Skip to main content

शिवसेना अधिचि तकत दाखवु शकेल का ? आधिक पर्ययासहित

लेखक थोर्लेबजिराव यांनी शुक्रवार, 23/10/2009 18:48 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2815
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

हो ला मत दिले आहे. बसायची आवड नसेल तर कुठचाही पक्ष उभा राहु शकतो.अगदी रिडालोसवाले पण उभे राहु शकतात.!! भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

हो ला मत दिले आहे. बसायची आवड नसेल तर कुठचाही पक्ष उभा राहु शकतो.अगदी रिडालोसवाले पण उभे राहु शकतात.!! अगदी सहमत. ७७ साली इंदीरा गांधी (पर्यायाने इंदीरा काँग्रेस) आणि ९५ साली काँग्रेस ह्या जणू काही संपल्या अशी हवा होती... आणि भाजपाचे तर काय १९८५ साली दोनच खासदार आले होते (सारे देश मे एक भिकारी, अटलबिहारी अटलबिहारी... असे काँग्रेस समर्थकांचे ओरडणे ऐकले होते). पण नंतर यातील सर्वच बाबतीत काय झाले हा इतिहास आहे. त्यामुळे अशा कोणी भ्रमात राहू नये की कुठलाच पक्ष संपला म्हणून... आधी एकदा सांगितलेली गोष्ट परत सांगतो: ८५ साली काँग्रेसला ३/४ जागा मिळाल्या, ज्या नेहरूंनापण मिळाल्या नव्हत्या! संसदेच्या पहील्या आधिवेशनात विरोधी पक्षांची दयनीय अवस्था दिसत होती. महाराष्ट्रातून तर काय केवळ पाचच विरोधक संसदेत गेले होते. त्यातील दोन समाजवादी काँग्रेसचे - शरद पवार आणि साहेबराव डोणगावकर. उरलेल्यातील एक मधू दंडवते होते... त्यांना लोकसभेत राजीव गांधी थोडे प्रेमाने थोडे स्वत:चा आत्मविश्वास दाखवत म्हणाले होते की या वेळेस तुमच्या निदान १/४ जागा आहेत पुढच्या वेळेस तितक्या पण राहणार नाहीत. मधू दंडवते शांतपणे हसले आणि राजीवजींच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, "अजून लहान आहात!" नंतर त्यांच्याच सरकारात व्हि पी सिंग तयार झाले आणि त्यांनी काय केले हा देखील एक इतिहासच आहे! ;)

In reply to by विकास

मधू दंडवते शांतपणे हसले आणि राजीवजींच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, "अजून लहान आहात!"
मला नाही वाटत दंडवते असे काही राजीव गांधींना म्हणू शकले असतील. मा. विकासजी ह्याचा संदर्भ देऊ शकतील का? अन्यथा कुठल्याही व्यक्तिच्या तोंडी अशी वाक्ये भरू नयेत.

In reply to by निमीत्त मात्र

दंडवते १९७१ पासुन लोकसभेत होते. संसदपटु म्हणून त्यांची ख्याती होते.बरेच राजकारणी त्यांचा सल्ला घेत्.वाजपेयी,रामकृष्ण हेगडे,लालु,देवेगौडा,व्ही.पी.सिंग वगैरे. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

हो, पण वरील वाक्याचा संदर्भ कुठे आहे?

In reply to by निमीत्त मात्र

राव्,ह्यात संशय घेन्यासारख काय आहे? स्त्री पंतप्रधान असती तर संशय घ्यायला जागा होती्. हात डोक्यावरुन आणि पाठीवरुनच फिरिवतात की.लहान पोरांच्या डोक्यावरुन आणि मोठ्या लोकांच्या पाठीवरुन. लबाड

In reply to by लबाड लांडगा

हो पण संदर्भ नसताना वाक्ये दुसर्‍यांच्या तोंडात भरू नयेत असे मा. विकास रावांचे मत आहे. त्यावरुन त्यांनी धमाल मुलगा ह्या सदस्यास त्याचे वाक्य मागे घ्यायला लागले हवे होते. माझ्या मते त्याच न्यायाने त्यांनी ह्या वाक्याचा योग्य संदर्भ न दिल्यास हे वाक्य इथून काढून टाकावे नाहीतर तो दुतोंडीपणा ठरेल.

ही शिवसेना कोण ? मनसेची मराठवाड्यातली शाखा आहे का ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पर्याय अपुरे आहेत! शुद्धलेखनातल्या (र्‍हस्व-दीर्घाच्या व मुळक्षरातल्या) चुका दुरुस्त करून ती पोस्ट आणखी पर्याय घालून परत टाका. अशुद्ध लेखन वाचून उरात चर्र झालं हो! सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by सुधीर काळे

हे भगवनं ! क्षमा क्षमा क्षमा ! तात्या काय वाचतो आहे मी हे ... ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

श्री थोर्लेबजिराव, बाळासाहेब सरळ उभे राहू शकले तर शिवसेनाही उभी राहू शकेल.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

पुर्णपात्रे आपण प्रथम आईचे बोट धरुन उभे राहिलात ते अगदी ताठच उभे राहिला असाल नाहि का?वृद्धापकाळ हा बालपणासारखच असतो म्हणुन म्हंट्ल्.बाकी तुंम्ही उपजतच ताठर असाल तर मग काय बोलणेच खुंटले...........एखाद्या वृद्धाबद्दल बोलताना जरा ताळतंत्र बाळगा..........उद्या आपले जन्मदाते वार्धक्याने वाकतील तेंव्हा अश्याच प्रकारे त्यांचा उपमर्द करणार आहात का? का आपण स्वतः अगदी ब्रम्हदेवाकडुन चिरतारुण्याचे वरदान प्राप्त करुनच या पृथ्वीतलावर अवतरला आहात.......? माहिती साठी- बाळासाहेबांवर डाँ नितु मांडके यांनी जेंव्हा बायपास करण्याचे ठरवले तेंव्हा डॉक्टरांना बरेच धमकीचे फोन आले होते ......बाळासाहेबांचे बरेवाईट व्हावे म्हणून देव पाण्यात बुडवुन बसलेल्यांपैकी बर्‍याच जणांनी बाळासाहेबांचे प्राण वाचवु नयेत म्हणुन डॉक्टरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता ........एखादा मरणाच्या दारात असताना केवळ त्याच्या बद्दल असलेल्या आकसा व द्वेषापोटी त्याच्या मृत्युची कामना करणे म्हणजे माणुस नसल्याचेच लक्षण.......पण लक्षात ठेवा कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...... आणि सेनेची काळजी तुमच्यासारख्यांनी करण्याचे मुळीच कारण नाही.....सेनेचे काय करायचे ते सेनाप्रमुख ठरवायला समर्थ आहेत.....तेंव्हा सेना प्रमुख उभे राहतील अथवा नाही याची चिंता करु नका.......श्री विकास यांचा प्रतिसाद वाचला असाल अशी अपेक्षा आहे.....तेंव्हा काळजी नसावी. मिपावरील तुमच वय अवघ पाच दिवसांचच आहे म्हणुन लहान म्हणाले.....(कदाचीत नविन नाव धारण केले असाल देखिल तुंम्ही आणि नव्याने वावरतही असाल मिपावर!) कधी कधी माणासाच नुसत वयच वाढत बा़की सगळा आनंदी आनंदच असतो . जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

अनामिकातै (तुमचे इकडचे वय पाहून तै म्हणालो, रोष नसावा.), तुमचे म्हणणे पटले बरं का. अहो बाळासाहेबांच्या वयाची टर उडवण्याचा प्रयत्न नव्हता. तसे वाटले असल्यास क्षमस्व. (श्री कर्क हे वयोवृद्ध व्यक्तिंचा आदर कसा करावा याचे वर्ग चालवतात असे ऐकून आहे, त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.) बाळासाहेबांसारखे ताठ कण्याचे आणि स्वतंत्र बाण्याचे नेतृत्व मिळाल्यास शिवसेना पुन्हा उभी राहील असे म्हणायचे आहे. श्री उद्धवजी असे नाहीत असे म्हणत नाही बरंका. "अजून लहान आहात!" असे तुमच्याच शब्दात त्यांना सांगावेसे वाटते हे मात्र खरे. तुमच्यासारख्या सच्च्या शिवसैनिकांचा (सैनिक हा लिंगविरहीत शब्द आहे ना?) अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र!!!

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

श्री पुर्णपात्रे जय महाराष्ट्र! आपले स्पष्टिकरण वाचुन आनंद वाटला........माझ्या प्रतिक्रियेने आपण दुखावला असाल तर त्याबद्दल क्षमस्व....... केवळ सेनाप्रमुखांचे चिरंजीव म्हणून उद्धव पुर्णपणे त्यांच्यासारख्याच व्यक्तिमत्वाचे असतील अशी अपेक्षा करणे गैरच........कदाचित ते त्यांच्या मातोश्रींप्रमाणे शांत, संयमी ,मवाळ देखिल असायची शक्यता आहे......पण म्हणुन अगदी त्यांना "बाप कमाईपे खानेवाला,पुचाट" इत्यादी संबोधणे अनुचितच नाही का?......राजमधे बाळासाहेबांना कायमच बघत आलो आंम्ही....राज हे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेत्......त्यामुळे राजमधे बाळासाहेबांची झलक प्रत्येक बाबतीत जाणवते......उद्धवकडे सेनेचे नेतृत्व देऊन बाळासाहेबांनी जरुर चुकच केली याबद्दल दुमत नाही.....पण म्हणुन अखंड सेनेला दोष देणे ....इतकी वर्षे सेना काय करत होती ?सेनेने मराठी माणसासाठी काय केले आजतगायत ?असे प्रश्न राजने विचारावेत याचेच दु:ख जास्त आहे.....उणीपुरी साडेतीन वर्षे झाली राजला सेना सोडुन ,पण त्याआधी तर तो सेनेतच होता ना?बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी निदान राजला तरी परवानगीची गरज लागत नसावी.....जेथे प्रश्न संवादाने सुटू शकतात तेथे आततायी निर्णय घेऊन राजने स्वतःचे व त्याच्या पक्षाचे हित जरूर साधले ,पण वार्धक्याने शिणलेल्या आपल्या पित्यासमान काकांना त्याने ज्या यातना दिल्या त्याची भरपाई कोण करणार?........राजवर अन्याय झाला हे देखिल तितकेच खरे पण तरीही आमच्यासारख्या सेनेबरोबरच घडत गेलेल्या सच्च्या शिवसैनिकांना अपार दु:ख होत आणि हृदयाला पिळ पडतो तो फक्त सेनाप्रमुखांसाठी...... या कठीण प्रसंगातुनदेखिल सेना उभी राहिल याची १००% खात्री आहेच. जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

Hear! Hear! You said it! अनामिका, तुझ्या मतांशी मी संपूर्णपणे सहमत आहे. या दोन ठाकरे चुलतबंधूंनी "झालं-गेलं गंगेला मिळालं" या न्यायाने एक झालेच पाहिजे. नाहीं तर दोघेही खलास होतील व बरोबर मुंबईतला मराठी माणूसही नामशेष होईल. सार्‍या ठाकरे कुटुंबियांना शेवटी काय हवंय? मराठी माणसाचे पुनरुज्जीवन कीं स्वतःचा तात्कालिक फायदा? सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

In reply to by सुधीर काळे

सार्‍या ठाकरे कुटुंबियांना शेवटी काय हवंय? मराठी माणसाचे पुनरुज्जीवन कीं स्वतःचा तात्कालिक फायदा?
आपल्याला काय वाटते ?

In reply to by शाहरुख

शहारुखराव, सध्यातरी माझा कौल (दुर्दैवाने) "स्वतःचा तात्कालिक फायदा"कडेच झुकतो आहे. म्हणून वाटते कीं या पराभवाची 'चपराक' सर्वांना शुद्धीवर आणो. पण मराठीत एक म्हण आहे ना? "सुंभ जळाला तरी पीळ जळत नाहीं"! तसंच होईल आणि तसं झालं तर वाट लागेल सगळ्यांची. या फोरमवर जे बाळासाहेबांना जवळचे आहेत त्यांनी अकलेचे चार शब्द त्यांना सांगावेत. सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

In reply to by शाहरुख

सार्‍या ठाकरे कुटुंबियांना शेवटी काय हवंय? मराठी माणसाचे पुनरुज्जीवन कीं स्वतःचा तात्कालिक फायदा?
सदैव सत्ता! मग त्यातून सामान्य शिवसैनिकांचा आणि मराठी माणसांचा फायदा झाला तर झाला! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सदैव सत्ता! मग त्यातून सामान्य शिवसैनिकांचा आणि मराठी माणसांचा फायदा झाला तर झाला!
करेक्ट! हाही एक महत्वाचा मुद्दा आहेच! ;) तात्या.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला स्वतःला राजकारण्याने सत्तेसाठी हपापलेले असण्यात विशेष गैर वाटत नाही..किंबहूना असलेच पाहिजे.. प्रश्न आहे तो सत्ता मिळवल्यानंतर तो/ती काय करतो/करते याचा. सत्ता न उपभोगता केवळ देशसेवा करावी अशी माझी अपेक्षा नाहीय.. राजकारण्यांनी तसा दावा ही करू नये.निदान मला तरी ते कधीच पटणार नाही. (असे नाही की आपल्या थोर नेत्यांनी निरपेक्षपणे देशसेवा केली नाहीय..पण ते दिवस आता नाहीत)

In reply to by सुधीर काळे

सार्‍या ठाकरे कुटुंबियांना शेवटी काय हवंय? मराठी माणसाचे पुनरुज्जीवन कीं स्वतःचा तात्कालिक फायदा?
याचं उत्तर बाळासाहेब किंवा उद्धवच देऊ शकतील! जय मनसे! तात्या.

In reply to by अनामिका

उद्धवकडे सेनेचे नेतृत्व देऊन बाळासाहेबांनी जरुर चुकच केली याबद्दल दुमत नाही.....
विषय संपला! त्यामुळेच या निवडणुकीत शिवसेनेवर माती खायची वेळ आली! पक्ष मोठा. पुत्र नव्हे! जय मनसे! तात्या.

In reply to by अनामिका

आकसा व द्वेषापोटी त्याच्या मृत्युची कामना करणे म्हणजे माणुस नसल्याचेच लक्षण
बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्याबद्दल माहिती नाही पण माणुस नसल्याचेच लक्षण असलेले बरेच तुम्हाला ह्या धाग्यावर भेटतील !!!! - अफाट जगातील एक अडाणि.

हो ला मत दिले आहे. भेन्डीबाजार यांच्याशी सहमत आहे ऋषिकेश ------------------

कोणताही पक्ष फक्त जनताच संपवू शकते व वाढवू शकते. तेव्हा जनतेला हवी असल्यास शिवसेना नक्कीच पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे वाढेल. इतर कोणी पक्ष अगर व्यक्ती वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी अगर सूडभावनेतून शिवसेना संपवू शकणार नाही. यासाठी शिवसेनेने भाजप सारख्या कसलेही धोरण नसलेल्या पक्षाची साथ सोडून स्वबळावर व मराठी माणसाच्या हितासाठी व विकासासाठीच कार्य करत रहावे. भविष्यकाळ शिवसेनेचाच. थोरले बाजीराव यांस. रोमन कीबोर्ड वरून देवनगरी लिहिताना थोड्या चुका झाल्या आहेत. टाइप करताना सावकाश केल्यास चुका होणार नाहीत.

माझ्या मतें प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात ३-४ कसोटीच्या वेळा येतात जेंव्हां त्याला स्वार्थाकडे किंवा तात्पुरत्या फायद्याकडे न पहाता कठोर, अवघड व,दूरदर्शी निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेतांना आपली लोकप्रियता घटेल कीं वाढेल याकडे पाहून चालत नाहीं. राजकीय नेत्यांच्या आयुष्यातले असे क्षण त्यांच्या पक्षावर व राष्ट्रावर दूरगामी परिणाम करतात. बाळासाहेबांच्या व शिवसेनेच्या आयुष्यातही असे क्षण आले. शिवसेनेच्या उत्तराधिकार्‍यांबद्दलचा निर्णयही त्यापैकीच एक होता. दोघांना वेगवेगळे भौगोलिक क्षेत्र देऊन हा निर्णय बाळासाहेबांच्या हयातीत तरी घ्यायचे टाळता आले असते व तसे टाळायला हवे होते. पण एरवी निस्पृह व कठोर निर्णय घेणारे बाळासाहेब राज-उद्धव यांच्यातले भांडण सोडविण्याच्या कसोटीच्या क्षणी कमी पडले यात शंका नाहीं. नेत्याचे मोठेपण आणखी एका शक्तीत असते. एकादा निर्णय चुकीचा घेतला असल्यास ती चूक मान्य करून ती दुरुस्त करण्याचे व प्रसंगी "अबाऊट-टर्न" करण्याचे धैर्य ज्याच्याकडे असते तो थोर नेता मानला जातो. बाळासाहेबांना आपल्या घरातला कलह सोडवता आला नाहीं व त्यांनी चुकीचा निर्णय घेतला यात शंका नाहीं. त्यांना नेतृत्वाची झळाळी पूर्ववत करण्याची संधी अद्याप आहे. झालेली चूक मान्य करून व राज-उद्धव यांना एकत्र आणून ती दुरुस्त करता येईल. ही संधी त्यांनी वाया घालवू नये. शिवसेनेत एकी परत आणून तिला पुन्हा एक बुलंद शक्ती बनवून बाळासाहेब मराठी जनतेच्या गळ्यातले ताईत पुन्हा बनू शकतात. भवानीमाता त्यांना यात योग्य मार्गदर्शन करो व योग्य निर्णयाप्रत येण्याची शक्ती त्यांना देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना! सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

In reply to by सुधीर काळे

मनसे+ शिवसेना अशी युती म्हणजे दुधात साखर........भाजपाला मराठी लोकांची काही गरज वाटत नाही. अजुनही वेळ गेलेली नाही........जर मनसे आणि शिवसेना एकत्र लढले तर मुंबई मनपा त्यांचीच आहे. पण जर तर महत्वाचा आहे. कालच आयबीएन लोकमत वर राज ची मुलाखत पाहिली. शिवसेनेच्या पराभवाविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे त्याने टाळले.....कितीही लपवले तरी शिवसेना हरली त्याचे दु:ख राजला वाटतच असणार....राजचा राग उद्धव वर होता.शिवसेनेवर नाही. म्हणुनच वाटते की दोघांनी परत एकत्र यावे. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येतात तर मनसे शिवसेना का नाही. तो दिवस लवकर यावा हीच देवाचरणी प्रार्थना.

In reply to by अमोल खरे

सहमत "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by सुधीर काळे

पण एरवी निस्पृह व कठोर निर्णय घेणारे बाळासाहेब राज-उद्धव यांच्यातले भांडण सोडविण्याच्या कसोटीच्या क्षणी कमी पडले यात शंका नाहीं.
कमी पडले म्हणण्यापेक्षा आधळं पुत्रप्रेम आडवं आलं असं वाटतं! जय मनसे! तात्या.

In reply to by सुधीर काळे

इन फॅक्ट राजला नेतृत्व देवुन मनसे आणि शिवसेनेचे जर शिवसेनेतच मर्जर झाले तर शिवसेनेला न भूतो न भविष्यति असे यश मिळु शकते. खुंटी हलवुन बळकट केल्यासारखाच प्रकार होईल तो.! --------------------------------------------------- मला इतरांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने मी कुणाच्याही खरडींना प्रतिक्रिया देवु शकत नाही आहे. ypj@indiatimes.com .

In reply to by सुधीर काळे

सहमत "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

त्यानी जर दादर ला गजबजलेल्या भागात उध्दव ठाकरेना फोटो स्टुडीओ काढुन दिला तर उध्दव ठाकरे यशस्वी होतील ह्यात काही शंका नाही. बाकी राज नी शिवसेनाप्रमुख होण्यात काही अर्थ नाही. राजसाहेबाचे रोपटे मनसे चांगले वाढत आहे.आता फळाचा सीझन चालु होणार त्यामुळे पक्षांची झाडावर रेलचेल होणार.दुसरीकडे जायची गरज नाही. वेताळ

In reply to by वेताळ

दादर ला गजबजलेल्या भागात उध्दव ठाकरेना फोटो स्टुडीओ काढुन दिला तर उध्दव ठाकरे यशस्वी होतील ह्यात काही शंका नाही. :) मस्त ! सहमत आहे. राज नी शिवसेनाप्रमुख होण्यात काही अर्थ नाही. राजसाहेबाचे रोपटे मनसे चांगले वाढत आहे.आता फळाचा सीझन चालु होणार त्यामुळे पक्षांची झाडावर रेलचेल होणार.दुसरीकडे जायची गरज नाही. सही रे सही...!!! -दिलीप बिरुटे

शिवसेना परत उभारण्याची शक्यता कमी आहे. किंबहुना अगामी काळात राजसाहेब शिवसेनेचा एक मोठ्ठा गट फोडून आणतील. निकालानंतरच्या मुलाखतीत त्यांनी म्हणले होते की अगामी काळात मुंबईतील राजकीय समिकरणे बदलतीत. याचा अर्थे शिवसेनेतील असंतुष्ट नवनिर्वाचीत आमदार जे उध्दव साहेबांच्या कार्यपध्दतीवर नाराज आहेत त्यांना फोडून मनसेत आणून मनसेची ताकत वाढवणे यासाठी राज साहेब पुरेपुर प्रयत्न करतील . आणि बदलते राजकीय वारे, समिकरणे ओळखून शिवसेना भाजपतील अनेक जण त्यांना मदत करतील हे नक्की. काय सांगावे उद्या पुढील निवडणूकीत मनसे - भाजप युती देखील पहायला मिळेल आणि शिवसेना एकटी पडेल. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by अमोल केळकर

उद्या पुढील निवडणूकीत मनसे - भाजप युती देखील पहायला मिळेल आणि शिवसेना एकटी पडेल
मनसेने जर असे सत्तेसाठी युत्या बनविणे चालु केले तर शिवसेनेत नी मनसेत फरक तो काय अराहिल. आपण म्हणता तसे झाले तर शिवसेना नक्कीच पुन्हा वर येईल असे वाटते ऋषिकेश ------------------

भाजपावाल्यांचा काही भरोसा नाही. आज महाराष्ट्रात भाजपा फक्त शिवसेनेमुळे आहे. जरा शिवसेनेला सीट कमी मिळाल्या म्हणुन भाजपा ने त्यांची साथ सोडली तर तो हलकटपणाचा कळस* होईल. ( *सुमार केतकरांचा शब्द ) त्यापेक्षा राजने शिवसेनेबरोबर जुळवुन घेतले तर भाजपा बरोबर जायची गरज शिवसेनेला लागणार नाही. मुंबईत इतके अमराठी उमेदवार दिले होते भाजपाने ह्या वेळी.........त्यांनी जसे काही तोंडावर सांगितले की आम्हाला मराठी माणसांची मते हवीत...मराठी उमेदवार नकोत. भाजपा मुंबई अध्यक्षपदी मधु चव्हाण सारख्या माणसाला ऐनवेळी डावलुन गोपाळ शेट्टी सारख्या दाक्षिणात्य माणसाला अध्यक्ष केले गेले. मराठी माणसाने हे सर्व विसरावे असं ह्यांना वाटतं की काय ?

काँग्रेस पक्षाची ,जनतादलाची इतकी शकले झाल्यावर देखिल जर ते पक्ष तग धरु शकतात तर सेना देखिल त्याला अपवाद असु शकत नाही.........सेना नक्कीच उभी राहिल .........सेना बुडावी नामशेष व्हावी म्हणुन देव पाण्यात बुडवुन बसलेल्यांची इच्छा कधिही पुर्ण होणार नाही जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

.......सेना नक्कीच उभी राहिल .........
नक्कीच! परंतु त्याकरता सेनेला आता राजसारख्या नेत्याची आवश्यकता आहे! जय मनसे! तात्या.

In reply to by अनामिका

अच्छा अच्छा, शिवसेना आणि काँग्रेस एकाच माळेचे मणी आहेत तर! असो. चालायचंच. सेना बुडणं, नामशेष होणं कठीण आहे; झालंच तर नामकरण होईल पुन्हा एकदा ... "नम से" असं! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुतावरुन स्वर्ग गाठताय गाठा. तुमच्यासारख्या संपादकमंडळात असलेल्या विद्वानांपुढे आमच्यासारख्या अल्पमती असलेल्यांचा निभाव कसा काय लागायचा बुवा..? फाटे फोडायची सवयच असल्यावर काय करणार नाही का? "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

काँग्रेस पक्षाची ,जनतादलाची इतकी शकले झाल्यावर देखिल जर ते पक्ष तग धरु शकतात तर सेना देखिल त्याला अपवाद असु शकत नाही.
हे आपलंच वाक्य अनामिकाताई! काँग्रेस आणि शिवसेनाला समान न्याय आपणच लावलात. जे काँग्रेसच्या बाबतीत झालं तेच शिवसेनेच्या बाबतीत होऊ शकतं हे तुम्हीच लिहीलं आहेत, मी नाही. असो. राहता राहिला चुकीच्या माहितीवर आधारीत व्यक्तिगत हल्ल्याचा प्रश्नः गेट वेल सून! अदिती खुद के साथ बातां: हल्ली गीतापठन वाढलं आहे का काय माझं?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यु टू गेट वेल सून! ज्ञानात भर घातलीत त्याबद्दल धन्यवाद! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

सेना पुन्हा उभी रहावी, ही गरज व आशा आहे. सेनेने चुका केल्या असतीलही पण मराठी माणसासाठी खूप झट्लीय हेही तितकेच खरे आहे.उद्धवनी खूप प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते अपुरे पडले. पण त्यानी निराश न होता, पूर्ण उत्साहाने पुन्हा सुरुवात करावी. यश जरूर मिळेल.

तुमच्या सारखे सच्चे सिवसैनिक आजकाल खुपच कमी बघायला मिळतात. एक तर ते परदेशात असतात नाहीतर कॉग्रेस मध्ये असतात. वेताळ

In reply to by वेताळ

वेताळदादा! काँग्रेससारख्या फालतु व दळभद्री पक्षांना मी फाट्यावर मारते.......भारताबाहेर राहणे हे माझ्यासाठी अपरिहार्य आहे म्हणून केवळ राहते.........पण ते देखिल काही काळासाठीच्....शेवटी कर्तव्य पार पाडायलाच् लागतात्.......ज्याला कर्तव्याची जाण नाही ती व्यक्ती नतद्रष्ट म्हणुन ओळखली जाते बरोबर ना?.... मातृभुमीची ओढ इतकी आहे की इथे कुणी सवलती देऊन कायम वास्तव्य करा सांगितले तरी आंम्ही करणार नाही......... काँग्रेससारख्या पक्षात माझ्यासारख्याने जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही कारण काँग्रेस पक्षात आहे हे माझ्यासारख्यांसाठी शिवी हासडल्याप्रमाणे आहे......... शिवरायांचा व संभाजीराजांचा जो इतिहास आंम्ही वाचलाय,जाणलाय तो अंगिकारलाय,पुर्णत्वाने आत्मसात केलाय, तेंव्हा स्वतःच्या क्षणिक फायद्यासाठी सुद्धा प्रतिकुल परिस्थितीत देखिल सेनेची साथ माझ्यासारखे जन्माने शिवसैनिक असलेले सोडु इच्छित नाही.....सेना उद्या नाही राहिली तरिही आंम्ही काँग्रेससारख्या दळभद्री पक्षात जाण्याचा प्रमाद कधिही करणार नाही........कारण आंम्ही म्हणजे राणे,सरवणकर भुजबळ्,नाईक,प्रधान नव्हे,कॉंग्रेस व तिच्या पिल्लावळीच्या वळचणीला जाऊन बसायला! राजचा उल्लेख केला नाही कारण त्याने स्वतःचा पक्ष स्थापन करुन आपल वेगळेपण सिद्ध केलय....... आणि हो तुमच्या माहीतीसाठी सांगते निवडणु़कीच्या काळात सेना सोडुन इतर कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते अथवा उमेदवार निदान माझे घर वगळुन प्रचार करतात ....यातच सर्वकाही आले. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

काँग्रेससारख्या फालतु व दळभद्री पक्षांना मी फाट्यावर मारते
'दुर्दैवाने' राज्याबाहेर सेनेची अशी प्रतिमा आहे.आपण त्यांनाही फाट्यावर मारत असाल तर प्रश्नच मिटला. मी काँग्रेससमर्थक नाही पण काँग्रेस वगैरे फालतु दळभद्री कसे?सेनेकडे मनमोहनसिंग्/कपिल सिबल सारखी किती माणसे आहेत? विविध क्षेत्रातील किती मराठी जाणकार लोकांना सेनेने आकर्षित केले(सुरेश प्रभु एक अपवाद पण त्यांचे नंतर काय झाले हे आपण जाणताच)? करबुडव्या अमिताभ बच्चनचे सेनाप्रमुख सामनामध्ये समर्थन करतात त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?काँग्रेसला मत देणारे मराठी मतदार मूर्ख आहेत असे आपल्याला वाटते का? भेंडी क्ष्^न + य्^न = झ्न

In reply to by चिरोटा

सेनेचे अस्तित्व फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहे.कारण मुळात हा प्रादेशिक पक्ष आहे...........इतर प्रदेशांमधे सेनेचा विचार कितपत तग धरेल याबद्दल निदान मला तरी शंका आहे. करबुडव्या अमिताभ बच्चनचे सेनाप्रमुख सामनामध्ये समर्थन करतात त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे असे समर्थन केल्याचे माझ्या निदर्शनास आलेले नाही....... हाच निकष लावता लाखो करोडो रुपायांचे अपहार करणारे,भ्रष्टाचारान देश व समाज पोखरणारे ,लाखोंची विजबिले थकवणारे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींबद्दल आपले काय मत आहे? मराठी मतदार नक्कीच सुज्ञ आहेत याबद्दल माझ्यासारख्या पामराने शंका घेणे म्हणजे फार मोठे पापच..... आणि गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देणारा, दारु आणि पैसा वाटुन, मतदारांना आकृष्ट करण्याचा पायंडा पाडणार्‍या काँग्रेसपक्षासारखा सर्वगुणसंपन्न पक्ष अखंड हिंदुस्थानात तर सोडाच या पृथ्वीतलावर सापडणे अशक्यच !. जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

काँग्रेससारख्या फालतु व दळभद्री पक्षांना मी फाट्यावर मारते. आपल्याला रुचो वा न रुचो पण जनतेने काँग्रेसला बहुमताने निवडून दिले आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता फालतू आणि दळभद्री आहे, असा अर्थ घ्यावा काय? कृपया शब्द जपून वापरावेत आणि जनतेचा उपमर्द करू नये. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

आपल्याला रुचो वा न रुचो पण जनतेने काँग्रेसला बहुमताने निवडून दिले आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता फालतू आणि दळभद्री आहे, असा अर्थ घ्यावा काय? अशाच पद्धतीने गुजराथेत भाजपाची सत्ता आली आहे त्याला काय म्हणले जाते? तिथे पण मग तेच आरोप सगळ्या गुजराथी समाजावर होतात असे वाटत नाही का?

In reply to by विकास

नक्कीच! शेवटी लोकशाहीत लोकांची इच्छा हीच सर्वोच्च. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

नक्कीच! शेवटी लोकशाहीत लोकांची इच्छा हीच सर्वोच्च. धन्यवाद! हाच मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवावा असे वाटते! :)

In reply to by विकास

धन्यवादाबद्दल आभार विकासराव. पण हे शब्द वापरण्याबद्दलचे आपले मत मात्र समजले नाही! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

धन्यवादाबद्दलच्या आभाराबद्दल धन्यवाद... ;) पण हे शब्द वापरण्याबद्दलचे आपले मत मात्र समजले नाही!
(शेवटी लोकशाहीत लोकांची इच्छा हीच सर्वोच्च.) हाच मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवावा असे वाटते!
यामधे माझे मत आले नाही असे वाटते का?

In reply to by विकास

इथे कोणाही सदस्याने भाजपाला फालतू आणि दळभद्री पक्ष म्हंटलेले नाही तरीही मुद्दाम हा खोडसाळपणा कशासाठी? गुजरात झाले आता बंगालमध्ये कम्युनिस्ट निवडून येतात तेव्हा हेच आरोप बंगाली समाजावर होतात असे वाटत नाही का? असले फाटे फोडण्यात काय अर्थ आहे? अवांतर: वरती एक संदर्भ मागीतला आहे. तो देता येत नसेल तर आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहून आपला वरील प्रतिसाद संपादित करावा.

In reply to by सुनील

यात जनतेचा उपमर्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही............काँग्रेसपक्षाबद्दलचे माझे वैयक्तीक मत मी इथे प्रदर्शित केले...........जनतेने इतर पक्षांच्या उमेदवारांना देखिल निवडुन दिले आहेच्...........आणि कुणी कुठल्या पक्षाला मत द्यावे अथवा देउ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे..........जनतेने काँग्रेसला बहुमत दिले(?) पण माझ्या मते आघाडी निवडणुकीच्या या परिक्षेत काठावर पास झाली आहे ........आणि आघाडी पुन्हा निवडुन आली (आणली)याला कारणे अनंत आहेत..... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

मताचे माहिती नाही पण आपल्या एकंदर प्रतीसादातून तुम्हाला मिळालेली शिकवण आणि संस्कार बरोबर दिसत आहेत !!!! बाळासाहेब असो वा उद्धव असो, राज असो, मुंडे असो वा काँग्रेस मधील कोणी असो , हे सर्व सामान्य माणसाचे पश्न सोडवायला राजकारणात आहेत ह्या गोड गैरसमजावर तुम्ही इथे भांडत बसा, तिकडे त्या लोकांना झाट फरक पडत नाही. सर्वांना मतलब सत्ता मिळाल्याशी... राज ठाकरे हे शिवसेनेत तयार झालेले असल्याने त्यांच्या कडून फार काही वेगळ्या अपेक्शा करणेच चूक आहे. शिवसेनेत तिकीट वाटपावरून आरडा ओरड चालू होती तेव्हा खंदे राज समर्थक 'घाटी' मनसे सोडून शिवसेनेत गेले ते त्याच कारणावरून... तेव्हा राज खुप वेगळा आहे, तो काही वेगळे करून दाखवेल हि समजूत फार काळ टिकणार नाही. बाकी चालू द्यात... - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by अडाणि

मताचे माहिती नाही पण आपल्या एकंदर प्रतीसादातून तुम्हाला मिळालेली शिकवण आणि संस्कार बरोबर दिसत आहेत !!!! हे विधान मी वैयक्तिक घ्यावे कि न घ्यावे......आणि आमच्या शिकवण आणि संस्कारांची चिंता तुंम्हास कशाला?आमच्या शिकवणीचे व संस्कारांचे जे काही फायदे तोटे आमच्या आयुष्यात होणार् आहेत त्याला सामोरे जायला आंम्ही समर्थ आहोत......... राज ठाकरे हे शिवसेनेत तयार झालेले असल्याने त्यांच्या कडून फार काही वेगळ्या अपेक्शा करणेच चूक आहे. शिवसेनेत तिकीट वाटपावरून आरडा ओरड चालू होती तेव्हा खंदे राज समर्थक 'घाटी' मनसे सोडून शिवसेनेत गेले ते त्याच कारणावरून... तेव्हा राज खुप वेगळा आहे, तो काही वेगळे करून दाखवेल हि समजूत फार काळ टिकणार नाही. हा निष्कर्ष तुमचा झाला आमचा काही तरी वेगळा असु शकतो...... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

हे विधान मी वैयक्तिक घ्यावे कि न घ्यावे
बिल्कुल घेवु नये... हे विधान तुमच्या (आणि तुमच्या सारख्या ईतर) जणांच्या विचाराला आहे.
आमच्या शिकवण आणि संस्कारांची चिंता तुंम्हास कशाला?
चिंता ह्या साठी की आम्ही सर्वांचा विचार करतो - सर्व समावेशक असे काय ते आमचे धोरण असते. हा परका, तो आपला असा भेदभाव करून फूट पाडायचे धंदे आम्हाला जमत नाहीत.
हा निष्कर्ष तुमचा झाला आमचा काही तरी वेगळा असु शकतो..
तुमचा निष्कर्ष वेगळा आहे ते दिसून येतेच आहे, प्रश्न असा आहे कि, अश्या कश्या हो तुम्ही..... वेगळ्या ... वेगळ्या ? बाकी,
सर्वांना मतलब सत्ता मिळाल्याशी.
ह्यावर तुमचा पतिवाद नाही म्हणजे हा मुद्दा तरी तुम्हाला संपुर्ण मान्य आहे असे समजावे का :? - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by अनामिका

अनामिकाताई, भावनेच्या आहारी जाऊन भलतेच शब्द वापरतांना जरा जपून... कारण आंम्ही म्हणजे राणे,सरवणकर भुजबळ्,नाईक,प्रधान नव्हे,कॉंग्रेस व तिच्या पिल्लावळीच्या वळचणीला जाऊन बसायला! तुम्ही उल्लेख केलेल्या वरील लोकांनी त्यांची पक्षीय आणि सामाजिक कर्तबगारी सिद्ध केलेली आहे (हो, अगदी राणे सुद्धा!!). त्यांच्यावर टीका करण्याआधी तुमची कर्तबगारी काय ती आधी स्पष्ट करावी.... सेना उद्या नाही राहिली तरिही आंम्ही काँग्रेससारख्या दळभद्री पक्षात जाण्याचा प्रमाद कधिही करणार नाही........ म्हणजे तुम्ही नक्की काय करणार? भाजपात जाणार? आणि मग तुमच्या कडवट सैनिकत्वाचं काय? की मनसेत? मग आत्ताच का येत नाही?

जे विकल्प दिले आहेत त्यात खालील भर घालून बदल करावेत. १. हो, पण राजच्या नेतृत्वाखाली २. हो, पण राजला परत शिवसेनेत आणले तर ३. हो, राज शिवसेनेत येवो अथवा न येवो ४. नाही. ती खलास झाली आहे ५. बरेचसे शिवसैनिक आता राजला मिळतील व शिवसेना "मनसे" या नव्या नावाने उभी राहील. (हे विकल्प दिले तरच खरे चित्र आपण बाळासाहेबांना देऊ शको. मला वाटते की हाच उद्देश असावा आपला!) सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

लोकांनी त्यांची पक्षीय आणि सामाजिक कर्तबगारी सिद्ध केलेली आहे अगदी बरोबर पण त्यांची किती पत्रास या महान व्यक्तींनी निवडलेल्या पक्षांनी ठेवली ते दिसतच आहे..........राणे सारख आमच कर्तृत्व नाही आहे तेच बरे आहे......आणि सेनेच अस्तित्व यदाकदाचित संपुष्टात आलच तर आंम्ही काय करु ते तेंव्हा ठरवता येईलच ...........मनसे आणि सेना यांना मी तरी निदान वेगळे मानत नाही.तेंव्हा माझ्या पुरता हा प्रश्न निकालात निघालाय..... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

सत्य समजावुन घेण्याचा प्रयत्न करा.कडवट सैनिक असला तरी थंड डोक्याने विचार करा.मी जे म्हणालो त्याचा अर्थ जे कोणी शिवसेनेवर मनापासुन प्रेम करतात त्याना आजकाल सेनेत जे काही चालले आहे ते बघुन वीट आला आहे.सेना समर्थक खुपच लोक आजकाल परदेशातच आढळतात. वा त्यानी सेना सोडुन कॉग्रेसची वाट धरली आहे. सेनेत ह्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीच्या तिकीटासाठी पैसे घेतले गेले आहेत.जे कोणी स्वकर्तुत्वावर निवडुन येण्याची शक्यता आहे त्याचा रामदास कदम केला गेला.गुहाघर मध्ये शिवसेनेचे रामदास कदम पडतात व माजी शिवसैनिक व सध्या राष्ट्रवादी मध्ये असणारे भास्कर जाधव निवडुन येतात. म्हणजे काय?सदा सरवणकरांना तिकीट हवे असेल तर मनोहर जोशीच्या घरावर दगड फेकायला सांगितले जाते. ह्याचा अर्थ काय?उध्दव ठाकरेंपेक्षा आता सेनेत नार्वेकर व वहिनीचे ज्यादा एकले जाते. तिकीटे तेच फायनल करत होते असे सांगितले जाते.ज्यादा काही बोलण्यात अर्थच राहिला नाही. राणे, व इतर माझ्या व तुमच्या पेक्षा जास्त कट्टर सैनिक होते व आहेत. आज ही ते मनापासुन साहेबांच्या वर प्रेम करतात. वेताळ

In reply to by वेताळ

वेताळदादा! तुंम्ही नमुद केलेल्या गोष्टींची कल्पना मला नाही असे तुंम्हास वाटत असेल तर शंकाच मिटली.........राजचे सेनेत परतीचे दोर अगदी पद्धतशीरपणे कापण्यात संजय राऊत्,सुभाष देसाई,यांसारख्या स्वतःला नेते म्हणवून घेणार्‍यांचा हात आहे हे सर्वशृत आहे.............सर्वसामान्य शिवसैनिकाला मातोश्रीचे दार आताशा बंद झाले आहे .......देशात गेल्यावर या सगळ्या गोष्टी जुन्याजाणत्या शिवसैनिकांच्या तोंडुन ऐकायला मिळतातच्..........मला सेनेबद्दल ममत्व आहे याला कारण केवळ सेनाप्रमुख.....त्यांना या वयात या दु:खाला तोंड द्याव लागतय याचच वाईट वाटतय्.......उद्धवसुद्धा या त्रिमुर्तीच्या हातच बाहुल बनलाय याच दु:ख आहे......अजुनही निदान बाळासाहेबांसाठी व समस्त महाराष्ट्रासाठी आपले मतभेद विसरुन दोघांनी मनातली किल्मिषे दुर करावित ....इत़कीच इच्छा आहे अजुन काय लिहु? "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

मला सेनेबद्दल ममत्व आहे याला कारण केवळ सेनाप्रमुख..
मलाही.... बाळासाहेबांसारखे पाईप ओढणे मला जमत नसले..... तरी मी बियर आवडीने पितो.... आणि देमार हाणामारीचे मसाला शिणेमे बघतो. त्यांच्या सारख्या शिव्या देता येत नसल्या... तरी प्रयत्न करतो..... माझ्या देवघरात मी बाळासाहेबांचीच तसबीर ठेवली आहे.......तुम्हीही ठेवली असेलच...

In reply to by निमीत्त मात्र

देवघरापर्यंत चालत जाण्याचे कष्ट का घ्यावेत? आंम्ही त्यांची तसबीर गळ्यातच घालुन फिरतो.........काही हरकत नाही ना तुमची? "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

बाळासाहेबांची तसबीर गळ्यात?....बाळासाहेब म्हणजे काय तुम्हाला 'गळेपडू' वाटले की काय?... त्यांचा पट्टा गळ्यात बांधत असाल तर गोष्ट वेगळी

In reply to by निमीत्त मात्र

बाळासाहेबांचा पट्टा गळ्यात घालुन घ्यायला देखिल आमची हरकत नाही कारण गळा आमचा आहे तेंव्हा पट्टा कुणाचा असावा हे ठरवण्याचा अधिकार देखिल आमचाच............. विदेशी पट्टे गळ्यात घालुन घेऊन शेपुट हलवत बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भुमित जन्मलेल्या अस्सल मराठी व हिंदुस्थानी असलेल्या बाळासाहेबांचा पट्टा गळ्यात घालणे केंव्हाही अभिमानस्पद आहे निदान आमच्या सारख्यांसाठी.बाकी इतरांचे माहित नाही? जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

विदेशी पट्टे गळ्यात घालुन घेऊन शेपुट हलवत बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भुमित जन्मलेल्या अस्सल मराठी व हिंदुस्थानी असलेल्या बाळासाहेबांचा पट्टा गळ्यात घालणे केंव्हाही अभिमानस्पद आहे मग तुम्ही स्वतः विदेशात कश्या काय?

In reply to by निमीत्त मात्र

मी कुठे रहाव अथवा राहू नये हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे..........तुंम्हाला स्पष्टिकरण देण्याची मला गरज नाहि......आणि आंम्ही विदेशात राहुन देखिल अस्सल देशी आहोत .......... स्वगत-काय पण भोचक माणसे असतात नसत्या उठाठेवी करायच्या द्यायला उत्तर नसले की. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

मी कुठे रहाव अथवा राहू नये हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे..........तुंम्हाला स्पष्टिकरण देण्याची मला गरज नाहि...
. मान्य आहे...तुम्ही कुठे राहावे ...कुणाचा पट्टा बांधून कुणासमोर शेपूट हलवावी... हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे....मी फक्त विसंगती दाखवली इतकेच...

In reply to by निमीत्त मात्र

आमचे वास्तव्य कुठे आहे हे आंम्ही आमच्या माहितीत उघड केले आहे म्हणून तुंम्हास समजले............भारतात सगळे झोपी गेल्यावर मिपावर निशाचरासारखा वावर करणार्‍या व्यक्ती जगाच्या कुठल्या कोपर्‍यात वास्तव्यास आहेत हे सांगण्याची गरज नक्कीच नाही........अर्थात तुमचे वास्तव्य कुठे असावे हा तुमचा खासगी मामला आहे त्याबद्दल मी आक्षेप घेण्याचे मुळीच कारण नाही........ आणि या वादाला सुरुवात आपणच केलीत .......मी तुमच्या कुठल्याही लिखाणाला अथवा प्रतिसादाला प्रतिक्रिया दिली नव्हती आणि एरवी देतही नाही असे असताना वैयक्तिक होण्याचे आपणांस काहीच कारण नव्हते.....दुसर्‍यावर उगीच वैयक्तिक चिखफेक करताना ती आपल्यावर देखिल होऊ शकते याचे भान ठवले तरी पुष्कळ झाले......मी फक्त अक्षय पुर्णपात्रेंच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांच्या स्पष्टिकरणानंतर त्यांची माफी मागण्याचे सौजन्य माझ्या स्वभावानुसार मी दाखवले होते..... आणि हो !आंम्ही कुणाचा पट्टा गळ्यात घालावा अथवा कुणासमोर शेपुट हलवावी हा अर्थातच सर्वस्वी माझा वैयक्तिक प्रश्नच आहे ......आणि त्याबाबतीत मला कुणाच्या सल्ल्याची अथवा मार्गदर्शनाची गरज नक्कीच नाही... हा विषय मी माझ्या पुरता संपवते आहे....कारण ना मी तुंम्हास ओळखत ना तुंम्ही मला .......आपण कोण आहात ?आपले वय किती आहे? याची मला कल्पना नाही, पण तरिही जर आपण माझ्या पेक्षा वयाने मोठे असाल तरच क्षमस्व. विसंगती बर्‍याच बाबतीत असु शकते. जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

शिवसेना परत उभी राहीली काय किंवा न राहीली काय, मला काहीही फरक पडत नाही, तरीही मी "हो" ला मत दिलेय..! कशाला उगाच कुणाचे वाईट चिंता...? :-) -- सुहास

अ) हो ब) नाहीं क) राज जवल सत्ता दिलि तर हे वरील तीन पर्याय अपुरे नाहींत कां? अनामिकाताई, वेताळ-जी व निमित्त मात्र-जी यांच्यातील वाग्युद्ध त्याचाच परिपाक आहे असे मला वाटते. आणि हे वाग्युद्ध जरासे चुकीच्या दिशेला वहात चालले आहे व भाषाही जराशी अयोग्य वापरली जात आहे. दोन दिवसापूर्वी दिलेले ५ पर्याय पहिल्यापासून दिले गेले असते तर जो निर्णय आला असता तो उपयुक्त झाला असता. अजूनही नीट पर्यायांसह हा कौल पुन्हा घ्यावा असे मला वाटते. बाळासाहेबांच्या चुका झालेल्या आहेतच, पण त्यांनी केलेले काम त्यांच्या चुकांच्या शंभरपटीहून जास्त मोलाचे आहे. म्हणून शिवसेनेच्या पराभवाचे असे अचूक पृथक्करण गरजेचे आहे. कारण त्यातून निर्णयाप्रत नेणारा मार्ग निघू शकतो. माझ्या पर्यायांत एकाद-दुसरा जास्तीचा पर्याय घालायचा असेल तर जरूर घालावा पण हा कौल पुन्हा घ्यावा. १. हो, पण राजच्या नेतृत्वाखाली २. हो, पण राजला परत शिवसेनेत आणले तर ३. हो, राज शिवसेनेत येवो अथवा न येवो ४. नाही. ती खलास झाली आहे ५. बरेचसे शिवसैनिक आता राजला मिळतील व शिवसेना "मनसे" या नव्या नावाने उभी राहील. सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

In reply to by सुधीर काळे

नवीन पर्याय मांडल्यावर मी मत दिले, पण बाकीचे फारसे उत्साहात दिसत नाहींत. पण बरेच लोक राजाभाऊंनी नेतृत्व सांभाळावे याच विचाराचे दिसतात. सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!

मराठी चं आरवणं महत्वाचं मग ते सेनेच्या कोंबड्याने असो कि मनसेच्या... सध्या मात्र मनसे कडुन अपेक्शा आहेत. शाकाहाराच्या नावाखालि जी मंड्ळी मराठीं ना घरे नाकारतात अश्या लोकंच्या मुनींसमोर लोटांगण घालणार्यंकडुन कसली अपेक्शा करणार.....