स्क्रँबल्ड फ्रेंच टोस्ट
स्क्रँबल्ड एग्स (मसाला कमी असलेली / नसलेली अंडा भुर्जी) व फ्रेंच टोस्ट आपण नेहमी खातोच..... दिवाळीच्या आधीच्या रविवारी असच टवाळकी करत असता दोन्ही एकत्र करावे वाटले म्हणून हा उपद्व्याप.
लागणारे साहित्य :
तीन अंडी बलकासहीत फेटून (थोडं तिखट आणी मीठ घालून)
टोमॅटो सॉस
एक बारीक चिरलेला कांदा
चार ब्रेड स्लाईस
बाकीचं नेहमीचच - तेल, तिखट, मीठ
प्रथम एका फ्राय पॅन मधे तेलावर बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.
वरून थोडं मीठ आणी तिखट टाकून एकत्र करून त्यात तीन चतुर्थांश फेटलेले अंडे टाकून स्क्रँबल करा. बनलेली भुर्जी गॅस वरून उतरवून बाजूला ठेवा.
ब्रेड स्लाईसच्या जाड कडा कापून घ्या. कडा कापल्यानंतरच्या कडा ओल्या करून घ्या. दोन स्लाईसमधे स्क्रँबल्ड एग्स चे सारण भरा व कडा दाबून जोडून घ्या.
उरलेल्या फेटलेल्या अंड्यात थोडे पाणी घालून परत फेटा. हे मिश्रण एका पसरट थाळीत घ्या. आता सारण भरलेले ब्रेड स्लाईस ह्या मिश्रणात दोन्ही बाजूने चांगले घोळवून घ्या. आता हे सर्व एका फ्राय पॅन मधे तेल घेऊन त्यात शॅलो फ्राय करून घ्या.
आता तयार झाले तयार झाले स्क्रँबल्ड एग्स फ्रेंच टोस्ट.
(टीपः फ्रेंच टोस्ट च्या एवजी बेसनपीठाचा उपयोग करून अंडा भुर्जी भरलेले ब्रेड पकोडे पण बनवता येतील.)
खरं तर मला हे स्क्रँबल्ड एग्स फ्रेंच टोस्टच खायचे होते. पण हा प्रकार करताना बनवलेले स्क्रँबल्ड एग्स फ्रेंच टोस्ट तळायला टाकल्यावर फुटले, म्हणून मी हे फ्रेंच टोस्टच स्क्रँबल केले. त्यात थोडे तिखट , मीठ भुरभुरवले.... आणी आता तयार झाले स्क्रँबल्ड फ्रेंच टोस्ट
हा प्रकार खाताना खुपच कुरकुरीत लागतो...कारण ह्यात तेलात शॅलो फ्राय झालेला ब्रेड आहे आणी स्क्रँबल्ड एग्स पण...
आमचं रहाटगाडगं बॅचलर (ब्रम्हचारी म्हणायचं का ... :? ) असल्याने स्क्रँबल्ड फ्रेंच टोस्ट बनवलं , फोटो काढेपर्यंत तोंडाला पट्टी बांधली, नंतर पट्टी काढली आणी फस्त केलं .... थोडक्यात सांगायचं तर सजावटीला आपल्याकडे वेळ नव्हता...
सर्व्ह करताना टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
बघताय काय...करा हाणायला चालू ... :)
वाचने
6397
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
पाकृ सोपी
वा
In reply to वा by टारझन
उकडलेले अंडे...
In reply to उकडलेले अंडे... by शेखर
एक कोंबडी
वा
जे के बेकरी ... वाह
In reply to जे के बेकरी ... वाह by मस्तानी
अगदी
वा ! वा ! छान
वा ! वा ! छान
In reply to वा ! वा ! छान by अवलिया
वा ! वा ! छान
In reply to वा ! वा ! छान by पिवळा डांबिस
काका
In reply to काका by प्रभो
सॉरी, सॉरी!
वा ! वा ! छान
वा ! वा ! छान
सर्व पाकृ