छान लिहलाय तुम्ही तुमचा शेरा! मला वाटतं कीं श्री. चिदंबरम एकादे वेळी आपली धमकी खरी करून दाखवतीलही!
पण मग राजपुत्राचे काय?
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
गृहमंत्र्यांच्या पौरुषाला असा अचानक पूर यायला भाषणापूर्वी कुठल्याशा द्रव वा घन पदार्थाचे सेवन कारणीभूत आहे का?
जाणकारांनी खुलासा करावा.
अशी वाचावीरश्रीदेखील आपल्या थोर्थोर नेत्यांना नैसर्गिकरित्या स्फुरत असेल ह्याच्यावर म्या पामर विश्वास ठेवू शकत नाही. असो.
अहो, अडवाणी तरी बरे! अटल-जींनी त्या परव्याला (परवेझ) आग्र्याला बोलावून २१ तोफांची सलामी देऊन उगीचच इज्जत दिली नाहीं तर त्याला कुणीही मान्यता देत नव्हतं. नको तिथे कनवाळूपणा असा नडतो!
मी सध्या जे पुस्तक वाचतो आहे (Nuclear Deception) त्यात मुशर्रफचे अनेक भारतविरोधी पराक्रम वर्णिलेले आहेत. पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर त्या पुस्तकावर एक छोटीशी लेखमाला लिहायचा विचार आहे.
सुधीर काळे
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
उत्तम!!! =D>
गृहमंत्र्यांनी हे रोज सांगायला हवे म्हणजे केव्हातरी नक्कीच अतिरेकी
घाबरतील. अतिरेकी नाही तर नक्षलवादी तरी घाबरतील? नक्षलवादी नाही तर देशी
गुन्हेगार तरी घाबरतील?
काही नाही हो.. काल सत्यसाईबाबांनी सांगितले असेल/आशीर्वाद दिला असेल, "मैं हूं ना, तुम बोल दो."
गेले वर्षभर कसाबला पकडून ठेवून काय केले/झाले ते दिसतच आहे.
मला वाटतं कीं श्री. चिदंबरम एकादे वेळी आपली धमकी खरी करून दाखवतीलही
काळेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे झाले तर चांगलेच आहे.
मला वाटते गृहमंत्र्यांचे वाक्य वरवर जरी पाकीस्तानी अतिरेक्यांना उद्देशून आहे असे वाटत असले तरी, ते वास्तवात राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रात सत्तावाटपावरून चाललेल्या अतिरेकाला उद्देशून असावे...
आत्ताच वाचलेल्या बातमीनुसार गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत झालेल्या लखनौ मधील जमैता-उलेमाच्या संमेलनात "वंदे मातरम" या राष्ट्रीय गीताच्या* ("राष्ट्रगीता"च्या नाही) विरुद्धचा २००६ सालपासूनचा फतवा परत संमत केला गेला.
__________________________________
* धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने १९३७ साली त्या गीतात असलेली फक्त पहीली दोनच कडवी ठेवली ज्यात फक्त मातृभूमीचे वर्णन आहे आणि त्याला राष्ट्रीय गीत म्हणले...
प्रतिक्रिया
पण मग राजपुत्राचे काय?
पूर पौरुषाचा?
सहमत!
सोडा हो
Nuclear Deception मधील मुशर्रफचे अनेक भारतविरोधी पराक्रम
उत्तम!!!
सत्यसाईबाबांचा आशीर्वाद असेल
आपला, (मिपा
हे विधान
हेच
वरवरचे
विकास!झक्कास
सोनीयाच्या दिवसात ?
सोनीयाच्य
आणि गृहमंत्री गप्प बसले...