>> कोणत्या शाईत आणि फाँटात लिहलेलं असतं रे ?
शाई ही वेगवेगळ्या ऑरगॅनिक रंगाची असते.... फाँट बद्दल म्हणशील तर प्रत्येकाचे प्रोपरायटरी फाँट असतात...
================
"दिल्ली" नावाचे एक राज्य आहे, आणि एक शहरही आहे. मैलाच्या दगडावर या शहराचे नाव सापडल्यास हरकत नाही.
(मात्र भारताच्या राजधानीचे नाव वेगवेगळ्या भाषांमध्ये "नवी दिल्ली", "नयी दिल्ली", "New Delhi" असे वेगवेगळे होते, ते योग्यच आहे, असे मला वाटते. पण हा मुद्दा वरील कौलापेक्षा वेगळा आहे.)
मात्र भारताच्या राजधानीचे नाव वेगवेगळ्या भाषांमध्ये "नवी दिल्ली", "नयी दिल्ली", "New Delhi" असे वेगवेगळे होते, ते योग्यच आहे, असे मला वाटते
हे योग्य नाही असे मला वाटते. कारण नवी/नयी/New ही विशेषणे नसून दिल्ली ह्या विशेषनामाचेच भाग आहेत, तेव्हा त्याचे भाषेप्रमाणे विविध रुपे करणे कदाचित योग्य ठरणार नाही. ह्यासंदर्भात नवी मुंबई ह्या शहराची आठवण येते. सर्व भाषांत याचे नाव (अधिकृतपणे) नवी मुंबई असेच आहे. न्यू यॉर्कचेही उदाहरण योग्य ठरावे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
देहली =Dehli हे दोन सारखेच आहेत. इंग्रजी व मराठी/हिंदीत जे घ्यायचे ते घ्या.
तसेच ह्यात Delhi हा पर्याय नाही आहे. दिल्लीलाच इंग्रजीत delhi असे लिहितात.
आणि धनंजय यांनी सांगितल्याप्रमाणे, 'नवी दिल्ली' ही राजधानी आहे असे माझेही मत आहे ;)
देहली म्हणजे दरवाजा असे वाचले होते. ब्रिटिशांनी त्याचे डेल्ली केले.मला नई देहली म्हणणे योग्य वाटते.
अवांतर-आता विधानसभा निकाल जाहीर व्ह्यायला काही तासच उरले आहेत्.तेव्हा फोकस मुंबईवर ठेवा. :P
भेंडी(नम्मा बेंग़ळुरु)
क्ष्^न + य्^न = झ्^न
देहली
तो शब्द देहली असा नसून दहलीज म्हणजे उंबरठा/वेस असा आहे.
दिल्ली हे मूळातले इंद्रप्रस्थ होते.पांडवानी खांडवन भस्मसात केले आणि त्या जागी स्वतःची राजधानी इंद्रप्रस्थ उभारले. तेम्व्हापासून दिल्ली ही राजधानीच राहिलेली आहे. एखाद्या शहराचे नशीब.
दिल्लीतला पुराना किला या इथे द्रौपदीचा महाल होता असे म्हंटले जाते.
(सध्या तिथे बरेच मैलाचे दगड पडलेले असतात हा भाग अलाहिदा)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
सरकारी कागदोपत्री राजधानी 'न्यू देल्ही', 'नई दिल्ली' अशी असेल तर अर्थातच हेच ग्राह्य धरले पाहिजे. आता येथून पुढे कमीतकमी माझ्या हातून तरी नीट लिहिले जाईल असे वाटते.
काय सांगता दिल्ली देशाची राजधानी आहे.... :?
माहीतच नव्हतं... नाय च्यामायला..
इथंपण भारतातल्या कुठल्याही लहान शहराप्रमाणे दिवसातून एक्-दोन खुन, दहा बारा दरोडे... १०० एक चेन / मोबाईल चोरी .. इकडे पण पोलिस चिरमीरी घेतल्या शिवाय सोडत नाही पब्लिक नियम पाळत नाही... व्हिआयपी साठी वेगळा नियम व सामान्य जनतेसाठी वेगळा नियम... दिल्ली देशाची राजधानी आहे.. च्यामायला पटतच नाय.. रेडिओ वर एफएम वाले सांगतात तोच रस्ता पकडावा लागतो.. कधी रिंगरोड जाम तर कधी बाहरी रिंगरोड जाम.. कधी करोलबाग जाम तर कधी.... एअरपोर्ट रोड जाम... हे नवीन नाहीच.... उंच उंच फ्लायओवर तर आहेत पण गाड्यांचे स्पिड कंट्रोल करणारेच कुठे दिसत नाही.. त्यामुळे मुंग्याप्रमाणे माणसं मरणं नवीन नाही... म्हणे दिल्ली देशाची राजधानी आहे... बाहरी दिल्ली मध्ये अजून पण रस्ता शोधावा लागतो.. नाही नाही ह्याचा पण हाल आमच्या गावच्या रस्त्यासारखाच आहे... खड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हा पीएचडीचा विषय... रस्त्यावर लाईट हवीच हे फक्त व्हिआयपी एरियासाठी... बाकी दिल्ली गेली खड्ड्यात... दरोडा पडला तरी... दोन तास पोलिस लापता... हे आपल्या युपी मधल्या शहरांसारखेच.... शहर चकाचक दिसले म्हणजे झाले... उपनगरे बसू देत कच-याच्या ढिगा-यावर... म्हणे दिल्ली देशाची राजधानी आहे... पार्किंग कुठे करावे हा सोपा प्रश्न ... गाडी वर गाडी उभी करावी की घरावरती हा जरा अवघड प्रश्न.. !
शितावरुन भाताची परिक्षा जर घ्यायची असेल तर मात्र दिल्ली खरोखर भारताची राजधानीच आहे ;) ज्याला भारत बघायचा आहे त्यांने जास्त नाही दिल्ली व दिल्लीचा एनसीआर फिरावा चांगला गल्ली बोळ फिरावा कळेल :)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
राजे राजधानीत असतात असे कळले होते त्यामुळे त्यांच्या प्रतिसादाची उत्सुकता होती.
राजधानीत फिरतांना अनेक गोष्टी "मॉडेल" स्वरुपातहे दिसतात. भारतातील इतर शहरात कशा सुविधा निर्माण कराव्यात ह्याची झलक देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो- उदा. एअर्पोर्ट कडे जाणारा रस्ता जर तुम्ही पायी फिरलात तर तुम्हाला जाणवेल की, रस्ते खूपच प्रशस्त आहेत व दोन्हीबाजूने छान जागा सोडोन त्यांनी एक वेगळाच आब राखला आहे.
राजधानी मला कधीच मानवली नाही- दर वेळी कोणीनाकोणी फसवले. आय हेट देम. कधी एकदा परतीच्या प्रवासाला लागतोय असेच वाटते.
तुम्ही मात्र तेथे अनेक दिवसापासोन तळ ठोकला आहे; तुमचे अनुभव मिपावर वाचायला आवडतील.
माझ्या प्रतिसादात मी म्हटले आहे ना...
व्हिआयपी एरिया हा खरोखर मॉडेल पध्दतीचाच आहे ;)
पण ह्या देशात / राजधानीत फक्त व्हिआयपीच राहतात की काय असे वाटतं कधी कधी...
तुम्ही दिल्लीला येऊन फसलात.... अरे रे मग तुम्हाला दिल्लीचे ठग कसे महा ठग आहेत हे स्वानुभवाने कळालेच असेल ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राजे स्वाक्षरी दिल्ली ला साजेशी करा आता.
"हज़ारों रासते ऐसे के हर रासते से हम निकले,
बहुत बुरे फसे ऐसे के हर रासते पे नाक मे दम निकले । "
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रतिक्रिया
मैलाच्या
"मैलाचा
In reply to मैलाच्या by शेखर
>> कोणत्या
In reply to "मैलाचा by टारझन
अहो, मी
In reply to मैलाच्या by शेखर
च्यायला
पैकी "दिल्ली" मैलाच्या दगडांवर दिसले तर चालेल
खरे आहे,
In reply to पैकी "दिल्ली" मैलाच्या दगडांवर दिसले तर चालेल by धनंजय
विशेषण आणि विशेषनाम
In reply to पैकी "दिल्ली" मैलाच्या दगडांवर दिसले तर चालेल by धनंजय
देहली =Dehli
देहली
देहली
In reply to देहली by चिरोटा
देहली तो
In reply to देहली by अमृतांजन
सरकारी
सरकारी
In reply to सरकारी by विसोबा खेचर
काय सांगता
राजे
In reply to काय सांगता by दशानन
माझ्या
In reply to राजे by अमृतांजन
"हज़ारों
In reply to काय सांगता by दशानन