Skip to main content

आली माझ्या घरी ही दिवाळी

लेखक प्रभो यांनी रविवार, 25/10/2009 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीला घरी गेलो होतो.त्याची काही छायाचित्रे मिपाकर कुटुंबियांसोबत शेअर करावी वाटली म्हणून इथे देत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेली रांगोळी. ही रांगोळी आईने काढली. यात आधी बहिणीने मग नंतर तिचा हात दुखायला लागल्यावर मी रंग भरला. लक्ष्मीपूजन १ लक्ष्मीपूजन २ दिवाळीसाठी मी आईला घेतलेल्या बनारसी साडीचा पदर दाखवायची पोज घेतलेले आई-बाबा दोघे सारखे कशाकशावरून वाद करत असतात पण तेवढेच खेळकर आणी हसमूख ही आहेत. माझे मित्र घरी आल्यावर बाबाही आमच्यातलेच एक होऊन जातात.(ते त्यावेळी घरी असले तर) पाडव्याच्या दिवशीची रांगोळी याचे सर्वाधिकार आईकडे. तिनेच काढली आणी रंग भरला.

वाचने 8886
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

मस्तच रे! गोपद्म, लक्ष्मीची पाउले सगळं आल्यानं छान फील येतोय. पण फराळा-बिराळाचं काय केलंस की नाही रे?

वा ! वा ! वा ! छान छान.. ! खरं तर आता असल्या धाग्यांचा कंटाळा आला आहे.. पण तु आपला कंपुतला म्हणुन प्रतिसाद दिला. :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

=)) कंपू जिंदाबाद... म्हणून मी दिवाळी नंतर एक आठवड्याने धागा टाकला आणी फराळाचे फोटो नाही टाकले. (नवा कंपूबाज)प्रभो

In reply to by प्रभो

शाबास ! तु अजुन सहा महिन्यांनी टाकले असतेस तरी प्रतिसाद दिला असताच. कबुल केल्याप्रमाणे दोन प्रतिसाद दिले. नोंद करुन ठेवणे. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

>> अजुन सहा महिन्यांनी टाकले असतेस तरी प्रतिसाद दिला असताच. असेच म्हणतो. कबुल केल्याप्रमाणे दहा प्रतिसाद देईन. दोन आले नोंद करुन ठेवणे. आम्हाला दहा प्रतिसाद कधी मग ?

In reply to by दशानन

कबूल केल्याप्रमाणे मात्र रात्रीच्या दहाव्या भागाला... =)) (आणी बाकिच्या धाग्यांना नऊ-नऊ) --प्रभो

In reply to by प्रभो

घ्ये मापला पन एक परतिसाद... कंपुबाजी जिंदाबाद ;)

In reply to by अवलिया

प्रभ्या ... तुझा धागा म्हणून प्रतिसाद ... नाही तर लै दिवाळ्या झाल्या .. आता बोर झालंय ... अजुन कोणता धागा सेम विषयावर आला तर गोंधळ करायचा !! बोला कंपु..झिंदाबाद !!! -- दिवालिया ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

मस्त रे ! छान दिवाळी फोटो ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

सुरेख रान्गोळी व साडी सुद्धा...... चुचु

छान छायाचित्रे! अवांतर : तसा आपला काही फारसा संवाद नाही. परंतु कंपुबाजीच्या नियमावलीला स्मरुन हा प्रतिसाद!

छान फोटो ! आमचेही लक्ष्मीपुजन... यावर्षीचा आकाशदिवा लक्ष्मीपुजनादिवशी काढलेल्या रांगोळीसह आमची गृहलक्ष्मी सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दिवाळीसाठी मी आईला घेतलेल्या बनारसी साडीचा पदर दाखवायची पोज घेतलेले आई-बाबा
आमचा नमस्कार कळवा! :) तात्या.

साडी झकास! मस्त वाटलं तुमच्या आईबाबांचा फोटो पाहून.

पूजा ,रांगोळी ,साडी ,फोटो सर्व आवडले. अगदी भारतात घरी गेल्यासारख वाटल.हॅपी हॅपी!!!! मीनल.

इथे घराबाहेर रांगोळी काढताना हात गोठतात. छोटीशी काढावी कशी तरी म्हटल तर काढतानाच वा-याने ऊडते आणि विस्कटून जाते. मी तर चक्क घरात फायर प्लेस च्या समोरच्या मार्बल वर रांगोळी काढली. तिथेच पणत्या लावल्या. फोटो घ्यायला विसरले. मीनल.

प्रभो फोटो आणि साडी दोन्ही मस्तचरे गड्या.लै भारी! लै भारी! (येवढ कौतुक करायच कारण म्हणजे पुजा झाल्याचे दिसते आहे तेंव्हा लक्ष्मीला आमच्या कडे पण पाठवा.) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/