नोबेल पुरस्कार (विशेष करून शांतता) देताना राजकारण होते हे नक्कीच. ते केवळ अमेरिकन फिक्सिंग नसून नॉर्वेजीयन फिक्सिंग आहे, किंबहूना हे महासत्तांचे एकत्रीत फिक्सिंग आहे. बर्याचदा ज्या देशात सौंदर्यसाधने खपवायची असतात त्या देशातील युवतींना "मिस युनिव्हर्स" केले जाते तसेच ज्या मुद्यांना जोर देयचा असतो त्यातील व्यक्तीस नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो. म्हणूनच दुर्दैवाने गांधीजींना मिळाला नाही. नेहरूंनी तर इतके चीन विरुद्ध शांतताप्रिय राहून हरून दाखवले तरी देखील मिळाला नाही कारण त्या काळातील जागतीक राजकारणात त्याचे महत्व नव्हते. या उलट व्हिएटनामवर युद्ध लादून पर्यायाने स्वतःच्या देशातील सैनिकांच्या आयुष्याची वाताहात करण्यात आणि देशाला नामुष्कीने हार पत्करायला लावण्यात सामील असलेल्या (भारत आणि इंदिरा विरोधी) हेन्री किसिंजरलापण हा पुरस्कार देण्यात आला होता. का? अर्थात तेंव्हा कम्युनिस्ट रशियाला जिथे हवा तिथे धक्का मारण्याचे तंत्र अवलंबले जात होते आणि भांडवलशाहीचा प्रभाव विविध पद्धतीने वाढवण्याचे प्रयत्न होत होते...
असेच दुसरे जागतीक राजकारण असते ते ऑलिंपिक्सचे स्थळ ठरवताना. आपले शहर शिकागोला या संदर्भात मान मिळावा म्हणून स्वतः ओबामा आणि मिशेल ओबामा समितीसमोर (अँमस्टरडॅमला) बोलायला गेले तरी शिकागो पहील्याच फेरीत बाद झाले!
ओबामांच्या बाबतीत नोबेल मिळताना मात्र वेगळे आहे असे वाटते. जे थोडेफार इस्त्रायली पंतप्रधान इझॅक रॅबीन, तत्कालीन परराष्ट्रपंत्री शिमॉन पेरीस आणि पॅलेस्टाईन नेते यासर अराफत यांना जसे गडबडीत नोबेल दिले कारण त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल असे वाटले तसेच काहीसे या संदर्भात आहे. आणि तसे खरेच काही ओबामांच्या हातून चांगले झाले तर त्यांना (अमेरिकन व्यक्तीस वगैरे) नोबेल मिळाले म्हणून वाईट वाटायला नको. पण आधीच स्वतःच्या देशातील सामान्य आणि असमान्य जनतेच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली असलेल्या ओबामांना आता युरोपाच्या "न्युक्लीअर फ्री वर्ल्ड" या स्वप्नाच्या (वास्तवीक त्यांच्या वास्तव भितीच्या) ओझ्याखाली पण वागावे लागणार आहे. कारण त्यांच्या "न्युक्लीअर फ्री वर्ल्ड" च्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख निवडसमितीने केला आहे.
यातून काय दिसते? निव्वळ आंतर्राष्ट्रीय राजकारण? ते आहेच, पण तितकेच हा भाग पटत नाही. त्यातून दिसत आहे ते काही तरी आता चांगले निष्पन्न होउंदेत हे "डेस्परेशन" आणि तसे "हातघाईला" येण्यामधली कुठल्याच अर्थाने सामान्य नसलेल्या या वरीष्ठ लोकांमधील मानसीक अगतिकता. तुम्हा-आम्हाला अथवा आपल्याहून सामान्य असलेल्या जनतेला विविध पद्धतीच्या अगतिकतेने, डेस्परेशनने पछाडलेले असते. कायम नसेल पण कधी ना कधी नक्कीच... पण जे अतिउच्चभ्रू आहेत त्यांना अशी काय काळजी आहे? ते खरेच "चिंता करीतो विश्वाची" असे म्हणत आहेत का निव्वळ काहीतरी कोता स्वार्थ आहे?
मला वाटते, स्वार्थ कुणाचाही असतोच पण ज्या पद्धतीने जगात घटना घडत आहेत त्या पद्धतीने अस्वस्थता वाढत आहे. अशा बर्याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला पूर्ण माहीत नसतात पण केवळ आडाखे बांधता येतात. पर्यावरण बदल हा असाच एक भाग आहे. तसेच अफगाणिस्तान आणि त्याहूनही जास्त गंभीर हे अणूशक्ती हातात असलेले पाकीस्तान, अणूशक्तीसंपन्न होण्याची इर्षा बाळगणारे इराण, उत्तर कोरीया, विविध पद्धतीने जगात विस्तारत असलेला चीन आणि अर्थातच सर्वत्र भय असलेल्या हिंस्त्र दहशतवादामुळे जग एका वेगळ्याच कड्याच्या टोकावर उभे आहे. यात केवळ गरीब, सामान्यांचाच नाही तर सर्वांचा कडेलोट होऊ शकेल अशी अवस्था आली आहे.
अशा वेळेस, आम्हाला जगाचे पडलेले नाही आम्ही केवळ "अमेरिकन इंटरेस्ट" बघतो असे न म्हणणारी वृत्ती असलेला राष्ट्राध्यक्ष येतो आणि अमेरिकेस, जगाच्या "चांगल्या" अर्थे "जबाबदारी" जाणून जवळ करतो, तेंव्हा आशा वाढतात. पर्यावरण बदलावरून कायदा करण्यापासून ते अगदी इराणशी प्रत्यक्ष बोलणी करण्यापर्यंत ओबामांनी मोकळेपणा दाखवला आहे. कुणाला आवडो अथवा न आवडो, पटो अथवा न पटो,(मला स्वतःला पण पटत नाही) पण कम्युनिस्ट सोव्हीएट रशियाच्या अंतानंतर जगाचे एकमेव नेतृत्व अशी अमेरिकेची प्रतिमा झाली आहे. पर्यायाने सर्व अधिकार एकवटलेला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा त्याच्या अंतर्गत तसेच परराष्ट्र धोरणांनी "राजा कालस्य कारणम" ठरत आला आहे.
अशा या "जागतीक नेतृत्वास" जेंव्हा अचानक सर्वोच्च पारीतोषिक त्याची राजकीय घडी बसत असतानाच मिळते तेंव्हा ते बक्षिस नसून एकीकडे मागणी असते, तर दुसरीकडे त्याची प्रतिमा अजून उजळवून त्याला मोठेपण देत जगाला मागे ओढण्याचा एक प्रयत्न असतो. त्यात कोण किती यशस्वी होत आहे, ते काळच ठरवेल. पण जर त्यातून काही चांगले होणारच असेल तर हेवा वाटणे समजू शकेल पण (जरी उपयोग नसला तरी) त्याला विरोध असायचे कारण असू नये असे वाटते. जर ओबामांना यश येताना दिसले तर काय, उद्या पोप त्यांना जिवंतपणी पण संत म्हणून जाहीर करेल (कारण कशातही पूर्ण यश आले तर तो एका अर्थी चमत्कारच असेल!). पण अजून वर्षभरात काहीच आशेचे किरण दिसले नाहीत तर आधीच अपेक्षांच्या ओझ्याने वाकलेल्या ओबामांना जनतेचा प्रत्यक्ष रोष हा सिनेट/काँग्रेसच्या २०१० च्या निवडणूकातून भोगावा लागेल. एकूण काय जर कालपर्यंत चार तास शांत झोप लागत असेल तर आजपासून ती तासभरच मिळणार आहे...म्हणूनच या संदर्भात, ओबामांची अवस्था बघताना तुकोबाच्या ओळी आठवतातः
ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण...
वाचने
9248
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओबामाला
जस्टिस ऑफ पीस?
नम्र नकार?
पुरस्कारा
In reply to नम्र नकार? by हुप्प्या
एक चुक तो
In reply to पुरस्कारा by देवदत्त
ओ राजे,
In reply to एक चुक तो by दशानन
आताच हि
In reply to ओ राजे, by श्रावण मोडक
अवघड जागी मुका
+१
In reply to अवघड जागी मुका by धनंजय
मुद्देसुद
अॅनालिसी
In reply to मुद्देसुद by विष्णुसूत
धन्यवाद गटणे साहेब
फारच सुंदर आढावा...
लेख बराचसा
घाईचे काम की?
आवडला लेख.
सो मच फोर
नो
चांगला
चांगला
लेख आवडला...!
नोबेल, ओबामा आणि गांधी...
>>पुरस्कारा
In reply to नोबेल, ओबामा आणि गांधी... by श्रावण मोडक
बरेच
ती गोष्ट
In reply to बरेच by चिरोटा
अमेरिकन्स
In reply to ती गोष्ट by विकास
युध्द हे अमेरीकन अर्थ व्यवस्थे साठि गरजेचे
In reply to अमेरिकन्स by प्रदीप
आपल्याला
In reply to युध्द हे अमेरीकन अर्थ व्यवस्थे साठि गरजेचे by विष्णुसूत
महात्मा
In reply to आपल्याला by चिरोटा
सहमत
In reply to महात्मा by विष्णुसूत
एक वाक्य
In reply to ती गोष्ट by विकास
चांगला लेख
तर्कही पटण्यासारखा
असे
गांधीजी आणि नोबेल