पोर्क चीली

गणपा's picture
गणपा in पाककृती
25 Sep 2009 - 4:19 pm

नमस्कार मंडळी.
कुठल्याही बल्ल्वाला आपली कलाकृती साकारायला काय लागत? कच्चा माल... किचन? उहूं.. मला विचाराल तर त्याला लागतात चार प्रोत्साहनाचे शब्द आणि हक्काचे गिनीपीग.(गिनीपीग असल्याने कलाकृती कधीच बिघडत नाही, ती असते नवीन डिश ;) ) माझ्यातला खरा बल्लव जागा झाला तो १० वर्षां पुर्वी जेव्हा मी पहील्यांदा घर सोडल तेव्हा. (नाही नाही घरातुन पळुन नाही गेलो. पोटापाण्याच्या उद्योगा साठी घारा बाहेर पडायची वेळ आली, आणि नोकरी परदेशात आसल्या करणाने घर आणि देश दोन्ही एकादमच सोडाव लगल.) आणि माज़्या परदेश वास्तव्यात माला एक सोडुन चांगले तीन तीन गिनीपीग मिळाले.

दुबाईला माझ्या ऑफिसमधल्या तीन मित्रांनी माझ्या रहाण्याच प्रश्न सोडवला. त्यांनी मला त्यांच्याच फॅट मध्ये जागा दिली. चहा आणि उकडलेली अंडी इत्पतच त्यांच कुकिंगच ज्ञान मर्यादित होत. त्यामुळे माझी बल्ल्वगीरी चालु झाली. हे तिघे पाववाले होते, त्यामूळे मी जे काही नवनवीन प्रकार कारायचो ते वेग वेगळ्या प्रादेशीक डिश या नावाखाली विनासायास खपवु लागलो. एखाड्या दिवशी जर काही अळणी किंवा अर्ध कच्च राहील तर खुशाल काँटीनेंटलचा वर्ख लावायचो.
विकांताला घराशेजारच्या एका गोवन हॉटेलात जाउन चील्ड बीयर, मधुर गोवन लाइव्ह संगीत, आणि जोडीला पोर्क-चीली हे ठरलेलच, आम्ही आत शिरलो की वेटर पण काही न सांगता ही आमची ऑर्डर घेउन यायचा. आहाहा.... काय दिवस होते ते!!! तर एकादा सगळ्य़ांनी ठरवल की घरी पोर्क चीली बनवुया.. तस मी पोर्क कधी बापजन्मात बनवल न्हवत. पण बरेच वेळा खाल्ल असल्याने चवीचा अंदाज होता. दर प्रयोगा अंती चव सुधरत गेली.
कालच त्यातल्या एकाचा फोन आला होता. म्हणत होता बायकोने पोर्क बनवलय, पण साला आपली जुनी चव नाही त्याला. (बायको बहुधा दुसया खोलीत आसावी :? ). दोघ गप्पा मारत जुन्या आठवणींत रमलो.
फोन ठेवला. स्वस्थ बसवेना. चपला चढवल्या, रथ काढला तो सरळ सुपर मार्केट मध्ये. पोर्क आणलय. आजची ही पाककॄती जुन्या मित्रांना समर्पीत.

१) कच्चा माल.
१/४ किलो. पोर्क. लहान १/२ इंचाच्या आकारचे तुकडे करुन घ्यावे.
१ कांदा मोठ्ठा चौकोनी कापालेला.
१ भोपळी (सिमला) मिरची.
२ चमचे आल लसूण पेस्ट.
व्हिनेगर.
३-४ पाकळ्या लसूण बारीक चिरलेला.
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या.
मसाला, हळद, मीठ चवीनुसार

२) व्हिनेगर मध्ये पाणी घालुन (डायल्य़ुट ) पोर्क त्या पाण्याने स्वछ धुवुन घ्याव. त्याला हळद, मीठ,आल-लसणाची पेस्ट, मसाला लावुन कमित कमी ५-६ तास मुरत ठेवाव. (शक्यतो बनवायच्या आदल्या रात्री हे करुन ठेवाव).

३) एका फ्राईंग पॅनवर १ चमचा तेल टाकुन पोर्क लहान आचे वर १५-२० मिनीट फ्राय कराव.

४) तयार मटण दुसया भांड्यात काढुन, त्याच तेलात लसूण, कांदा, मध्यम आचे वर २-३ मिनीट परतुन घ्यावे.

५) कांदा पारदर्शक झाल्यावर त्यात हिरवी आणि भोपळी मिरची टाकुन २-३ मिनीट परताव.

६) चवीचा अंदाज घेउन मीठ टाकाव आणि तयार मटण टाकुन २ मिनीट मोठ्या आचेवर परताव. कादा आणि मिरची पार गळुदेउ नये. खाताना त्यांचा करकरीत पणा जाणवला पाहीजे.

फ्रिज मधली चिल्ड बीयर काढली, एक गल्लास भरला. मित्रांच्या नावाने चार थेंब आणि दोन खडे टाकले.
चियर्स.....

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

25 Sep 2009 - 6:12 pm | विंजिनेर

डुक्कर... वा वा... मोठा चविष्ट प्राणी असतो ... !!
अजून येउद्या...
अवांतरः मध्यपूर्वेत राहणार्‍या गणपाला पोर्क कसे काय मिळाले असावे बुवा?

अती अवांतरः मिपा अजून मराठमोळे असल्यामुळे मटणाच्या पुढे लोक गेले असतील असं वाटत नाही... त्यामुळे पोर्कच्या धाग्याला प्रतिसाद मिळणे अंमळ कठीण आहे

सुनील's picture

25 Sep 2009 - 7:12 pm | सुनील

मिपा अजून मराठमोळे असल्यामुळे मटणाच्या पुढे लोक गेले असतील असं वाटत नाही
अस्सं काय? सश्याच्या पाकृसाठी जागा राखून ठेवत आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विंजिनेर's picture

26 Sep 2009 - 6:30 am | विंजिनेर

चला किमान एकजण तरी आता डिवचून जाऊन अनवट पाकृ टाकेल.
येऊद्या...
सुनीलभाऊ, ते फटुंच तेव्हढं विसरू नका हां...

अवलिया's picture

26 Sep 2009 - 6:34 am | अवलिया

मिपा अजून मराठमोळे असल्यामुळे मटणाच्या पुढे लोक गेले असतील असं वाटत नाही..

मिपाकरांचा अपमान करणा-यांचा निषेध !

आमची पुढची पाकृ - साधंवरण भात आणि त्यावर तुप्प !

(मराठमोळा) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

शाहरुख's picture

26 Sep 2009 - 6:39 am | शाहरुख

आमची पुढची पाकृ - साधंवरण भात आणि त्यावर तुप्प !

आमाला वर लिंबू बी पायजेल..

(गावठी) शाहरुख

अवलिया's picture

26 Sep 2009 - 6:41 am | अवलिया

पिळुन की तसंच ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

शाहरुख's picture

26 Sep 2009 - 6:52 am | शाहरुख

लिंबाची फोडच द्या..

लहानपणी पंगतीत जेवताना लिंबाची फोड पिळताना बरेचदा आमच्या हातातून उडून समोरच्याच्या ताटात जात असे..पण आता आम्ही फोड न उडवता पिळायला शिकलोय.

अवलिया's picture

26 Sep 2009 - 6:55 am | अवलिया

हरकत नाही. तसंच पिळतांना थेंब पण नका उडु देवु..नेमका डोळ्यात गेला तर जेवण होईपर्यत चुरुचुरु होते.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

चतुरंग's picture

27 Sep 2009 - 12:39 am | चतुरंग

बरेचदा मी भातावर लिंबू पिळल्यावर माझ्या डावीकडे बसलेली वक्ती डोळा चोळू लागे ते का ह्याचे कारण मला बरेच दिवस समजले नव्हते!
त्यानंतर एकदा माझ्या उजवीकडून असाच लिंबाचा फवारा माझ्या डोळ्यांवर झाला आणि कोडे सुटले! ;)

(ईडलिंबू)चतुरंग

लवंगी's picture

29 Sep 2009 - 6:15 am | लवंगी

=)) =))

सहज's picture

25 Sep 2009 - 6:26 pm | सहज

स्टेप्स ना फूल्ल मार्क्स पण राव रानडु़क्कर रस्सा चालतो. हे ड्राय पोर्क नाय रावं :-(

गणपाशेठ एक फर्माईश - "मासा" माश्याचा एक फक्कड प्रकार येउ दे राव!

चित्रा's picture

25 Sep 2009 - 6:33 pm | चित्रा

चांगली पाककृती.

ड्राय पोर्कही चांगले लागते. पोर्क तशी कमी वेळा खाते (मुद्दाम फार वेळा जाऊन आणणे होत नाही) पण काही प्रकार आवडतात, त्यातला हा एक.

(गोव्याहून यावेळी पोर्क सॉसेज आणले होते- त्यात सगळा मसाला मुरवलेला असतो. तेही असेच भोपळी मिरच्या, कांदे आणि बटाटे यांचे मोठे तुकडे करून त्यातच परतून खायचे, ही पाककृती साधारण तशीच लागावी).

दशानन's picture

25 Sep 2009 - 6:40 pm | दशानन
हरकाम्या's picture

26 Sep 2009 - 2:04 am | हरकाम्या

"राजेंचा " दहावा कधी आणि कुठल्या घाटावर ? आणि तेराव्याला परत "पोर्क चिली " च का ???????

सुनील's picture

25 Sep 2009 - 7:10 pm | सुनील

मस्त पाकृ. आजवर फक्त सॉसेजमधील पोर्कच (पेपरोनी पिझ्झा अलाहिदा) खाल्लाय. हादेखिल करून पहायला हवा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दिपाली पाटिल's picture

25 Sep 2009 - 9:05 pm | दिपाली पाटिल

पाकृ छान आहे...पोर्कची चव चिकन-मटण पेक्षा अतिशय वेगळी असते...अगदीच जाउन पोर्क आणुन बनवलं नाही कधी आणि बहुतेक बनवलं जाणारही नाही... :D

याच पाकृने चिकनचिली-मटणचिली ही बनवता येऊ शकतं ना?

दिपाली :)

गणपा's picture

25 Sep 2009 - 9:51 pm | गणपा

पोर्कच्या ऐवजी चिकन किंवा मटण टाकुन ही करता येइल.
चिकन-चीली बरेच वेळा करुन पाहीलय.

लवंगी's picture

25 Sep 2009 - 10:08 pm | लवंगी

नवरात्र संपल्यावर नक्की बनविन,

वेताळ's picture

26 Sep 2009 - 10:11 am | वेताळ

भारतात स्वाईन फ्लु ची जोरात साथ आली आहे त्यामुळे सोरी हे आम्ही खावु शकत नाही. (|:
पोर्क खाल्लेने स्वाईन फ्लुची शक्यता वाढते काय?

वेताळ

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2009 - 11:12 am | प्रभाकर पेठकर

पोर्क चिली, पोर्क व्हिंदालू, पोर्क सर्पोतेल आणि पोर्क सागुती अनेकविध स्वादिष्ट रेशिप्याज. ह्यातील एक तरी रेसिपी करावी, हे तो डुकरेच्छा..!

पोर्क चिली मस्त दिसते आहे. करून पाहिनच. पोर्क शिजायला वेळ लागतो. त्यामुळे सुके पोर्क बनविणे (छान शिजलेले) ह्या साठी कसबी कारागिरच पाहिजे.

अभिनंदन.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

गणपा's picture

27 Sep 2009 - 5:44 am | गणपा

आज सर्पोतेल बनवल होत.

दिपाली पाटिल's picture

27 Sep 2009 - 5:48 am | दिपाली पाटिल

तुमची 'ही' आली वाटतं परत...नसेल आली तर माझा विश्वास बसत नाहीये की त्या घरी नसताना तुम्ही एवढं छान छान कसं बनवता... :D

दिपाली :)

गणपा's picture

27 Sep 2009 - 6:01 am | गणपा

अग ही आली नाही तोवर किचन मध्ये धुडगुस चालु आहे.
दिवाळी पर्यंत मरण नाही. :D

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2009 - 11:19 am | प्रभाकर पेठकर

रेशिपी द्या की......

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

निखिलराव's picture

26 Sep 2009 - 11:23 am | निखिलराव

फ्रिज मधली चिल्ड बीयर काढली, एक गल्लास भरला. मित्रांच्या नावाने चार थेंब आणि दोन खडे टाकले.

चियर्स.....

पिवळा डांबिस's picture

27 Sep 2009 - 11:22 am | पिवळा डांबिस

या धाग्यावर श्री तात्याशास्त्री अभ्यंकरांचा १९६९-२००९ फोटो बघायला उत्सुक आहे.....
:)

दशानन's picture

27 Sep 2009 - 11:30 am | दशानन

=))

भयानक प्रतिसाद... ;)

***
तुमचा पण कोटा अजून पुर्ण झाला नाही आहे काय =))

***
राज दरबार.....

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2009 - 12:30 pm | प्रभाकर पेठकर

गणपा's picture

29 Sep 2009 - 9:05 pm | गणपा

सर्व वाचकांचे नी प्रतिसाद टंकण्याचे कष्ट उपसणार्‍यांचे आभार.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

सिद्धार्थ ४'s picture

2 Feb 2013 - 5:27 am | सिद्धार्थ ४

फोटो दिसत नाही आहेत, काही तरी करा प्लीज. (तुमच्या ब्लोग वर देखील फोटो दिसत नाही आहेत. :( )

आनन्दिता's picture

2 Feb 2013 - 6:49 am | आनन्दिता

फटू दिसत नाय गणपाभौ.....