जालिय लेखनाची दखल...
लेखनप्रकार
आज आंतरजालावर बरीच मराठी संस्थळं भरभराटीला येत आहेत, मराठी युनिकोडसुविधेमुळे मराठी टंकन सुलभ झाले आणि ब्लॉग्जचे पेव फुटले... त्यामुळे ज्या लोकांनी आयुष्यात आपण कधी लिहू असे कल्पिलेही नसेल असे लोक लिहू लागले, मराठी वाचन कमी झाले म्हणता म्हणता या नवीन तंत्राविष्कारामुळे मराठी वाचनच नव्हे तर लेखनही वाढते आहे. एकूणातच... एक नवीन जग आकारास येत आहे. आणि आपण आजचे नेटकर या विश्वाचे सुरूवातीचे दिवस आणि वाढ अगदी पहिल्या रांगेत बसून बघतो आहोत.
तर जालिय दिवस असे सुखासमाधानात जात असताना, साधारण तीनेक आठवड्यांपूर्वी अचानक रामदासांचा व्यनि आला. एखाद्या सदस्याचे सगळे लेखन बघायचे असेल तर काय करायचे? म्हणलं एकदम काय झालं या बाबाला... पण काही काम असेल म्हणून त्यांना युक्ति सांगितली. परत दोनतीन दिवसांनी दुसरा व्यनि. तुमचे लेखन एखाद्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करायचे झाले तर तुमची काही हरकत आहे का? मी एकदम उडालोच. काहीच कळेना. मग सरळ फोनच लावला. तेव्हा कुठे सगळी भानगड कळली.
रामदासांच्या विश्वसंचारादरम्यान त्यांना जे काही लोक भेटत असतात त्यापैकी एका प्रसिध्द दिवाळीअंकाचे संपादक एक होते. सहज ओळख झाली आणि त्यांच्या गप्पांदरम्यान मराठी आंतरजालविश्वाची ओळख रामदासांनी त्यांना करून दिली. परंपरागत मासिकं आणी दिवाळी अंकांच्या जगातील या लोकांना आपल्या या जालिय विश्वाची ओळखच नव्हती... किंबहुना असे काही आहे ही पुसटशी कल्पनाही नव्हती. जालावर होणारे मराठी लेखन बघून या मुरब्बी संपादकांच्या तोंडाला पाणी न सुटते तर नवलच. त्यांची ऑफर आली... लेखकांची परवानगी असेल तर त्यातले काही लेखन दिवाळी अंकातून प्रसिद्ध करू. तो दिवाळी अंक म्हणजे ग. का. रायकर यांनी चालू केलेला 'श्रीदिपलक्ष्मी' आणि आता संपादक आहेत श्री. हेमंत रायकर.
रामदासांनी त्यांना आवडलेल्या लेखांची आणि इतर साहित्याचे दुवे रायकरांना दिले. त्यापैकी काही रायकरांनी निवडले आणि तेव्हा मला रामदासांचा तिसरा व्यनि आला. खोबार रायकरांना आवडले आहे आणि प्रसिध्द करायचे झाले तर तुमच्या काय अपेक्षा आहेत? मी काय बोलणार? मग म्हणलं आपल्या मोडकाला विचारावं... तो यातलाच माणूस आणि आपला दोस्त. मग त्याच्या सल्ल्याने, संमती देणारे मेल केले. लेखाच्या खाली मिसळपावचा श्रेयोल्लेख करायची सूचना त्याचीच. तर अशा प्रकारे हे सगळं घडलं. एकीकडे रामदासांचे धातुकोष आणि शिंपिणीचं घरटं हे लेखही अंकात समाविष्ट झाले होते. रामदासांनी मराठी आंतरजाल आणि मायबोली, मनोगत, उपक्रम इत्यादी सगळ्याच संस्थळांवर एखादा लेख यावा अशी कल्पना मांडली. तसे नीलकांतशी बोलणेही झाले. त्याने लेखन सुरूही केले पण काही वैयक्तिक अडचणींमुळे जमले नाही ते त्याला.
मला हा सगळाच नवीन प्रकार होता. प्रथमच असं काही तरी छापून वगैरे येणार होतं. त्यामुळे वाट बघत होतो. तो अंक आज हाती आला. अंकाच्या संपादकियात रायकरांनी मराठी आंतरजालाचा उल्लेख करून इथे चाललेल्या लेखनाची दखल घेतली आहे. तसेच, अनुक्रमणिकेत तात्या अभ्यंकरांचा आणि आपल्या मिपाचा उल्लेख करून विशेष आभार मानले आहेत.
माझा लेख आहे म्हणुन नव्हे पण एकंदरीतच कोणत्याही प्रकारे प्रथितयश लेखक नसणार्यांसाठी ही दखल म्हणजे एक सन्मान आहे असे मला वाटते. अशा लोकांसाठी आता हे एक दार उघडले गेले आहे असे वाटते. उत्तमोत्तम लिहिले जावे, वाचायला मिळावे हीच मनोमन इच्छा. त्यायोगे मराठी भाषेलाच एक नवीन संजीवन मिळेल हे नक्की.
या अंकातील काही पानं स्कॅन केली आहेत... बाकी अंकातच वाचा. :)
संपादकिय...
अनुक्रमणिका पान क्रमांक १ वरील मिसळपावचा श्रेयोल्लेख.
अनुक्रमणिका पान क्रमांक २.
शिंपिणीचं घरटं.
धातुकोष.
खोबारकथा.
वाचने
11017
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
बिपिनदा
In reply to बिपिनदा by निखिल देशपांडे
+१...
In reply to +१... by मस्त कलंदर
+१
In reply to +१ by टारझन
+२
In reply to +२ by गणपा
+ ३
In reply to +१ by टारझन
अभिनंदन!
अभिनंदन
In reply to अभिनंदन by वल्लरी
+१
अरे वा !
In reply to अरे वा ! by संदीप चित्रे
+ १ दोघांचे अभिनंदन
In reply to + १ दोघांचे अभिनंदन by लवंगी
+१
'व्हर्चुअल' टोपीतलं एक 'व्हर्चुअल' पीस
अभिनंदन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to अभिनंदन by नंदन
असेच
In reply to असेच by Nile
अवांतर:
In reply to अभिनंदन by नंदन
असेच
दोघांचे हार्दिक अभिनंदन
मस्त!
In reply to मस्त! by सहज
* (जालीय फाजीलीय वगैरे नाही, प्रिन्ट मेडीया हो!)
अभिनंदन......!
अरे वा!! छान
In reply to अरे वा!! छान by रेवती
अरे वा!
In reply to अरे वा!! छान by रेवती
+१
सुप्रसिद्
अभिनंदन!
अभिनंदन
बिका, रामदास आणि तात्या ह्यांचे अभिनंदन!!
In reply to बिका, रामदास आणि तात्या ह्यांचे अभिनंदन!! by चतुरंग
सहमत आहे
रामदासभौ
In reply to रामदासभौ by विसोबा खेचर
असेच म्हणतो !
बिपीन भौ..
अभिनंदन!!!!
बिपिन आणि
अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन
हार्दीक अभिनंदन
अभिनंदन!
बिकाभाऊ व रामदासजींचे अभिनंदन!
बिपिनदा,
अभिनंदन!!
बिका,रामदास
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by सुनील
हेच म्हणतो..
अभिनंदन
In reply to अभिनंदन by आनंदयात्री
वेलकम बॅक
हार्दीक अभिनंदन