Skip to main content

नथुराम गोडसे आणि हिटलर

लेखक निमीत्त मात्र यांनी शुक्रवार, 18/09/2009 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
विकासने सुरू केलेल्या तुम्हाला कोणाशी गप्पा मारायला आवडतील ह्या धाग्यावर आमची एक वेगळीच चर्चा सुरू झाल्याने आणि मूळ विषयाला अधिक अवांतर नको म्हणून इथे नविन चर्चा सुरू करत आहे. ह्या धाग्यात काही लोकांनी त्यांना नथुराम गोडसे आणि हिटलर ह्यांनाही भेटायला आवडेल असे नोंदवले. तर मुद्दा असा आहे की, महात्मा गांधींच्या खुनाचा आरोप सिद्ध होऊन फासावर लटकलेला नथुराम गोडसे आणि दुसर्‍या महायुद्धात ज्यू लोकांचा कत्तली केल्याने कुप्रसिद्ध असणार हिटलर हे दोघे मिपाकरांना विकृत विचारांचे वाटतात का? ह्या लोकांना भेटावेसे वाटण्याचे नेमके कारण काय? ह्यासंबंधी मिपाकरांची मते काय आहेत ते जाणून घ्यायला आवडेल.

वाचने 56678
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by धमाल मुलगा

मला वाटते की गोडसे, हिटलर, स्टॅलीन अशा प्रकारची नावे ही काही वैयक्तिक हिरो म्हणून कोणी डोक्यात ठेवून लिहीली नसावीत. अशा प्रकारच्या मनोवृत्ती (विकृती?) कशा विचार करतात हा डोक्यात आलेला विचार असावा... उ.दा. तेंडूलकरांनी फाशी जाणार्‍या गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. सुधीर गाडगिळांकडून जक्कलच्या मुलाखतीसाठी ते आणि मोहन गोखले ("माफीचा साक्षिदार" काढण्याआधी) गेले होते त्यावेळेला गजाआडचा जक्कल कसा रानटीपणे वागला हे सांगितले होते. त्याच पठडीतील हा विचार आहे.
मला जर विकृतीलाच हिरो समजणार्‍यांच्या समुदाययाचा अनुभव आला तर मी स्वतःच्याच चपला घालून, रामदासांनी म्हणल्याप्रमाणे, "नसे राम* ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे" असे आचरणे योग्य समजेन.
- विकासच्या प्रतिसादांमधून साभार!

In reply to by निमीत्त मात्र

वाहवा! म्हणजे दुसर्‍याना तुम्ही चपला दाखवणार पण तुम्हाला कोणी मजेतही चपला दाखवल्या तर तुम्हाला नाकाला मिरच्या झोंबणार. जगातले बहुतेक हुकुमशहा असेच असतात म्हणे. बाकी चालूद्या. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

In reply to by निमीत्त मात्र

ते त्यांचं वैयक्तिक मत... मी मांडलं ते माझं वैयक्तिक मत!! आपण मांडलंत ते त्यांचं उधारीवर आणलेलं मत!!! हार्डली मॅटर्स टू मी :) अर्थात विकृत ह्या शब्दाबद्दलही एखाद-अर्धी ओळ आधीच्या प्रतिसादात खरडली आहेच की..इतरांनीही त्यावर भाष्य केलेलं आहेच. त्यामुळे विकासराव चपला वगैरे घालणार नाहीत ह्याची मलातरी खात्री वाटते. :) बाकी, विकासरावांच्या प्रतिक्रियेतलं कोटेशन इतक्या पट्टकन येईलच ही माझी शंका बरोबरच होती तर! ;) --- काय मंडळी, आता पटलं ना मी काय बोललो होतो ते ;)

In reply to by धमाल मुलगा

एकदम विचारपुर्वक लिहलेला प्रतिसाद, शब्द शब्द पटण्यासारखाच ! +१ ** सगळे गेले (आयडी) वरती... हे धम्या राहिले खालती.... हे राम :|

In reply to by निमीत्त मात्र

मला जर विकृतीलाच हिरो समजणार्‍यांच्या समुदाययाचा अनुभव आला तर मी स्वतःच्याच चपला घालून, रामदासांनी म्हणल्याप्रमाणे, "नसे राम* ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे" असे आचरणे योग्य समजेन. हे वाक्य आणि प्रतिसाद निमित्तमात्र साठी होते. त्यांना मूळ आक्षेप असल्याने जेथे आक्षेपार्ह वाटते तिथे कशाला राहता असा हा प्रश्न होता आणि आहे.

In reply to by विकास

मी स्वतःच्याच चपला घालून, रामदासांनी म्हणल्याप्रमाणे, "नसे राम* ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे" असे आचरणे योग्य समजेन.
ह्यात निमीत्तमात्र कुठे आला? मला नक्की काय आक्षेपार्ह वाटत आहे? आणि मी कुठून निघून जावे असे तुला वाटत आहे? माझ्या जाण्याने तुझे मुद्दे खरे ठरणार आहेत का? मी आणि माझ्या विचाराचे लोक इथे फार कमी आहेत असे दिसते आहे. तरी मला का घालवतोस बाबा? मुद्दे संपले का?

In reply to by निमीत्त मात्र

मी आणि माझ्या विचाराचे लोक इथे फार कमी आहेत असे दिसते आहे. हे वाक्य थोडे बदलून असे लिहावेत (म्हणजे निमित्त मात्र असे म्हणतात असा याचा अर्था आहे!): "मी आणि माझ्यासारखे इथले लोक कमी विचाराचे आहेत असे दिसते." तुम्ही आणि विचार कसला म्हणता? जाता येता विनायक पाचलग च्या लेखा पासून ते स्वातीच्या चेरी केक पर्यंत नुसत्या पिंका टाकत इथून तिथे हिंडता आहात. स्वतः एक चांगले लिहीणार नाहीत, कुठल्याही वादग्रस्त नसलेल्या विषयात देखील कुणाला प्रोत्साहानात्मक चांगले म्हणणे सोडून टिका करणे, कुणाच्या शाब्दीक चुका काढत हिंडणे ही पण एक विकृती आहे. आणि ती तुमच्यात भरपूर दिसते आहे.

In reply to by विकास

हे फारच वैयक्तिक होत नाही आहे का विकास? मला इथे व्यक्तिगत पातळीवर उतरुन चिखलफेक करायची नाही..

In reply to by निमीत्त मात्र

हे फारच वैयक्तिक होत नाही आहे का विकास? मला इथे व्यक्तिगत पातळीवर उतरुन चिखलफेक करायची नाही.. मग (साभार म्हणत पण) माझ्या लेखातील उतारे जसेच्या तसे देत प्रतिसाद देणे अथवा त्यावरूनच चर्चा टाकणे बंद केलेत तर बरे होईल. सुरवात मी करत नाही. पण म्हणून उगाच काहीतरी लिहीणे चालू केले तर ऐकले जाईल असे समजू नका. जे होईल ती माझ्या दृष्टीने रास्त टिकाच असेल तुम्हाला चिखलफेक वाटली तरी.

In reply to by निमीत्त मात्र

व्वा!! हे वैयक्तिक आहे का? मग हे काय होते?
बाकी सगळ्यांचे प्रतिसाद त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच आहेत बाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे असो..जोक्स अपार्ट, विकासने आण्णा चिंबोरींच्या प्रतिसादाचाही प्रतिवाद करावा अशी विनंती. तो पर्यंत त्याचा वरील प्रतिसाद नीट वाचून घेतो.
विकासचे प्रतिसाद वाचण्याचे काम मी विकी ला आउटसोर्स केलेले आहे. हाहाहाहा मीही तेच करावे म्हणत आहे. वाचायला वेळ पुरत नाही तिथे इतके टंकायला कसा काय वेळ मिळतो ह्याचाच विचार करत होतो. असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. हे मात्र अगदी लाखमोलाचे बोललात.
मूळ लेख चांगला होता, व नीलकांत इ. अनेकांनी नुसती संघाच्या बाजूने उडती उत्तरे दिलेली होती तसेच इतर काहींनी नुसतीच संघाच्या नावाने धूळ उडवली होती. पण विकास ह्यांचे सविस्तर उत्तर आल्यावर त्याला नुसते टिचकीने (व टिंगलीने), कसलाही प्रतिवाद न करता तुम्ही ऊडवून लावलेत, त्याला फार दिवस झालेले नाहीत.

६० वर्षांनंतर मागे वळून पाहताना मला वाटते की नथुराम गोडशांनी गांधींना मारले ते चूक केले. त्याने गांधी संपले पण गांधीवाद सगळ्यांच्या बोकांडी बसला. एक दांभिक तत्त्वज्ञान नको इतके उदात्त होऊन बसले. तमाम ब्राह्मण जात बदनाम होऊन बसली. राजकारणात अन्य अन्य सामाजिक क्षेत्रात एक नवी अस्पृश्य जात म्हणून ब्राह्मणांना वागवू लागले. हिटलरचे उदाहरण घ्यायचे तर त्याने जसे ज्यू लोकांना घाऊकपणे ठार केले तसे आजकालचे ब्राह्मणद्वेष्टे नेते संधी मिळाली तर तमाम ब्राह्मणांचे शिरकाण करायला मागेपुढे पहाणार नाहीत. प्रत्येक गल्लीबोळात, रस्त्याचौकांवर, नोटांवर नुसते गांधीच. अर्थात त्यांचे स्वच्छता, काटकसर, जातिभेदनिर्मूलन, साधेपण हे विचार कुणीही पाळताना दिसत नाही. निव्वळ फायद्याकरता गांधी वापरून घेणे एवढेच. मुस्लिमांचे लांगूलचालन हे भारतीय राजकारणातील एक आवश्यक घटक बनलेला आहे. उरलेल्या भारताचे नवे लचके तुटत आहेत. पाकिस्तानचा भूभाग पुन्हा मिळवून अखंड भारत बनवणे हे अशक्यप्राय आहे. जे नालायक लोक देशाचे प्रतिनिधी म्हणून मिरवताहेत त्यांच्याकडे बघता देशहितासाठी गांधीची हत्या करून फासावर चढणे हे अत्यंत व्यर्थ गेले असे मला वाटते. गांधी जिवंत राहून अशीच भोंगळ कृत्ये करत राहिले असते तर ते आणि त्यांचे तत्त्वज्ञान वेळच्या वेळी नष्ट झाले असते. त्याला संजीवनी मिळाली नसती. पण हे सगळे आता कळते आहे हेही खरे.

गांधीजीनी ही चर्चा वाचली असती तर स्वतः आत्महत्या केली असती. :) बाकी कलंत्री काका कुठे दिसत नाहीत.

In reply to by सखाराम_गटणे™

गांधीजीनी ही चर्चा वाचली असती तर स्वतः आत्महत्या केली असती.
संपूर्ण चर्चेत मला फक्त हाच प्रतिसाद (ह.) घेण्यासारखा वाटला आणि पटला. ;)

अजून शंभरी कशी भरली नाही? :? (आनंदाने अवांतर) एकलव्य

हर्षद आनंदी, आपले मत आवडले. फक्त "ब्राम्हण" शब्द खटकला, आपल्याला "ब्राह्मण" म्हणायचे होते का? असो, मलाही स्वा. सावरकर, हिटलर, भगतसिंग आदि खूप मंडळीना भेटायला आवडेल!

गांधी ला यमसदनाला धाडणा-या नथुराम गोडसे यांना विनम्र अभिवादन. मला एका प्रश्नाचं उत्तर कोणी द्याल का ? मोहनदास गांधी हा वकिल असलेला माणूस(?) दक्षिण अफ्रिकेत होता. अजून शिकायला असेल किंवा वकिली साठी असेल ते अलाहिदा . त्यावेळी भारतात जी परिस्थीती होती त्याच्याशी त्या माणसाला त्याचा अपमान होईपर्यंत तरी काहीही देणेघेणे होते असे वाटंत नाही . त्यामुळे जर त्याचा अपमान झाला नसता तर तो स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाला असता का ? महात्मा वगैरे नंतर बोलु. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

In reply to by श्रीयुत संतोष जोशी

आपल्या अकलेचा आणि अज्ञानाचा जाहीर बोभाटा करण्याची काहीही गरज नाहीये... इ. ४थी ते ७वी पर्यंतची ईतीहासाची पुस्तके वाचून काढा, तुम्हाला बरीच काही माहिती मिळेल. - अफाट जगातील एक अडाणि.