Skip to main content

सर्वाधिक वेळा पाहिलेले चित्रपट

लेखक मिसळभोक्ता यांनी शुक्रवार, 17/04/2009 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
लोक्स, आपण चित्रपट पहात असालच. काही चित्रपट आवडतात, काही नाही आवडत, खरे की नाय ? पण एखादा चित्रपट आवडला, तर कधी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो ! खरे की नाय ? माझ्या ओळखीतल्या एका इसमाने, "कयामत से कयामत तक" हा चित्रपट दररोज एकदा, ह्या दराने सलग तीस दिवस पाहिला होता. असा अतिरेक पण करणे फारसे बरोबर नाही, पण तरीही, आवडलेले चित्रपट आपण एकापेक्षा अधिक वेळा पाहतो, हे सत्य आहे. ह्या काथ्याकुटात आपण सर्वाधिक वेळा पाहिलेल्या चित्रपटांची नावे (हिंदी, मराठी, इंग्रजी, तमीळ, तेलगू, भोजपुरी कुठलाही चालेल), किती वेळा पाहिला, आणि वारंवार पाहण्याचे कारण, हे लिहावे. माझ्यापासून सुरुवात करतो. मी वारंवार पाहिलेले चित्रपट असे: शोले, २० वेळा, कारणे - बसंती, गब्बर, जय, वीरू, ठाकूर, आणि ठाकूरची विधवा सून (सर्वात महत्वाचे कारण. पुढे बघा: गुड्डी) मैने प्यार किया, १६ वेळा, कारणे - भाग्यश्री, भाग्यश्री, भाग्यश्री, आणि कबुतर जा जा जा. गुड्डी, १४ वेळा, कारणे - जया भादुरी गॉडफादर, १२ वेळा, कारणे - पृष्ठ क्रमांक २२. सूज्ञांस आणखी सांगणे न लगे. आणि मायकेलचे सिसिलीमधले वास्तव्य. एकटा जीव सदाशिव, १० वेळा, कारणे - दादा, आणि शरद तळवलकर पांडू हवालदार, १० वेळा, कारणे - दादा. जाने भी दो यारो, ६ वेळा, कारणे - थोडा खाओ, थोडा फेको. सतीश शहा, ओम पुरी. आता तुमचे येऊ द्या...

वाचने 24722
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

मालामाल विकलि. कारण निखळ मनोरनजन, शेवट चान्गला आणि सर्वात मह्त्वाचे घरातिल सर्व सद्स्यना सोबत पाह्ण्या लायक. बाकि म्हणाल तर श्याम चि आई, आज पर्यन्त अनेकदा बघुनहि पुर्ण चित्रपट (शेवट पर्यन्त) पाह्ण्यचि हिम्मत आज पावेतो आलेलि नाहि.

अनेक आवडलेले व अनेकदा पाहिलेले चित्रपट वर लिहिले आहेत सगळ्यांनी. बनवाबनवी, धुमधडाका, सिंहासन, वास्तुपुरुष, बनगरवाडी, प्रीटी वुमन, शॉशँक रिडम्प्शन, शॅल वी डान्स, स्पॅंग्लिश, रॅटाटुई, अंदाज अपना अपना, शोले, छोटी सी बात, गोलमाल, नरम गरम, कथा, चश्मेबद्दूर (हा विशेष आवडता - काली घोडी द्वार खडी आणि टुटि फ्रुटी), दिल चाहता है, मुन्नाभाई, जाने भी दो यारो, सरफरोश, स्वदेस, आनंद, बावर्ची , चुपके चुपके, हेरा फेरी, हंगामा, इतर काही - मॅकनाज गोल्ड - ग्रेगरी पेक ... व्हेअर इगल्स डेअर - क्लिंट इस्टवूड फ्युजिटिव्ह - हॅरिसन फोर्ड खूप वेळा पाहिलेला - परस्युट ऑफ हॅपीनेस... विल स्मिथ... नितांत सुंदर चित्रपट. एक क्षणही सोडत नाही. जबरदस्त... शेवटी त्याला जॉब मिळतो त्या क्षणी जे त्याने काम केले आहे ते अशक्य आहे... एक खूप आवडलेला - फाइंडिंग नीमो - अनेकदा पाहिला आहे. आजवर पाहिलेला सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट. बनगरवाडी - विलक्षण आवडलेला चित्रपट वास्तुपुरुष - मनावर गारूड करणारा. थोडा सुन्न करणारा अनुभव. तू तिथं मी - अप्रतिम... खूप छान गाणी आहेत. सगळ्यांची कामं उत्तम आहेत. कथा पटकथा संवाद - सगळंच बेस्ट. सगळ्यात छान - सुहास जोशी... कळत नकळत, चौकट राजा - स्मिता तळवलकरचे बहुतेक सर्वच चित्रपट मुक्ता - ना धो महानोरांच्या कवितांना आनंद मोडकांनी दिलेल्या चाली, सोनाली, जब्बारचा चित्रपट. सरकार - बॅकग्राउंड म्युझिक (गोविंदा गोविंदा .....), पटकथा, संवाद, अमिताभ, केके, .. असे अनेक आहेत. आठवले तेवढे लिहिले..

हम आपके है कौन..........! हम आपके है कौन..........! हम आपके है कौन..........! हम आपके है कौन..........! हम आपके है कौन..........!

इंद्रा - द टायगर... इंद्रा - द टायगर... इंद्रा - द टायगर... इंद्रा - द टायगर... इंद्रा - द टायगर... रोजच असतो.....

In reply to by गुंड्या

इंद्रा - द टायगर हा चित्रपट सेट मॅक्सवर मी दररोज बघतो!

In reply to by गुंड्या

इंद्रा - द टायगर हा चित्रपट सेट मॅक्सवर मी दररोज बघतो!

गाईड - ५ वेळा ज्वेल थीफ - ४ वेळा कारण मी नास्तिक असलो तरी देव(आनंद)भक्त आहे. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

खालील सर्व पैसे देऊन थेटरात वो भी जब हम जवान थे तबकी बात है! पेइंग गेस्ट (७ वेळा, "हाय हाय हाय ये निगाहें" हे गाणं फार आवडते!) My Fair Lady (5) Sound of Music (4) टीव्हीवर लागलेले असताना चकटफू पाहिले असे या आकड्यात जोडलेले नाहीत. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

१)वास्तुपुरुष २) चुपके चुपके ३) हम आपके है कौन - फक्त माधुरीसाठि-भयान आवडायला लागली ति ह्यो फिल्म बघित्ल्यावर ४) टायटनिक ५) School of Dance ६) झंकार बीट्स ७) जब वूई मेट