दिवाळी नंतर आलेल्या विडंबनाच्या बहरात आमचेही एक कण्हेरीचे फूल. प्रेरणा: रंगाकाकांनी पाडलेले हे विडंबन . बाकी मात्रा-बित्रा नियमाप्रमाणे आधीच फाट्यावर मारल्याने त्यात सदर काव्य बसणार नाही याची काळजी घेतलेली आहे.
'खोका' वदून गेल्या, आता नडेन म्हणतो
काढून आयड्यांना खंदा लढेन म्हणतो
गुद्दा अवांतरातला हा मी सोसणार नाही
जे जे दिलेस ठोसे सारे फेडेन म्हणतो
सारेच कंपू माझे ना उतरले स्थळी या
बसलेत खनपटीला ते वापरेन म्हणतो
माझ्याघरी कसा मी ढोसत आज बसलो!
काव्य बुधवाराचे आता लिहेन म्हणतो
कंपूच सारे फुटले, ना दोष आयड्यांचा
कंपू असा स्वतःचा आता करेन म्हणतो
ती आमिषे 'पदा'ची असती सदाच खोटी
बिरुदे आता तशीही लावीन स्वतःच म्हणतो
माझ्याच लेखनाची सारी टवाळी आहे
तोही लाथ पेशव्या तुला घालीन म्हणतो
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2888
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा!
काय
काय
:-)
लगे रहो.
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
व्वा...
लै भारी रे
नड
ती आमिषे
मस्त :)
हाण तिच्यायला
सर्व रसिक