचा अनादर करायचा हे पण आपल्या विचारात बसते का?
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Tue, 11/10/2009 - 00:44

In reply to हे बरं आहे... by विकास

Permalink

आणखी थोडे आणि समारोप

म्हणजे माझे प्रतिसाद ज्या चर्चेस/लेखास अनुलक्षून आहेत त्याचा संदर्भ न घेताच त्यावर (माझ्या प्रतिसादावर) उपचर्चा घडवून आणायची...
श्री विकास, आपल्या प्रतिसादावर चर्चा घडवण्याचीही इच्छा नव्हती. (तुम्ही ती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि आता ती लांबते आहे.) आपल्या प्रतिसादातील केवळ एका विधानास (आक्षेप न घेता) स्पष्ट करण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला ते पटले नसल्यास ठीक आहे, रोष नसावा.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 11/10/2009 - 00:50

In reply to आणखी थोडे आणि समारोप by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

धन्यवाद आणि पुढे...

(तुम्ही ती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि आता ती लांबते आहे.) मूळ लेखातील तृटी न दाखवता त्या दाखवणार्‍या मुद्यांसंदर्भात विषय बदलणारे मुद्दे उपस्थित केल्याने चर्चा लांबत गेली. माझ्यामुळे नाही... पण भाषेच्या मर्यादांचा विचार हा उच्चारात करणे एक आणि लिहीताना अथवा इतर भाषेतील मूळ शब्दांनाच त्यासाठी विरोध करत इतर भाषांचा अनादर करायचा हे पण आपल्या विचारात बसते का? याचे उत्तर देयला विसरलात का याला पण मूळ चर्चेप्रमाणे उत्तर नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Tue, 11/10/2009 - 00:57

In reply to धन्यवाद आणि पुढे... by विकास

Permalink

उत्तर

मूळ लेखातील तृटी न दाखवता त्या दाखवणार्‍या मुद्यांसंदर्भात विषय बदलणारे मुद्दे उपस्थित केल्याने चर्चा लांबत गेली. माझ्यामुळे नाही...
श्री विकास, विषय बदलणारे मुद्दे मलातरी वाटले नाही.
याचे उत्तर देयला विसरलात का याला पण मूळ चर्चेप्रमाणे उत्तर नाही?
विसरलो कारण हा संवाद थांबवावा असे मला वाटत होते. (इतरठिकाणी दुसर्‍या एका चर्चेवर मत मांडत असल्यानेही तसे घडले असावे. ) आता उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
पण भाषेच्या मर्यादांचा विचार हा उच्चारात करणे एक आणि लिहीताना अथवा इतर भाषेतील मूळ शब्दांनाच त्यासाठी विरोध करत इतर भाषांचा अनादर करायचा हे पण आपल्या विचारात बसते का?
हे माझ्या विचारात बसत नाही आणि माझा त्याला विरोध आहे. मी पुर्वीच म्हटल्याप्रमाणे हिंदी प्रसारमाध्यमे बम्बई असा उल्लेख करत असल्यास ते निषेधार्ह आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com