.. भाग २ ..
" यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत|"
-- गीता ४.७..
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली अथवा धर्माला र्हास झाला त्या त्या वेळी भगवान विष्णूने वेगवेगळी रुपे धारण करुन ॠषी मुनी, पृथ्वीवर आणि लोंकाचे आपल्या दैवी सामर्थ्याने रक्षण केले. पृथ्वीवर अनाचार माजला की सर्व ॠषी मुनी आणि इतर देवादिक मंडळी क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊन भगवान विष्णुची प्रार्थना करीत आणि नतमस्तक होवून विनवणी करत असत की देवा पृथ्वीवर माजलेला हा अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या सर्व गोष्टीचा नाश कर आणि आम्हाला भयमुक्त कर. त्या प्रमाणे भगवान विष्णूनी प्रत्येक अवतारामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश करुन सर्वाना प्रत्येक वेळी सदाचाराकडे नेण्याचे आर्दश दाखवून दिलेत. आपण ग्रंथातून, कीर्तनातून, दूरदर्शन माध्यमाव्दारे रामायण, महाभारत, कृष्ण या मालिकेतून पहातो, ऐकतो, तरीपण आजच्या या कलियुगामध्ये आम्हा मानवात काही बदल होतो आहे का? विज्ञानवादी आणि देवचे अस्तिव नाहीच म्हणणारी काही मंडळी भगवान अवतार धारण करतात का? आणि खरोखरच भगवान अवतार धारण करणार असतील तर ते आपले अवतार कार्य कधी सुरु करणार असे विचारणारे लोक आहेत. आम्हा मानवांचे आयुष्य शंभर वर्ष विधात्याने नक्की केलेले जवळजवळ आहे. वय वर्ष शंभर पुढील काळ हा हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच मंडळीना मिळतो. मग या मिळालेल्या आयुष्यात नराचे नारायण होणे श्क्य आहे काय? याचे उत्तर खरोखरच मानवाने दैवी शक्तिचे चिंतन, मनन आणि सत्संगाची कास धरल्यास निश्र्चितच मिळेल. सध्या मानव बहुतांशी भैतिक गोष्टीत रत झालेला आहे. तरीपण मानव संकट्ग्रस्त झाला की मात्र तो कोणात्याही भैतिक सुखाचा विचार न करता सत्संगाचा, दैवी शक्तिच्या नामस्मरणाचा, जपानुष्ठानाचा व इतर धार्मिक कार्याचा विचार करु लागतो. आपल्या वाट्याला आलेली संकटे, दु:खे दूर कशी होतील, आपल्याला मानसिक समाधान कसे मिळेल हे विचार सातत्याने मनामध्ये येत राहातात आणि मग गीतेमधील भगवंतानी सांगितलेला श्र्लोक --
"परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम,|
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||"
-- गीता ४.८
सदरचा श्र्लोक केव्हातरी ऐकलेला, वाचलेला स्मरु लागतो. यातून काहीतरी आयुष्यात देवाचे, सध्द्गरुचे एखाध्या संप्रदायाचे पाईकपणा स्वीकारणे हे अत्यंत जरुरीचे आहे असे वाटते. संत श्रेष्ठ कबीर सांगतात-
" दु:खमें सुमरन सब करे सुखमे करे न कोय |
जो सुखमें सुमरन करे, तो दु:ख कहॅ|से होय ||"
संजिव
क्रमष भाग ३ पुढे..
वाचने
5712
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
विष्णूची वाट पाहतो आहे!
*
In reply to विष्णूची वाट पाहतो आहे! by विसोबा खेचर
धोंडा
In reply to विष्णूची वाट पाहतो आहे! by विसोबा खेचर
हाहाहाहाहाहा!
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तात्या?
हो हो! :)
In reply to म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तात्या? by चतुरंग
हा शोध / मार्ग कुठे नेणार आहे ?
माझं मत..
In reply to हा शोध / मार्ग कुठे नेणार आहे ? by आर्य
पण हे प्रश्ण अनूत्तरीत आहेत .....
In reply to हा शोध / मार्ग कुठे नेणार आहे ? by आर्य
स्वर्ग
ओक्के..
In reply to स्वर्ग by आर्य
व्यासप्रेमी व आर्य
क्षमस्व !
आपले वय आणि पोंच माहीत नसल्याने केवळ ऐकेरी ऊल्लेख आहे