खरं तर निवडणूका संपल्यानंतर राजकारणावरील माझे विचार लिहायचे नाहीत असे मी ठरवले होते. पण सध्या जे काही चालले आहे त्यावर लिहावेसेच वाटते.
२२ ऑक्टो. ०९ ला च काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ला बहुमत मिळाल्याचे सिद्ध झाले. त्यांनी २ दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांच्या नावाची घोषणा केली.
पण आज १० दिवस झालेत तरी शपथविधी काही झाला नाही. दोन पक्षांमध्ये कोणते खाते कोणाला मिळावे (खरं तर जास्त मलई कोणाला मिळावी) ह्यावर त्यांची चर्चा चालू आहे.
शपथविधीकरीत मंडपही बांधून तयार आहे. त्याचे दररोजचे भाडे वाया जात आहे. बहुतेक नेते मुंबई-दिल्ली वार्या करत आहेत.
त्यात सत्यसाईबाबांच्या दर्शनाला मुख्यमंत्री दिल्लीहून परत आलेत. नुसते दर्शन नाहीच तर स्वत:च्या सरकारी निवासस्थानावर सत्य साईबाबांना आमंत्रण. (बातमी येथे आणि येथे) सत्य साईबाबांवर त्यांची श्रद्धा ह्यावर आमचा काहीच आक्षेप नाही. तुम्ही तुमच्या स्वत:च्या घरी काय करायचे ते करा. पण सरकारी निवासस्थानावर असे काही करणे चुकीचे आहे.
पण काय करणार? गेल्या १० वर्षांत जास्त काही कामे न करताही पुन्हा त्याच सरकारला निवडून आणणार्या जनतेचाही त्यात दोष आहेच. त्या नेत्यांना आता कळले आहे की जनतेला आपली सवय झाली आहे. आता आपण काहीही केले तरी जनता काही करणार नाही.
ह्या अशा जनतेला विचारात न घेता जनतेच्याच पैशावर सर्व काही करून नुसता वेळ आणि पैसा वाया घालवणार्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निषेध.
ह्याच पार्श्वभूमीवर नुकतेच ऐकल्या/वाचल्यानुसार शिवसेनेने घेतलेली भूमिका योग्यच आहे असे वाटते. माझ्यामते शिवसेना व मनसेने आतापासूनच विरोधी पक्षांचा दणका दाखविला पाहिजे.
वाचने
5547
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
भाजपावाले
In reply to सहमत by चिरोटा
सहमत आहे. :)
In reply to भाजपावाले by विजुभाऊ
भाजपावाले
In reply to सहमत by चिरोटा
सत्यसाईबा
सहमत
सहमत आहे.
In reply to सहमत by मुक्तसुनीत
असे ही
सत्य-साईबाबा
बाझवला
गौ-या नाही
In reply to बाझवला by टारझन
(विषय दिलेला नाही)
In reply to गौ-या नाही by अवलिया
परशूराम
तत्वा साठी
चालू द्या...!
In reply to तत्वा साठी by अनामिका
बिरुटे सर
In reply to चालू द्या...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तत्वा साठी
In reply to तत्वा साठी by अनामिका
बघा मी
In reply to तत्वा साठी by सुहास
चला म्हणजे
In reply to बघा मी by अनामिका
ह्म्म्म्म
In reply to चला म्हणजे by सुहास
- ह्या गुंडाला , ज्याचा कुठेही एन्काउंटर झाला असता, त्याला मुख्यमंत्री बनवले ...
- शिवसेनेच्या स्थापनेनंतर साहेबांना पहिल्यांदा पुण्यात जोशी सर भेटले होते (हे साहेब म्हणजे सम्राट बर का) तेव्हा पायत फाटकी चप्पल, मळलेले कपडे घालून आले होते सर... (परंतु जशी जशी शिवसेना वाढत गेली तसा सरांचा भरभराटीचा आलेख प्रचंड वेगाने वाढत गेला - ईतका कि शेकडो कोटींना गिरण्यांच्या जमिनी घेतल्या) ...
शिवसेना, भाजपाचे "मि नाही त्यातली आणि कडी लावा आतली" ह्या प्रकारचे जे राजकारण चालू आहे त्यामुळेच लोकांनी आघाडीला बहुमत दिले असावे. आपले ज्यु. साहेब (ना-राज) पण ह्यात लवकरच आलेले दिसतील (अजून पर्यंत नाहित कारण खायला सत्ताच मिळालेली नाहिये !!! त्यामुळे थोडा धीर धरा...) - अफाट जगातील एक अडाणि.वर प्रतिकिया
हा हा हा...
In reply to वर प्रतिकिया by यन्ना _रास्कला
निष्काळजी नेते अन् ‘काळजीवाहू’ जनता!
जनता जनार्दनाचा कौल, आपण जाब विचारणारे कोण?
ज्या कुणी
In reply to जनता जनार्दनाचा कौल, आपण जाब विचारणारे कोण? by हुप्प्या
जनाची नाही तर मनाची तरी ठेवा...
भोक्कारचो
In reply to जनाची नाही तर मनाची तरी ठेवा... by वि_जय
आपले
यम यल ये
आणखी २ दिवस?