Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दशानन on Sun, 10/11/2009 - 15:18
  • Log in or register to post comments
  • 10094 views

प्रतिक्रिया

Submitted by अवलिया on Sun, 10/11/2009 - 15:26

Permalink

उषःकाल

उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली... ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sun, 10/11/2009 - 15:32

In reply to उषःकाल by अवलिया

Permalink

बरोबर आहे

बरोबर आहे हो.... पण सामान्य सैनिकाच्याच आयुष्याच्या मशाली का पेटवाव्यात ? बेसिक खर्च करुन सेवा देता येऊ शकते ना त्यांना ? मॅड्ड्मसाठी दोन-चार विमानं आपण उभी करु शकतो तर एक्-दोन असे कधी तरी झाले तर मदतीसाठी नाही ठेऊ शकत ? अपोलो हॉस्पिटल आपले रुग्णवाहक हेलिकॉप्टर ठेऊ शकते सरकार नाही ठेऊ शकत असले चार-पाच कमीत कमी ??? दहा जणांचा नाही निदान एकाचा जरी जीव वाचला तर त्यांची किंमत भरुन निघेल ना राव... काळरात्र काल पण होती व उद्या पण राहील... कारण एकच... साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे... लाच घेतल्या शिवाय काम नाही... तहान लागल्या शिवाय विहिर नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Sun, 10/11/2009 - 15:43

In reply to बरोबर आहे by दशानन

Permalink

एव्हढं सरळ आहे ते?

बेसिक खर्च करुन सेवा देता येऊ शकते ना त्यांना ? येते ना? अन खर्च केलाच जात नाही का? कोणत्याही वर्षाचे बजेट काढुन बघा बरं जरा होम डिपार्टमेंटला किती अ‍ॅलोकेशन असते ते अन प्रत्यक्षात किती रकमा खर्ची पडतात ते. शिवाय केंद्र अन राज्यांचे पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाकरता खास अर्थसहाय्य देऊन कार्यक्रम आहेतच की? मग हा पैसा जातो तरी कुठे?
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sun, 10/11/2009 - 15:47

In reply to एव्हढं सरळ आहे ते? by प्रसन्न केसकर

Permalink

हाच तर

हाच तर कळीचा मुद्दा आहे, पैसा जातो कुठे... अहो जेथे वीरांचे पार्थीव शरिर घरातल्यांना मिळण्यासाठी ४० - ४० तास लागतात तेथे.. छे काय बोलावं... शिव्या पण कमी पडतात ह्या भडव्यांसाठी. हे वाचा आताच वाचले मी
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Sun, 10/11/2009 - 16:21

In reply to हाच तर by दशानन

Permalink

हे माझे

हे माझे गाव आहे. लोकांच्या भावना तिव्र आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sun, 10/11/2009 - 16:41

In reply to हे माझे by सखाराम_गटणे™

Permalink

भावना तीव्र आहेत.

हा हा हा ! एकदम हसु आलं ! भावना तीव्र आहेत.... हसतो आहे ह्याचे वाईट नका वाटून घेऊ.. जेव्हा ताजा घाव असतो ना तेव्हा वेदना पण तीव्र असतात... दिवाळी जवळ आली की जीव घाबरतो.. किती जणांचे संसार रस्तावर येणार... ह्या भितीने नाही.. किती जीव जाणार.. ह्या काळजीमुळे सुध्दा नाही.. कुठे तरी मार्केटमध्ये... विस्फोट होईल.. कळत नकळत मी पण तेथे असेन.. कुठे हात.. कुठे पाय.. शरीराचे असंख्य तुकडे.. गोळा होतील का नाही ? शव नाही राख तरी घरी पोहचेल... ह्या काळजीने घाबरतो जीव .. वेदना तीव्र आहेत... पण त्याचे प्रतिबिंब.. सरकारी...मालमत्तेवर.. कुठे बस... कुठे रेल्वे.. पण जेव्हा मत देता तेव्हा.. कुठे जातात वेदना.. दोन ठेंब दारुचे... चार नोटा गांधीच्या.. बस.. दावादारु.. दोन्ही हातात.. वीराची वेदना.. त्याच्या चार भींती.. मध्ये अर्धांगणीच्या.. पुसलेल्या कुंकु मध्ये.. पोराच्या डोळ्यातील.. सुकलेल्या आश्रुमध्ये.. खरोखर वेदना तीव्र आहेत.. पाठ फिरवून वेदना लपवण्याची.. सवय आहे.. चार तुकड्यासाठी.. राबराब राबताना.. कुठली वेदना.. कुठले शल्य.. दिसली शहिद ज्योत.. सलाम मारला.. डोळ्याचे पाणी.. आटलेलेच.. आता रक्त पण सुकलेलेच..
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Sun, 10/11/2009 - 22:48

In reply to भावना तीव्र आहेत. by दशानन

Permalink

...

:(
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Sun, 10/11/2009 - 15:58

In reply to उषःकाल by अवलिया

Permalink

+१

या सगळ्याच मुळ :<च्यामायला लाच फ्रुफ एक पण सिस्टम नाही !> काल परवाच एका रिपोर्ट मधे वाचलं की, शांत(????) महाराष्ट्रात ५२ पोलीस नक्षलवाद्यांच्या हल्यात शहीद झालेत आणी हा आकडा जम्मू-काश्मीर पेक्षा जास्त आहे.... --प्रभो
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Sun, 10/11/2009 - 15:30

Permalink

सुंदर लिहिलयं....

पण लोच्या आपल्या डी एन ए मधे आहे? ही परिस्थिती पाहुन बहुतेक सगळे सामान्य लोक विद्ध होतील. पण ते करु तरी काय शकतात. मला वाटतं लोचा आहे तो सगळ्याच व्यवस्थेत. काही तळागाळातले नोकर जीवानिशी जातात, लोक हळहळतात पण त्याचं कुणाला घेणं देणं असतं. वरिष्ठ नोकरशहा अन राजकारणी दोघंही सारखीच. खरं आहे पोलिस दल अपुर्‍या साधनक्षमतेनं, मनुष्यबळानं लढतंय पण ते लढणारे सगळे कनिष्ठ अधिकारी कर्मचारी आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांचं काय? ते का नाही आवाज उठवत. आय पी एस, आय ए एस अधिकार्‍यांच्या संघटना काय करताहेत? त्यांचं अन राजकारण्यांचं साटंलोटं असावं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. अन जर हे सगळे एकत्र येत असतील तर लोक तरी काय करणार?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sun, 10/11/2009 - 16:33

In reply to सुंदर लिहिलयं.... by प्रसन्न केसकर

Permalink

+१

रचना छान, प्रतिसादही पुरेसा बोलका!!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Sun, 10/11/2009 - 17:19

In reply to सुंदर लिहिलयं.... by प्रसन्न केसकर

Permalink

मला खरे तर

मला खरे तर ब्रिटिश राज स्टाईल व्यवस्था आपण आजही का वापरतो तेच कळत नाही. राजकारण्याच्या मर्जी नुसार होणार्‍या नेमणूका, बदल्या, प्रमोशन वगैरे गोष्टी पाहाता वारिष्ठ अधिकार्‍यांना साटेलोटे करण्यावाचून दुसरा पर्यायच राहात नाही. जे या सिस्टीमशी तडजोड करायला नकार त्यांचे काय होते ते सर्वांनाच माहित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Sun, 10/11/2009 - 17:46

In reply to मला खरे तर by स्वाती२

Permalink

ब्रिटिश राज स्टाईल....

व्यवस्था खरंतर वाईट नाही. मला स्वतःला वाटते कदाचित भारतातली व्यवस्था अत्यंत प्रगल्भ आहे पण तिचा दुरुपयोग काही सामर्थ्यवान व्यक्ती एकत्र येऊन करतात अन त्यामुळे ती निष्क्रिय होते. कुठलीही व्यवस्था आणली तरी हा धोका रहाणारच आहे. जे या सिस्टीमशी तडजोड करायला नकार त्यांचे काय होते ते सर्वांनाच माहित आहे असे आपण म्हणतो पण खर्‍या अर्थाने तडजोड करायला नकार देणारे सक्षम असे लोक नोकरशाहीत किती आहेत हो? मुळात ही सिस्टीम एव्हढी सडण्याचं कारणच हे आहे की भ्रष्टाचार वरुन खालपर्यंत झिरपला आहे. खालुन वर जाणारा भ्रष्टाचार (आर्थिक किंवा नैतिक) उच्चपदावरचा एखादा माणुस थांबवु शकतो पण वरुन खाली येणारा भ्रष्टाचार थांबवणे खूपच अवघड असते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 10/12/2009 - 10:55

In reply to ब्रिटिश राज स्टाईल.... by प्रसन्न केसकर

Permalink

सहमत

खालुन वर जाणारा भ्रष्टाचार (आर्थिक किंवा नैतिक) उच्चपदावरचा एखादा माणुस थांबवु शकतो पण वरुन खाली येणारा भ्रष्टाचार थांबवणे खूपच अवघड असते.
पुनेरी यांच्याशी सहमत आहे. कार्नेज बाय एन्जल्स (मराठी अनुवाद डी एस विद्यासागर: असत्यमेव जयते) ही स्वेच्छानिवृत्त(?)आयपीएस अधिकारी वाय पी सिंग यांची कादंबरी अंतर्मुख करते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Sun, 10/11/2009 - 16:20

Permalink

भयाकारी

भयाकारी वास्तवाचे नेमके चित्रण ... सुंदर !
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 10/11/2009 - 16:28

Permalink

...

:( ...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 10/11/2009 - 17:22

Permalink

हम्म

राजे, आपली तगमग सहीच आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध लढणार्‍या पोलिसांना मदत मिळाली असती तर पोलिसांचे जीव वाचले असते. पण पाचेक मिनिटात हेलिकॉप्टर पोहचेल, या अपेक्षेने प्राणाची बाजी लावणार्‍या पोलिसांना कितीही सॅल्यूट मारले तरी कमीच.. व्यवस्थेची कातडी अधिक निब्बर आणि आपल्या संवेदना बधीर होत आहेत इतकेच.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Sun, 10/11/2009 - 17:33

Permalink

काय बोलू

काय बोलू राजे? आता दिवसभर डोक्याला भुंगा. सतत तुलना इथे आणि तिथे. सगळा वांझोटा संताप. :(
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Mon, 10/12/2009 - 00:14

In reply to काय बोलू by स्वाती२

Permalink

स्वाती२चा योग्य प्रतीसाद! सहमत!

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Mon, 10/12/2009 - 00:16

In reply to काय बोलू by स्वाती२

Permalink

स्वाती२चा योग्य प्रतीसाद! सहमत!

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 10/12/2009 - 05:53

In reply to स्वाती२चा योग्य प्रतीसाद! सहमत! by संजय अभ्यंकर

Permalink

+२

स्वातीतैंशी सहमत. :-(
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sun, 10/11/2009 - 17:58

Permalink

स्फोटक

राजे
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sun, 10/11/2009 - 18:04

Permalink

अस

अस वाचल्यावर सुन्न होत यार...आणि दु:ख्ख याच तर जादा होते कि हे असे कधिच बदलणार नाहि...असेच चालु रहाणार
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांत उदय मनोहर on Sun, 10/11/2009 - 18:17

Permalink

कविता मस्त

कविता मस्त जमली आहे. प्रतिक्रियेदाखल मला फक्त आणि फक्त मंगेश पाडगांवकरांची 'सलाम' कविता आठवतेय. आपला, (अंतर्मुख) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Sun, 10/11/2009 - 20:04

Permalink

सहमत

मला स्वतःला वाटते कदाचित भारतातली व्यवस्था अत्यंत प्रगल्भ आहे पण तिचा दुरुपयोग काही सामर्थ्यवान व्यक्ती एकत्र येऊन करतात अन त्यामुळे ती निष्क्रिय होते.
सहमत. माझा कायद्याचा/नोकरशाहीचा अभ्यास नाही पण असे म्हणतात की संबंधीत अधिकारी नियमाने वागत असतील तर पंतप्रधानही एक पैसा खावू शकत नाही.कर्नाटक हाय कोर्टात काम करणार्‍या एका वकिलाने मला सांगितले की नविन जज्ज आला की वकिलांचे वेगवेगळे ग्रूप्स त्याला भेटतात आणि हवा तो निकाल द्यायचे रेट्स ठरवतात. भारतातल्या सगळ्या हाय कोर्ट्स मध्ये हे चालते. तेव्हा ||राजे|| म्हणतात तसे DNA मध्येच लोचा आहे. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Sun, 10/11/2009 - 21:47

In reply to सहमत by चिरोटा

Permalink

DNA मध्ये

DNA मध्ये लोचा नसुन लाचारी आणि चाटुगिरी आणि कंपुबाजीची सवय लागली आहे. सगळे 'कागज के शेर' आहेत. so disgusting and cheap Indian metality.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 10/11/2009 - 21:59

Permalink

सुन्न झाले

सुन्न झाले ही बातमी वाचून ... या नेत्यांविरूद्ध किंवा निर्णय घेणार्‍या नोकरशहाविरुद्ध न्यायालयात खटला उभा करता येईल का? अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by अडाणि on Mon, 10/12/2009 - 01:36

Permalink

भा पो.

सुन्न करणारी अशीच बातमी आहे. पाच मिनिटावर असलेले हेलिकॉप्टर.. राजनेत्याच्या दिमाखतीमध्ये.. ह्या साठी काही संदर्भ आहे का? वर्तमानपत्रा तील बातमी वरून तरी मला असे कोठे आढळले नाही. ज्वलंत प्रश्नावरून चुकीची माहिती पसरवू नये असे वाटते. - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास on Mon, 10/12/2009 - 08:03

In reply to भा पो. by अडाणि

Permalink

http://www.loksatta.com/index

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=14688:2009-10-09-14-40-16&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2 वर्तमानपत्रातील बातम्या १००% खर्‍या कधीच नसतात, कुठेतरी काहीतरी लपवले जातेच.. पण ही बातमी तुम्हाला सत्याच्या जवळ नेईल असे वाटते म्हणून हा धागा.. गडचिरोलीतील हेलिकॉप्टर नक्षलवाद्यांच्या विरोधात वापरण्यासाठी तेथे आहे.. ते जर तेथे नव्हते तर खोटे का सांगण्यात आले याचा विचार करण्यासारखे आहे.. पाच मिनिटावर असलेले हेलिकॉप्टर.. राजनेत्याच्या दिमाखतीमध्ये.. हे मात्र यातून सिध्द होत नसले तरीही या नेत्यांना कशाला लागतात हो हेलिकॉप्टर..? --सुहास
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Mon, 10/12/2009 - 15:47

In reply to भा पो. by अडाणि

Permalink

ही माहिती

चुकीची नसावी. अगदी पाच मिनिटे अंतर नाही पण त्या दिवशी विदर्भात प्रचारसभासाठी बरेच नेते गेले होते हेलीकॉप्टरनं. तरीपण आचारसंहितेच्या काळात राजकीय कारणांसाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही याचा विचार केला तर सरकारी हेलीकॉप्टरं कुठं होती हा प्रश्न रहातोच.
  • Log in or register to post comments

Submitted by अडाणि on Mon, 10/12/2009 - 21:56

In reply to ही माहिती by प्रसन्न केसकर

Permalink

हेलीकॉप्टरं

प्रचारासाठी जे हेलीकॉप्टरं वापरली जातायेत ती खाजगी असतात, सरकारी नव्हे.. बातम्या नीट वाचल्या तर दिसून येइल - घटनेच्या २ दिवस आधी अत्राम यांचे हेलीकॉप्टरं ५ मिनीटाच्या जागेवर उतरवले होते - असे सांगीतले आहे. त्या दिवशी ५ मिनीटाच्या अंतरावर होते असे नाही. ह्या घटनेत (सकॄतदर्शनी) दोष पोलीस अधीकार्‍यांचा दिसतो आहे. जिथे दोष आहे तिथे बोल लावावा, उगाच राजकारण्यांच्या मागे बोंबलण्यात काय अर्थ आहे? - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली हसमनीस on Mon, 10/12/2009 - 06:47

Permalink

खरेच------------

आपले म्हणणे अगदी १०० टक्के सत्य आहे.आपली शासन व्यवस्थाच भयंकर भ्रष्ट आहे.गेल्या नोव्हेंबरमधील स्फोटाचा अजून निकाल लागत नाही.त्या कसाबचे अजून किती लाड करायचे ?आमचे सामान्य नागरिक निष्कारण बळी पडले त्याचे कोणाला काहीच वाटत नाही?शहीद पोलिसांची कोणालाच आठवण येत नाही? आपण सारे षंढ झालो आहोत हेच खरे !
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास on Mon, 10/12/2009 - 07:52

Permalink

नुकतीच ही

नुकतीच ही एक बातमी ibnlive.com वर वाचली.. http://ibnlive.in.com/news/naxals-great-threat-but-they-arent-terrorists-pm/103048-3.html?from=tn मनमोहन सिंग म्हणतात की "नक्षलवादी (देशाला) मोठा धोका असले तरी दहशतवादी नाहीत. आम्ही त्यांच्या विरूध्द सैन्य वापरण्याच्या बाजूने नाही. नक्षलवाद्यांना बाहेरील शक्तींचे पाठबळ आहे असे आम्हाला वाटत नाही." तर राहुल गांधींनी तर सगळी जबाबदारी राज्य सरकारांवर ढकललीय.. http://www.thaindian.com/newsportal/india-news/governments-not-reaching-out-to-people-causing-spread-of-naxalism-rahul-gandhi_100257168.html याचा अर्थ सरकारला नक्षलवाद्यांविरूध्द काही करायची इच्छा नाही असे नाही, पण ममताबाईनी पाठींबा काढून घेतला तर? सत्ता गेली तर काय? चला तर मग, फुटबॉल खेळू.. नॉनइश्यू ला इश्यू करू, म्हणजे मूळ इश्यू विसरला जाईल.. मग पुन्हा कधीतरी हा इश्यू येईलच त्यावेळी जो असेल तो बघेल.. सगळेच दरवडेखोर आहेत स्साले.. राजे, खरंच dna मध्ये लोचा आहे.. --सुहास
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 10/12/2009 - 12:21

Permalink

"Being Indian"

मी इतरत्र केलेल्या विपुल लिखाणात मी असे नेहमीच लिहितो कीं भारतीय लोकांत आणि (त्यापेक्षाही जास्त) मराठी लोकात genetic defects आहेत, प्रचंड प्रमाणात आहेत. या विषयावर मी एक सुंदर पुस्तक वाचले आहे आणि माझ्या मते प्रत्येक भारतीयाने ते एकदा पूर्ण वाचले पाहिजे व त्यानंतर कांहीं लोक जसे "गुरुचरित्रा"तील एकादा अध्याय वाचतात तसे वाचले पाहिजे. त्या पुस्तकाचे लेखक आहेत श्री. पवन कुमार वर्मा (आपले एके काळचे सायप्रस येथील राजदूत) व पुस्तकाचे नाव आहे "Being Indian". सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 10/12/2009 - 14:50

In reply to "Being Indian" by सुधीर काळे

Permalink

जेनेटीक डिफेक्ट

राजेला अपेक्षित असलेला DNA मधला लोचा वेगळा असावा. पण जेनेटीक डिफेक्टसाठी गुगलकडे चौकशी केली तर हे मिळालं. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 10/13/2009 - 08:17

In reply to जेनेटीक डिफेक्ट by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अशा वडिलोपार्जित गुणदोषांना तांत्रिक भाषेत काय म्हणतात?

धन्यवाद, अदिती! मला या विषयाचे कांहींच ज्ञान नाहीं (पण कुतुहल मात्र खूप आहे व वाचायला गेल्यास सगळं डोक्यावरून जातं!) त्यामुळे चूक झाली असे वाटते. पण लांच खाणे, फितुरी करणे, धंद्यात न पडता नोकरी (तीही सनदी) करणे, आपल्या हितांकडे दुर्लक्ष करणे, आपल्या लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून व त्यांच्या हिताविरुद्ध करणी करून परक्याची धन करणे असले जे "गुण" आपल्यात पिढिजात आलेले आहेत त्यांना मी चुकून "genetic defects' म्हणत होतो असे दिसते. ते चूक असेल तर अशा वडिलोपार्जित दोषांना तांत्रिक भाषेत काय म्हणतात? सुधीर ------------------------ आज एक नवे व्यंगचित्र खरडफळ्यावर चढवले आहे. ज्याना आवड असेल त्यांनी पहावे! देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 10/13/2009 - 09:04

In reply to अशा वडिलोपार्जित गुणदोषांना तांत्रिक भाषेत काय म्हणतात? by सुधीर काळे

Permalink

मला नक्की

मला नक्की माहित नाही, पण nature (गुणसूत्र) आणि nurture यांमधे फरक जरूर असावा. बाकी उपरोल्लेखित "गुण" समान परिस्थितीत वाढलेल्या सगळ्याच थोड्याफार फरकाने मलातरी दिसले आहेत. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Mon, 10/12/2009 - 13:18

Permalink

छान रचना

प्रतिसादही पुरेसा बोलका!!! खरचं नेत्यामधील साटंलोटं अन् स्वार्थ यासारख्या अनेक गोष्टी सगळी गणितच बिघडवुन टाकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Mon, 10/12/2009 - 15:08

Permalink

राजे

राजे :( निशब्द.... माझा एक मित्र म्हणायचा आपली पिढी जर इन्ग्रज सरकारच्या काळात असती तर आपण अजुन गुलामीतच राहिलो असतो. आपल्याला सवय लागते सगळ्या गोष्टींची. :(
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 10/12/2009 - 19:24

Permalink

हम्म...

अवघड आहे...अरे अवघड म्हणालो का..खर तर अवजड म्हणायचे होते ..असो... राजे..देह गुलाम सवयींचा ...पण बातम्या बाबत..रिड बिटविन द लाईन्स... मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्निल.. on Tue, 10/13/2009 - 01:17

Permalink

शब्दच नाहीत.. :(

:( स्वप्निल
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 10/13/2009 - 08:04

Permalink

सुहास व

सुहास व सूहास असे दोन वेगळे-वेगळे सभासद आहेत काय? ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 10/14/2009 - 19:23

Permalink

सर्व

सर्व प्रतिसाद देणा-या मित्रांचे / मैत्रीणींचे / शत्रुचें / दुरुन मित्र असलेल्यांचे / दुरुन शत्रु असलेल्यांचे / ज्यांनी वाचले पण प्रतिसाद नाही दिला त्यांचे / ज्यांनी वाचले नाही पण प्रतिसाद दिला त्यांचे / ज्यांनी वाचलेच नाही त्यांचे ही अनेकानेक आभार. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com