सुरणाचे (दही) वडे
नमस्कार मंडळी आज आपल्या शाकाहारी मित्रांसाठी एकदम सोप्पी आणि झटपट पाककृती घेउन आलोय.
बरेच जण सुरण म्हटल की नाक मुरडतात. ही डिश खास त्यांच्या साठी आहे.
सर्व प्रथम लागणार साहित्य :
सुरण १/४ किलो लहान तुकडेकरुन .
असल्यास पाती कांदा नाही तर १ लहान कांदा.
२ चमचे मक्याच पीठ
१ चमचा जीरेपुड.
१ चमचा लाल तीखट
२ मिरच्या बारीक चिरुन.
३-४ चमचे तांदळाच पीठ.
१ चमचा आल पेस्ट.
चिमुट भर हळद.
मीठ स्वादानुसार.
१) आधी सुरण कुकरला लावुन उकडुन घ्या. उकडल्या नंतर चांगल स्मॆश करुन घ्या.
२) त्यात वरील सर्व पदार्थ टाकुन चांगल एकजीव करा. त्याचे लहान लहान गोळे करा.
३) तेलात खरपुस तळुन घ्या. चटनी सॉस आणि गरमा गरम चहा सोबत सर्व्ह करा.
यात काल एक अॅडिशन केली.
दह्यात टाकुन पाहिले. मस्त लागले.
ताज दही घेउन त्यात साखरे ऐवजी थोड मीठ टाकल.

वाचन
14027
प्रतिक्रिया
0