Skip to main content

आज तुम्ही तुमचे वापरले का?

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 13/10/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2043
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

माझे सद्य वास्तव्य मतदारसंघाबाहेर असल्याने इच्छा असूनही (कार्यबाहुल्यामुळे) मतदान करणे शक्य नाही. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझे सद्य वास्तव्य मतदारसंघाबाहेर असल्याने इच्छा असूनही (कार्यबाहुल्यामुळे) मतदान करणे शक्य नाही. हेच म्हणनार दुसरे काय??? निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by निखिल देशपांडे

माझे सद्य वास्तव्य मतदारसंघाबाहेर असल्याने इच्छा असूनही (कार्यबाहुल्यामुळे) मतदान करणे शक्य नाही. हेच म्हणनार दुसरे काय??? --प्रभो

होय, मी आज मतदान केले/करणार. अन मी माझ्या मतदारसंघात उपस्थित असताना नियमित मतदान करतो. ऋषिकेश ------------------

In reply to by सहज

पर्याय क्रमांक ५, अँड प्राऊड ऑफ ईट !!! :-) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

"नाही. माझे सद्य वास्तव्य मतदारसंघाबाहेर असल्याने इच्छा असूनही मतदान करणे शक्य नाही " तर ला मत दिले आहे. तसे म्हंटले तर राज्य सरकारने माझा बेंगळुरु-मुंबई-बेंगळुरु विमानप्रवासाचा खर्च दिला तर माझे अमूल्य मत योग्य उमेदवारास देऊन मी मतदानाचा हक्क अजूनही बजावू शकतो. दुपारी बाराची फ्लाईट घेतली तरीही चालु शकेल. सरकारला विचार करण्यास अजूनही वेळ आहे. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

मधील प्रश्नाचे उत्तर एकदम एम्फॅटीकली येस.

मतदान केले. दर वेळेस करतो. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

शीर्षक - आज तुम्ही तुमचे वापरले का?
काय?? =)) =))

In reply to by विसोबा खेचर

काय काय? अहो बोट... शाई लावायला ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

एक एक शौट आहेत. ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.

In reply to by विसोबा खेचर

>>आज तुम्ही तुमचे वापरले का? ऋष्या, कै च्या कै लिहून राह्यला का बे !:) होय, मी आज मतदान केले. अन मी माझ्या मतदारसंघात (इलेक्शनची डिवटी नसल्यास) उपस्थित असताना नियमित मतदान करतो. -दिलीप बिरुटे

विधानसभेसाठी आणि येथे मिपावर ह्या कौलासाठीदेखिल! होय, मी आज मतदान केले/करणार. अन मी माझ्या मतदारसंघात उपस्थित असताना नियमित मतदान करतो. ह्या पर्यायाला मत दिले आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आज मी माझे वापरु शकत नाही! कारण मी फार दुर आहे. :( जवळ जायला हवे! :( :(

जल्ला काय इसय काढलय राव!! मथला काय नी मजकूर काय!! लूकींग चायना टाकींग टोकीओ!!! माझा उत्तर घ्यावा: (५) नाही. माझे सद्य वास्तव्य मतदारसंघाबाहेर असल्याने इच्छा असूनही मतदान करणे शक्य नाही - कोकणी फणस

बरेच प्रश्न होते, कुणाला मतदान करायचे याबाबत. सर्वच पक्ष अन सर्वच नेते भ्रष्ट मग पाठिंबा द्यायचा तरी कुणाला अन कश्यासाठी. जाहिरनामे/वचननामे/वचकनामे सगळ्यांचेच आकर्षक पण तसे ते दरवेळीच असतात अन त्यातले मुद्दे पण कधीच बदलत नाहीत. यातला कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी परिस्थितीत काहीच बदल पडणार नाही. मग मतदान करण्यासाठी मी माझा वेळ, शक्ती खर्चावी का? असे. पण दुसरीकडे विचार होता की जर मतदान केले नाही तर या देशाचा/राज्याचा/समाजाचा मी स्टेकहोल्डर आहे हे कसे ठसवणार? लोकशाहीवादी असुन मानुस लोकशाही प्रक्रियेतुन बाहेर कसा राहु शकतो? मग ठरवलं की मतदान करायचं. माझं मत जो लोकांच्या उपयोगी पडलाय अश्या उमेदवाराला द्यायचं - मग त्याचा पक्ष कोणताही असो, तो भ्रष्ट असो वा गुंड गुन्हेगार, किंवा गरीब असो किंवा किलो किलोनं सोनं चमकावणारा. याच विचारानं सकाळी दोन तास रांगेत उभा राहिलो अन मतदान केलं. बरोबर माझ्या चार वर्षाच्या मुलाला पण नेलं होतं. त्याला मतदानयंत्र दाखवलं अन पोलिंग ऑफिसर, पोलिंग एजंट, पोलिसांचं काम पण समजावण्याचा प्रयत्न केला. सांगितले सरकारच रिपोर्ट कार्ड (त्याच्या शाळेत रिझल्ट ला रिपोर्ट कार्ड म्हणतात) तयार करतोय आपण. किती समजलं त्याला कळलं नाही पण मला माझ्या मुलाला सुजाण नागरीक करण्याचा मी प्रयत्न करतोय याचं तेव्हढंच समाधान.

नाही. माझे सद्य वास्तव्य मतदारसंघाबाहेर असल्याने इच्छा असूनही मतदान करणे शक्य नाही . देशभरातल्या फ्लोटींग जनतेला मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टीने कुठलाच पक्ष अथवा सरकार काही पावले उचलत नाही, याचा जाहीर निषेध. आमची मते जाणूनबुजून वाया जातील असे बघायचे आणि हवा तसा गोंधळ घालायला मोकाट सुटायचे, याला काहीही अर्थ नाही. मतदारसंघात होते तेव्हा आवर्जून जाऊन मतदान केले आहे मी पण आज ऑफिसवाल्यांनी (सरकारच्या कोणते ऑफिस चालू आहे बघायला फिरणार असणार्‍या स्क्वाड का काय म्हणतात त्याला घाबरून) जबरदस्तीची सुट्टी देऊन (ज्याची भरपाई म्हणून गेल्या शनिवारी ऑफिसात जाऊन काम करावे लागले आणि आजही वर्क फ्रॉम होम आहे!) घरी बसायला लावले आहे. राजकारणाचा आधीच मनस्वी संताप येतो मला आणि त्यात हे असे म्हटल्यावर तळपायाची आग मस्तकात न गेली तरच नवल! अर्थपूर्ण अशा या कौलांकडे लक्ष वेधून घेण्यासाठीही फाजील स्टंट्स करावे लागतात, याहून मोठा दैवदुर्विलास आणखीन दुसरा कोणता!

मतदान केले आहे...कोठेही असो..मतदानाच्या दिशी नेहेमी मतदार संघात असतो मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...

प्रत्येक वेळा मतदान करतोच...... भले कोणताही उमेदवार पसंत नसला तरीही. ................. (वरीलपैकी कोणीही नाही हा पर्याय नसल्याने नाराज ) अजून कच्चाच आहे.

जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा वयाच्या १८ वर्षा पासुन मतदान करत आलोय. माझे सद्य वास्तव्य देशाबाहेर असल्याने इच्छा असूनही मतदान करणे शक्य नाही.

मत क्रमांक ५. (तिकडे मत देऊ शकलो नाही म्हणून काय झालं. इथे दिलं ठोकून मत!!)

परवापासून ड्राय डे लादला गेल्यामुळे निषेध म्हणून मी आणि देशीदारू/बार इंडस्ट्रीतल्या कुणीच मतदान केले नाही... तात्या.

परवापासून ड्राय डे लादला गेल्यामुळे निषेध म्हणून मी आणि देशीदारू/बार इंडस्ट्रीतल्या कुणीच मतदान केले नाही...>>> =)) =)) =)) =)) =)) १-१=० मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...

पाचव्या पर्यायाला मत दिले आहे.

क्र.५ ला मत दिले आहे.

ह्या ना त्या कारणाने मतदारसंघाबाहेर असल्याने गेली कित्येक वर्षे मतदान करु शकलो नाहीये! :( (खुद के साथ बातां : रंगा, निवडणुकीनंतर होणारा घोडेबाजार पाहिला की मतदारसंघ म्हणावे की मोतद्दारसंघ असा प्रश्न पडतो नै?! :O :? ) चतुरंग

ह्या पर्याया बद्दल पेपरात वाचले होते. कोणी वापरला का हा पर्याय ? मतदान केंद्रातील अनुभव जाणून घ्यायला आवडेल (अर्थात कोणी आपले गुप्त मत फोडायला तयार असेल तर... :) तात्य - तुमच्या देशीदारू/बार इंडस्ट्रीतल्या लोकांनी तरी हा पर्याय वापरून तुमचा निषेध जाहीर करयला हरकत नव्हती.... - अफाट जगातील एक अडाणि.

मी फक्त लोकसभेसाठी मतदान करतो. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

काय बे ॠष्या, काय काय शिर्षकं टाकून र्‍हायला बे? :) मी वापरले रे माझे.....मतदानाचे हक्क :P तब्बल पंधरा मिनिटं ४९(ओ) आणी १७(ओ)चं रजिस्टर ह्यावरुन मतदान केंद्रातल्या अधिकार्‍यांशी वादावादी केली ~X( ~X( ~X( ~X( हे अधिकारी म्हणे..म्हणे शिक्षण क्षेत्रातले असतात. ह्यांचं ट्रेनिंगही होतं म्हणे... त्यांची उत्तरं "असलं काही नसतं. आम्हाला माहिती नाही. इथे सोय नाही..." इ.इ.इ. प्रकारची मिळतात... मग 'सकाळ'मधल्या बातमीचं कात्रण दाखवल्यावर आणि "सहकारनगरमध्ये मतदान केंद्रात अश्या प्रकारचा बोर्ड लावलेला आहे. येता का? लगेच दाखवतो" असं म्हणल्यावर त्यांचे आवाज गुळुमुळु झाले. पुढे काय झालं हे मी नाय सांगणार :)

आधी दाखवले...मग दाबले. अशा पद्धतीने आम्ही आमचे वापरले... ;) . . . छे,,, मला आधी वाटलं मास्तुर्‍यानेच काही तरी "नविन" लिहले आहे की काय !!! मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो

मी अजून मतदान करण्यासाठी फार लहान आहे, त्यामुळे मतदान केले नाही. शारीरिक वय तसे कमी नाही पण राजकारण्यांचे, राज्यकर्त्यांचे वक्तव्य, वर्तन आणि असंवेदनशीलता मला समजतच नाही. तसा मी लहानच. कोट्यावधीचे घोटाळे करणारे पुन्हा पुन्हा तिकिट मिळवतात, निवडणूका लढवतात आणि पुन्हा निवडूनही येतात. हे कसे? मला कळतच नाही. मी खरच लहान आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तर अगदी अट्टल गुन्हेगार निवडणूका लढवतात, निवडून येतात, पुन्हा पुन्हा राजकिय आणि सामाजिक गुन्हे करतच राहतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. मी नो पार्किंग मध्ये चुकून वाहन उभे केले तर हमखास पकडला जातो. कारवाई होते. मी दंड भरतो, पोलिसाचे बौद्धिकही ऐकून घेतो. असे का घडते? मला समजत नाही. कसं समजणार? लहान मुलांच्या आवाक्या बाहेरील ह्या घटना आहेत. दहा-दहा वेळा निवडून आलेले नेते संसदेत जबाबदारीने वागत नाहीत. (हजरच राहात नाहीत). ज्या मतदारांनी त्यांना समाजकार्यासाठी निवडून दिले आहे त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष्य करतात आणि निवडणूक आली रे आली की 'मतदान ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे' अशा दांभिक घोषणा देतात. मतदारांनी मतदान करावे म्हणून सिनेमागृहे, शॉपिंग मॉल, उपहारगृहे, कार्यालये बंद ठेवून १००% टक्के मतदानाची अपेक्षा ठेवतात. पण मतदारांची मतदान करण्याची इच्छाच का मेली आहे ह्यावर विचार, चर्चा करित नाहीत. आम्ही कसेही वागू, 'तुम्ही मतदान केलेच पाहिजे. नाहीतर तुम्ही उदासिनेतेचा अक्षम्य गुन्हा करीत आहात.' ही अपराधी भावना मतदारांच्या मनात जागवतात. पण तुम्ही मतदान करा. आम्ही जबाबदारीने वागू. आम्ही तुमच्या समस्या निवारू, आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, कोणी केलेला खपवून घेणार नाही, आमच्या पक्षात गुन्हेगारांना स्थान देणार नाही, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवू.' असे कोणी नेता म्हणत नाही, म्हणाला तरी तसे वागत नाही. पण मतदाराने मतदान केले नाही तर तो आपल्या हक्कांबद्दल जागरूक नाही, त्याला समाजिक जबाबदारीचे भान नाही, त्यामुळे अकार्यक्षम राज्यकर्त्यांवर बोलायचा त्याला हक्क नाही. हा विरोधाभास माझ्या मनाला पटत नाही. तो पटवून घेण्याइतका मोठा मी अजून झालोच नाही. समाजकारणाचा गंधही नसलेली, समाजात कधी न वावरलेली, सामन्यजनतेच्या व्यथेचा दूरूनही गंध नसलेली राजकारण्यांची मुले समाजकारणात आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्यांना डावलून तिकिटे मिळवतात, निवडणूका लढवतात तेंव्हा त्यांच्या स्वार्थाची किव येते पण मी हतबल असतो. कारण माझं अजून मतदानाचं वयच नाहीए. मराठी माणसाला अजून, स्वतःच्या प्रगतीसाठी, राजकारण्यांचा आधार का लागतो. तो स्वबळावर आपली प्रगती का करू शकत नाही? ह्याचं माझ्या बालबुद्धीला आकलन होत नाही. म्हणून मी मतदान करत नाही. माझं वय वाढलं आणि समाजाच्या अनंत समस्यांच्या भुलभुलैयातील वरील काही प्रातिनिधिक समस्यांचं जरी निराकरण झालं तरी मला जाणवेल की आता मी मतदानाला योग्य झालो आहे. तेंव्हा मी जरूर मतदान करेन. माझ्या सारख्या असंख्य उदासीन मतदारांच्या सक्रिय सहभागानेच वरील परिस्थिती बदलेल ह्यावर माझा काडीमात्र विश्वास नाही. त्यासाठी राज्यकर्त्यांसाठीही (फक्त जनतेसाठी नाही) कडक कायदे कानून असावेत, त्यांची नितिमत्ता वाढावी आणि बदलत्या परिस्थितीची फळे समाजकारणार दिसू लागावीत, माझी उदासिनता आपोआप गळून पडेल आणि मी अत्यंत उत्साहाने, प्रसन्न मनाने, जबाबदारीच्या भावनेने मतदानासाठी घराबाहेर पडेन. तो पर्यंत मी लहानच आहे आणि लहानच राहिन. मतदान करण्याइतपन बौद्धीक वय नसल्या कारणाने मतदान केले नाही. क्षमा असावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

खूप इमोशनल ललीत लेखन व चुकीचा संदेश. हे कायदे कोण करणार? १००% उमेदवार वाईट आहेत असे वाटत नाही. परत संसदेत हेच चोर लोक असतील तर परत कायदे बदलतील. मांडलेले मुद्दे विचारकरण्याजोगे व त्यावर उपाय म्हणजे ज्याला हे पटते आहे त्याने मतदान करणे किंवा नकाराधिकार वापरणे. दुर्दैवाने चुकीचा संदेश. पहिल्यांदाच पेठकरकाकांचा नेम चुकला नाहीतर ही इज ऑलवेज स्पॉट ऑन! पैसे खाउन त्यांना निवडून देणार्‍या जनतेला अगदीच निरागस म्हणून सोडून देउ नका. त्यांचाही व मतदान न करणार्‍यांचाही दोष आहे. त्यामुळे प्लीज लवकर मोठे* व्हा! :-( * = यु नो व्हॉट आय मीन, नो डिसरिस्पेक्ट

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका, तुमच्या प्रतिसादाचा उद्देश समजतो आहे. पण तुमच्या कृतीशी सहमत नाही. आपल्यासारखे पैसे, लाच न घेता मतदान करणारे लोकं जर असे "लहान" राहिले तर लाच घेऊन मत देणार्‍यांच्याच मताला किंमत मिळते. मी कदाचित खूप मोठी आणि स्वप्न पहात असेन, पण आपल्यासारखे लोकं एकगठ्ठा (मुद्दामच हा शब्द वापरत आहे) मतदानाला बाहेर पडले तरिही कदाचित राजकारणी लोकं आज नाही तर उद्या जागे होतील. पण आपण मोठे झालोच नाही तर हे कधीच होणार नाही. एकीकडे फार कमी का असेना शक्यता आहे, पण दुसरीकडे अंधारच आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीशी पूर्ण सहमत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण तुमच्या कृतीशी सहमत नाही. माझी कृती माझ्यासाठीही सुखकारक नाही. मलाही भयंकर क्लेष होतात पण नाईलाज आहे. आपल्यासारखे पैसे, लाच न घेता मतदान करणारे लोकं जर असे "लहान" राहिले तर लाच घेऊन मत देणार्‍यांच्याच मताला किंमत मिळते. आज सुजाण नागरिकांची वानवाच आहे. किती टक्के भारतिय नागरीक सुजाण आहेत? समाजात 'अजाण' नागरिकांचेच बहुमत आहे. ते तसेच राहावे हिच प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. विचार करून मतदान केले तर आपल्याला फार कमी मते पडतील अशी प्रत्येकालाच भीती आहे. त्या पेक्षा दारू आणि पैसे वाटून, तसेच करदात्या जनतेच्या खर्चात झोपडपट्ट्यांना सोयी सुविधा पुरववून त्यांना आपल्याकडे आकर्षित करणे सोपे आहे ह्या विचारांनी अशिक्षित आणि अजाण लोकांचे लांगूलचालन करून निवडून येण्याकडेच राजकारण्यांचा कल आहे. शहरात कदाचित सुशिक्षित मतदार जाणवण्याइतपत मतदानावर प्रभाव टाकू शकत असेल (मला शंकाच आहे) पण शहरा बाहेरील बहुसंख्य मतदारांचा विचार करता राज्याच्या सरासरीत तेच वरचढ ठरतात आणि तेच ठरवतात राज्य कोणाचे येणार ते. (हे विधान अतिशयोक्त वाटले तरी त्यात तथ्य नक्कीच आहे.) आपल्यासारखे लोकं एकगठ्ठा (मुद्दामच हा शब्द वापरत आहे) मतदानाला बाहेर पडले तरिही कदाचित राजकारणी लोकं आज नाही तर उद्या जागे होतील. राजकारणी आज नाहीतर उद्या जागे होतील हे एक भाबडे स्वप्न म्हणावे लागेल. गेल्या अनेक वर्षांचा आढावा घेतला तर राजकारणात अशिक्षितांचे, गुंडांचे, अनितीमानांचे साम्राज्य वाढतच जात आहे. गेल्या इतक्या वर्षात 'सुजाण' नागरिक का बरे आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकले नाहीत? कारण मुळातच सुजाण नागरीकांची (मतदान करणारे आणि नाही करणारे) संख्या नगण्य आहे. अजाण बहुसंख्य आहेत. कोणी निवडणूक लढवावी आणि कोणी नाही ह्या विषयी काही बंधने नाहीत, काही निकष नाहीत. पण आपण मोठे झालोच नाही तर हे कधीच होणार नाही. शिक्षणाचा प्रसार, समाज प्रबोधन, राज्यकर्त्यांसाठी कडक कायदे आणि त्याची काटेकोर अमलबजावणी (कायम हातून सत्ता जाण्याची टांगती तलवार ) वगैरे वगैरे घडत नाही तो पर्यंत आपण कितीही मोठे झालो तरी काही उपयोग नाही. एकीकडे फार कमी का असेना शक्यता आहे, पण दुसरीकडे अंधारच आहे. दुसरीकडे ठार अंधार आहे असे मला वाटत नाही. कमी होणारे मतदान वाढावे म्हणून काही उपाय योजना होतीलही. वर सुचविलेल्या उपाययोजना (राजकारण्यांसाठी कडक कायदे अमलात आणणे) अमलात आल्या तर समाजातील उदासिनतेवर काही प्रमाणात औषध सापडेलही. विषय गहन आहे. खुप चर्चेची गरज आहे. उदासीन मतदात्यांना 'गुन्हेगार' समजण्याच्या मनोवृत्तीतही बदल होणे गरजेचे आहे. (हे वाक्य वैयक्तिक पातळीवरील नसून एकूण समाजाला उद्देशून आहे).

आज तुमचे तुम्ही वापरले का? वापरले रे बाबा, वापरले... मेल्याच्या चौकशाच फार!!!! :)

सहजराव आणि अदिती, वैफल्यग्रस्त भावनेतून वरील प्रतिसाद आहे. १०० % सुशिक्षितांनी (अगदी नकाराधिकार वापरून) मतदान केले तरी अशिक्षित मतदारांची संख्या महाराष्ट्रात (आणि भारतात ) एवढी आहे की 'ते मतदान' सुशिक्षितांचे तथा कथित 'योग्य मतदान' पायदळी तुडवून नालायक उमेदवारांना विधानसभेत पाठवेल. आजच्या काळात राज ठाकरेंचे मुद्दे मला पटले तरी राज ठाकरे शुद्ध चारित्र्याचे आहे का? वर्तमानपत्रातील वाचलेल्या बातम्यांवरून तरी तसे मला वाटत नाही. आजचा शुद्ध चारित्र्यवान (वाटणारा) उमेदवार हाती सत्ता आली की भ्रष्ट होतोच आहे. शीला दिक्षित (आजीचा चेहरा), रेणूका चौधरी (३३%चा प्रातिनिधिक चेहरा), शुभा राऊळ (सोज्वळ चेहरा) ह्यांच्या त्या-त्या चेहर्‍याआड जे दडले असल्याच्या बातम्या कानावर येतात त्या ऐकल्यावर कोणी शुद्ध चारित्र्याचा उमेदवार 'हयात' असेल असे वाटत नाही. त्याच प्रमाणे, पक्षाने तिकिट नाकारताच, इतके वर्ष पक्षनिष्ठ असणारा उमेदवार उमेदवारी अर्ज भरावयाची तारीख उलटायच्या आत दूसर्‍या पक्षाशी पाट लावतो किंवा अपक्ष म्हणून उभा राहतो हे त्याची समाजकारणातील ओढ दर्शवत नसून सत्ताप्राप्तीतील 'अर्थकारण' दाखवून देते. अनेकदा खासदारकी, आमदारकी तसेच अनेक सन्मानाची पदे भूषविली असा वयोवृद्ध नेताही, तिकिट नाकारल्यावर, 'पक्षात माझ्यावर अन्याय झाला' असे म्हणून दूसर्‍या पक्षाची उमेदवारी स्विकारतो (त्या पक्षातल्या लायक उमेदवाराला डावलून) तेंव्हा तिथे 'समाजकारण' नसते, 'अर्थकारण' असते हे उघड सत्य दृष्टीस येऊन वैफल्य येते. बर, ज्या 'लायक' उमेदवाराला त्यांनी डावललेले असते तो खरोखर लायक असतो का? 'तुम्हा सुशिक्षितांच्या मतदानावर माझं निवडून येणं अवलंबून नाही. तुमच्या उच्चभ्रू वसाहती शेजारील अफाट पसरलेली झोपडपट्टी हाच खरा माझा मतदार संघ आहे.' हे निर्लज्य विधान त्याच 'लायक' उमेदवाराचे असते. निवडणूक प्रक्रिया बदलणे हेच ह्यावर जालीम औषध आहे. (त्यावर पुन्हा केव्हा तरी) मतदान करा किंवा नकाराधिकार वापरा. अशिक्षित समाज जो पर्यंत बहुमतात आहे तो पर्यंत राज्यकर्त्यांना (की राज्यनाकर्त्यांना) बदलण्याचा अधिकार सुशिक्षितांच्या हातात नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

पुन्हा एकदा चुकीचा विचार... किंबहूना मला वाटते अविचार...
मतदान करा किंवा नकाराधिकार वापरा. अशिक्षित समाज जो पर्यंत बहुमतात आहे तो पर्यंत राज्यकर्त्यांना (की राज्यनाकर्त्यांना) बदलण्याचा अधिकार सुशिक्षितांच्या हातात नाही.
कुठलाही बदल हा एका दिवसात होत नसतो. आत्ता जे गटार झाले आहे तेही 'ओव्हर टाईम' ... तुम्हाला जो उमेदवार योग्या वाटतो त्याला मत देणे हे तुमचे कर्तव्य आहे. जरी तो ह्यावेळी निवडून आला / आली नाही, तरी मिळालेल्या मतांमूळे उमेदवाराचा हुरूप वाढू शकतो. जर आपल्या सारखे लोक मतदान केल्याने काही होत नाही असे म्हणू लागले तर चांगल्या उमेदवारांनी उभे तरी का रहावे ? शिवाय तुम्ही मतदान केले तर जे मतदान करत नाहीत अश्या लोकांना पण दिसेल की ह्या विचाराचे बाकी लोकपण आहेत. जरा विचार करा १८५७ मधे स्वातंत्र्यसैनीकांनी असा विचार केला असता कि सर्वसाधारण जनतेला जास्त काही फरक पडत नाही, आपण जीव देवून काय उपयोग? जोपर्यंत जनतेचे शिक्षण होत नाही तो पर्यंत स्वातंत्र्यसंग्राम करून काही फायदा नाही - असे झाले असते तर ? - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by अडाणि

तुमच्या आदर्श विचारांचा मी आदर करतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

बर, ज्या 'लायक' उमेदवाराला त्यांनी डावललेले असते तो खरोखर लायक असतो का? 'तुम्हा सुशिक्षितांच्या मतदानावर माझं निवडून येणं अवलंबून नाही. तुमच्या उच्चभ्रू वसाहती शेजारील अफाट पसरलेली झोपडपट्टी हाच खरा माझा मतदार संघ आहे.' हे निर्लज्य विधान त्याच 'लायक' उमेदवाराचे असते.
काका, ज्या मतदारसंघात सुशिक्षित लोकं बहुसंख्य आहेत तिथेही अशीच उदासीनता दिसतेच ना! तिकडे अल्पसंख्य असले तरीही झोपडपट्टीत रहाणारेच सुशिक्षितांचा प्रतिनिधी ठरवतात ना!! तुमचं वैफल्य मला समजू शकतं, पण ते दूर व्हावं यासाठी प्रयत्न करत राहीन. कारण प्रयत्न केला नाही तर कदाचित अंधारच असेल ... अदिती

असला तरी मतदान करणार्या लोकाना फुकट मिळते म्हणे.... सौरभ

आम्ही आमचे वापरले का नाही, वापरल्यास कसे वापरले ही माहिती गुप्त ठेवतो.