बर्वे कुटूंबियांच्या सुरळीत सुखी आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना व अनेकोत्तम शुभेच्छा!
प्रत्येकावर वेळ आली की जो तो यशाशक्ती यशामती निर्णय घेतोच. माझ्याबाबत बोलायचे झाले तर माझ्या बहीणीने पुढाकार घेतला म्हणून मला फार सोपे गेले. मी माझ्या बहीणीचा व तिच्या सासरकडच्या समजुतदार मंडळींचा अतिशय ऋणी आहे. जर मला बहीण नसती किंवा तिने नकार दिला असता तर मात्र अवघड झाले असते. अर्थात आम्हा भावंडाना एकमेकांना समजुन घ्यायला, एकमेकांच्या मदतीला यायला शिकवले यात आमच्या आजी-आजोबा,आई-वडीलांचे, तसेच बहिणीच्या सासरकडच्या मंडळींचे फार मोठे उपकार / यश आहे असे मी मानतो. अपेक्षीत व तरी बदलत्या जगात असामान्य वाटतील अशी मुल्ये / शिकवण त्यांनीच दिली.
मदतीला योग्य माणसे मिळणे, अवघड आजारपणासाठी लागणारा पैसा असणे यात तर मी परमेश्वराचे उपकार.
जगातील तमाम केअरगिव्हर्सनां प्रणाम!
लेख आवडला. घरापासुन दुर असणार्या प्रत्येकाचीच समस्या आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. (पुन्हा एकदा) अंतर्मुख करुन विचार करायला लावलंत यातच सगळ व्यक्त होतंय!
हॅट्स ऑफ टू मोहन बर्वे आणि तुमच्या लेखनालाही ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
अगदी "अपेक्षित तरीही सामान्य" !!!
सुरेख, अंतर्मुख करणारा लेख आवडला.
ही कथा आहे की घडलेल्या घटनेचा घेतलेला मागोवा, सत्य आयुष्यातली घटना असल्यास मोहनरावांचे अभिनंदन ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
नात्यांच्या धाग्याची वीण किती घट्ट आहे त्यावर अवलंबुन असतात असं मी माझ्या अनुभवावरुन म्हणतो.
हे निर्णय एकटा माणुस घेऊ शकत नाही. मोहन बर्वेनं घेतलेला निर्णय पटतो अन त्याचं कौतुकपण करावंस वाटतं. पण त्यापेक्षा कौतुक वाटतं ते राधिकाचं. तिचा मोहन बर्वेच्या निर्णयाला असलेला पाठिंबा तिच्या अन मोहन बर्वेच्या नात्यातली घट्ट वीण दाखवतो, जसा मोहन बर्वेचा निर्णय त्याच्या अन त्याच्या वयोवृद्ध आईवडिलांच्या नात्याचा दाटपणा दर्शवतो.
अन म्हणुनच `लग्न झालेल्या बहिणीवर आजारी आईची जबाबदारी टाकण सोप असल तरी मोहनाला ते योग्य वाटल नाही. “कोण करणार तिच मायेने? मला जायला हव" मोहनचा विचार पक्का होत होता.' हा दृष्टीकोण फारसा कळत नाही. शेवटी त्याची बहिण एव्हढी दृढ नाती असलेल्या कुटुंबातली आहे हे लक्षात घेतलं तर तिच्या मात्यापित्यांबद्दलच्या भावना पण मोहन बर्वे एव्हढ्याच तीव्र असतील ना? मग हा विचार का अन कसा येतो? माझा स्वानुभव असा आहे की अश्यावेळी अशी दृढ नाती असलेल्या घरातले सगळेच सदस्य एकमेकांच्या व्यावहारिक, सांसारिक, भावनिक परिस्थितीचा विचार करतात अन परस्पर सामंजस्यानं निर्णय घेतात.
माझा स्वानुभव असा आहे की अश्यावेळी अशी दृढ नाती असलेल्या घरातले सगळेच सदस्य एकमेकांच्या व्यावहारिक, सांसारिक, भावनिक परिस्थितीचा विचार करतात अन परस्पर सामंजस्यानं निर्णय घेतात.
खरय तरीही निर्णय घेण किती अवघड असतं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
म्हणूनच तर आम्ही मोहनरावाना गुरु करून डेस्क्टॉपवर ठेवले आहे.
जागो मोहन प्यारे....
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
एकत्र कुटुंब पद्धताचा लोप झाल्यामुळे वृद्ध मातापित्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबातील सर्वांनी एकत्र राहणे शक्यच नाही असे गृहीत धरून मोहनने आपल्या दोन कुटुंबातील सदस्यांची पुनर्रचना केली आहे. भारतातच रहातांनासुद्धा आई किंवा वडिलांसाठी काही लोक पत्नी आणि मुलांपासून दूर रहातात. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना एका गावात ठेऊन नोकरीतल्या बदलीच्या गावी एकट्याने जाणार्यांची उदाहरणे तर घरोघरी दिसतात. त्या सर्वांचेच कौतुक करावे असे मला वाटते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
जमू शकेल असा निर्णय घेतलाय त्याबद्दल त्या दोघांचेही अभिनंदन करायला हवे. असामान्य आहे असे वाटत नाही पण कौतुकास्पद नक्कीच!
अन म्हणुनच `लग्न झालेल्या बहिणीवर आजारी आईची जबाबदारी टाकण सोप असल तरी मोहनाला ते योग्य वाटल नाही. “कोण करणार तिच मायेने? मला जायला हव"
हा विचार मात्र अजिबात पटला नाही.
पूर्वी मुलांनीच आईवडिलांचे करायचे हा विचार होता कारण कुटुंबे मोठी असत. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींना तिकडचे व्यापही मोठे असत त्यात पुन्हा आईवडिलांचे त्या कसे करणार?
सध्याच्या दिवसात असे काही असेल असे वाटत नाही. बहीण भाऊ दोघांनीही आईवडिलांसाठी करायला हवे.
चतुरंग
मोहन राधिकाचा निर्णय कौतुकास्पद. पण बहिणीची मदत न घेणे हे काही पटले नाही. विशेष करून मोहनच्या आईचे आजाराचे स्वरूप पाहाता अशा आजारपणात सख्खी भावंडेच काय इतरांचीही खूप मदत लागते. माझ्या एका मामाच्या सासूबाईंना अलझायमर झाला तेव्हा मामा मामीने जवळ जवळ सात वर्ष झुंज दिली. मदतीला पगारी माणसे ठेऊनही खूप दमछाक व्हायची.
माझ्या आजी आजोबांच्या बाबतीत माझे मामा माझ्या आईचीच काय, मी मोठी झाल्यावर माझीही मदत हक्काने घ्यायचे. माझ्या आजीच्या ऑपरेशन साठी, माझ्या खेड्यात दवाखाना चालवणार्या मामाला महिनाभर शहरात राहणे शक्य नव्हते. तेच बाबांची नोकरी बँकेत. त्यांना सहज रजा मिळाली. त्यामुळे शहरात जाऊन ऑपरेशनची सर्व उस्तवार आईबाबांनी केली. यात काही वेगळे केले असे कोणालाच वाटले नाही. आणि ही गोष्ट ३० वर्षापूर्वीची. माझ्या सासूबाईंच्या माघारी माझ्या सासर्यांची जबाबदारी माझ्या जावेने आणि नणंदेने घेतली. डॉक्टरांशी चर्चा करुन ट्रिटमेंट विषयी सर्व निर्णय नणंदेच्या मिस्टरांनी घेतले. आम्ही दूरदेशी म्हणून फोन करुन आम्हाला मानसिक आधार दिला. आमच्याकडे अगदी extended family तलेही एकमेकांसाठी करतात त्यामुळे बहिणीचा सहभाग नसणे खटकले.
प्रतिक्रिया
ह्म्म्म
तुमच्या
बर्वेंचा निर्णय चांगला आहे
काय जमाना
मस्तच!!
लेख आवडला.
हॅट्स ऑफ
खरच
चांगला
परफेक्ट ...
चांगला
असे निर्णय अन त्यांच यश....
खरय
म्हणूनच तर
विभक्त कुटुंब पद्धत
मोहन आणि राधिकाने त्यांना त्या परिस्थितीत
विचार करायला लावणारा लेख...
छान लेख...
मोहन
छान!!!