स्टिम्ड फिश - एक हेल्दी रेसीपी
हा गणपा सांगून देखील नुस्ता तळतळाट करत राहील्याने व क्रस्टेशनच्या डिश बनवत राहील्याने मासा पाकृ मलाच द्यावी लागतीय. अरे पोट आणी कुल्ले फ्व्वाक्कन बाहेर आली तरी नुस्ते तळकट पदार्थ हाणताय तुम्ही सगळे. लेको जरा बनवा मी सांगतो ते पदार्थ. मग आवडती स्त्रीला आवडेल असे काही आवडते काम करु शकाल. खालच्या डीश मधे तेल वापरले नाही म्हणून इथे नमनाला दोन चमचे ;-)
बरं तर उत्तम मासे निवडायला लागणारी "साधना" नसेल किंवा तुमची आवडती "कोळीण" नसल्यास, तुमच्या आवडत्या मॉल / बाजारात जाउन फ्रेश सी फूड विभागातून तुम्हाला आवडेल असे ताजे कापलेले माश्याचे काप विकत घ्या. मी गुरामी नावाच्या माश्याचे काप घेतले आहे. शिजल्यावर एकदम मस्त शुभ्र जसे कवड्या दह्याचा काप व्हावा असा एकदम मउ. अजिबात उग्र वास नाही म्हणुन आवडतो.
साहीत्य
मॅरीनेशनसाठी - लीम्बु रस, मीठ, तिखट, हळद, खिसलेले/पेस्ट आले (प्रमाण तुम्हीच ठरवा - मीठ व हळद चिमुटभर बाकीचे चवीनुसार)
शिजवताना - आले उभे बारीक चिरलेले काप. मिरच्या उभे बारीक चिरलेले काप, कोवळी कांद्याची पात चिरलेली.
एक स्टिमर आधुनि़क, जुना (मोदक पात्र) किंवा वापरण्याजोगा (cooking steamer images असा सर्च मारा) काहीनाही तर खाली एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळा व वरती एका चाळणीत छान केळ्याच्या पानात गुंडाळून मासा ठेवा वाफेवर शिजेल.
पाककृती
माश्याचे काप वर दिलेले साहीत्य लावून मॅरीनेड करा, किमान तासभर.
मग स्टीमरमधे ते काप ठेवुन त्यात तुम्हाला आवडतात तेवढे मिरच्याचे काप शक्यतो एक किंवा दोन पुरतील एका कापाला. आल्याचे काप (शक्यतो कोवळे आले असे की नुस्ते आले खायला देखील छान लागतील) थोडी कांद्याची पात कापलेली टाकून शिजवा. १० - १५ मिनिटात काप शिजतील.
मग तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुमचे आवडते सॅलाड, आवडती रक्त वारुणी/ ज्युस, आवडती फळे.. यकदम झकास बेत!!
वाचने
12159
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
स्टिम्ड फिश - एक हेल्दी रेसीपी
एकदम जहाल
In reply to एकदम जहाल by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
मस्त !
सहज काका
मस्त
कसे का
हा गुरामी
चला
ओ फिश!
In reply to ओ फिश! by सुबक ठेंगणी
हाऊ 'मीन' ऑफ
In reply to हाऊ 'मीन' ऑफ by विजुभाऊ
:)
छान
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to मस्त by नंदन
यस नंदन
In reply to मस्त by नंदन
बरोबर
In reply to बरोबर by सुनील
रिझ्लिंग
In reply to रिझ्लिंग by मिसळभोक्ता
रिझलिंग
In reply to रिझलिंग by विंजिनेर
छ्या!!
In reply to मस्त by नंदन
त्यातही
सुसाट! तात्
In reply to सुसाट! तात् by विसोबा खेचर
बूंगाट! --
छे मासें
In reply to छे मासें by दशानन
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
मस्त! हा
सोपी, पौष्टिक
In reply to सोपी, पौष्टिक by धनंजय
सहमत
In reply to सोपी, पौष्टिक by धनंजय
+१
In reply to +१ by चित्रा
लै भारी वैनी !!
एकदम सोपी
मस्त