Skip to main content

तू पुन्हा

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 27/10/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंती लाघवी गंध जेव्हा लाजले मोगर्‍याने गे तुझे, नाव तेव्हा घेतले पैंजणांच्या किलबिली, पाखरे नादावली थिरकता तव पावले, सूर साती छेडले मोकळ्या ओल्या बटा, फिरविता वार्‍यावरी थेंब ते सारे झणी, चातकाने झेलले भास्कराने पाहता, वळविला तू चेहरा अन नभीचे मेघ ते, पश्चिमी झेपावले गौर अंगाला तुझ्या, चुंबणारे ऊनही ती झळाळी कांचनी, लेवुनी सरसावले स्मित गाली विलसता, दशदिशा आसावल्या हात अपुले गुंतुनी, जगपरिघ आकुंचले शब्द ही ना बोलल्या, पाकळ्या अधरातल्या श्वास माझा तोलती, अर्थ ते नजरेतले
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1501
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छान आहे हो कविता. :)

मस्तच ! कुठे कुठे निसटलीय थोडी... पण छानच ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मस्तच आहे... हात अपुले गुंतुनी, जगपरिघ आकुंचले आवडले