✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी प्रतिशब्द हवेत

व
वर्षा यांनी
Sun, 09/28/2008 - 06:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15709 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

काही

वैशाली हसमनीस
Sun, 09/28/2008 - 06:41 नवीन
Get together---संमेलन्,मेळावा,पण जास्त संयुक्तिक ' संमेलन' Tableware-----मेजावरण
  • Log in or register to post comments

मेजावरण?

सुनील
Sun, 09/28/2008 - 06:45 नवीन
Tableware-----मेजावरण मेजावरण हा शब्द पहिल्यांदाच समजला आणि मला तरी तो टेबलक्लॉथसारखा वाटतो टेबलवेअरसारखा नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस

>> Get

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 09/28/2008 - 11:54 नवीन
>> Get together---संमेलन्,मेळावा,पण जास्त संयुक्तिक ' संमेलन' याला कधीकधी "कट्टा" असंही म्हणतात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस

संयुक्तिक

विजुभाऊ
Wed, 10/01/2008 - 14:55 नवीन
पण जास्त संयुक्तिक संयुक्तिक पेक्षा सयुक्तीक हा योग्य शब्द आहे. संयुक्त = एकत्रीत / अमालगमेटेड (उदा:संयुक्त जनता दल) सयुक्त = बरोबर्/युक्तीवादासह ( विथ रीझन) अवांतरः बरेच पुणेकर गणपतीची आरती म्हणताना "संकटी पावावे निर्वाणी रक्षावे " ऐवजी "संकष्टी पावावे निर्वणी रक्षावे" असे म्हणतात. ते त्याना सयुक्तीक वाटते डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काय प्रकार?

अविनाश ओगले
Wed, 09/23/2009 - 19:26 नवीन
विजुभाऊ, हा संकटी , संकष्टी काय प्रकार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

इन्ग्र जी प्रतिशब्द.

Dilipkumar
Mon, 09/29/2008 - 12:51 नवीन
"मेज" हा मराठी शब्द नाही. "मेज" हा ऊर्दु शब्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस

प्रतिशब्द

संजय अभ्यंकर
Sun, 09/28/2008 - 11:02 नवीन
१) Prefecture (eg. Chiba prefecture): प्रभाग, जिल्हा २) Simmer: उकळ(णे) - द्रव पदार्थाला आलेली उकळ ३) Get together: संमेलन ४) Tableware: (आठवत नाही) ५) Sea weed - म्हणजे समुद्री शेवाळ: बरोबर ६) Porcelain - म्हणजे चिनी माती: बरोबर संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Simmer.

प्रभाकर पेठकर
Sun, 09/28/2008 - 12:06 नवीन
वा माझ्या कार्यक्षेत्रातील शब्द आहे. Simmer: उकळ(णे) - द्रव पदार्थाला आलेली उकळ Simmer म्हणजे (द्रव) पदार्थाला उकळी येऊ न देता उष्णता देत राहणे. म्हणजेच द्रवपदार्थाचे मंद आंचेअर बाष्पीभवन करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

गेट-टुगेदर

विसोबा खेचर
Sun, 09/28/2008 - 11:08 नवीन
गेट-टुगेदर हा शब्द आपण आपल्या बोलण्यातून इतका सहज वापरतो की तो आता मराठीच वाटू लागला आहे... :) बाकी, मराठी प्रतिशब्द हवेत हे शीर्षक वाचून मी अन्य एका संस्थळावर आहे की काय असेच क्षणभर वाटले! :) मिपाकर मंडळी सहसा मराठी शब्द वगैरे शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीत म्हणून असेल कदाचित... असो, बाकी चालू द्या... आपला, (मराठी) तात्या.
  • Log in or register to post comments

prefecture

गणा मास्तर
Sun, 09/28/2008 - 15:03 नवीन
prefecture म्हणजे परगणा आपला चिबा केन इचिकावा शि वासी - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

मला वाटते

चतुरंग
Mon, 09/29/2008 - 01:04 नवीन
county = परगणा prefecture = (एखाद्याच्या) अखत्यारीतील प्रभाग (जहागीर) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

+१

सुबक ठेंगणी
Wed, 09/23/2009 - 05:10 नवीन
चतुरंगशी सहमत. कारण "bridges of the madison county" चं जपानी भाषांतर "मॅडिसन गुन नो हाशी' असं वाचलं होतं. त्यामुळे county=परगणा=गुन प्रिफेक्चरला मीसुद्धा प्रभागच म्हणीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

धन्यवाद

वर्षा
Mon, 09/29/2008 - 00:14 नवीन
सर्वांचे आभार. संमेलन शब्द चांगला आहे. आपला चिबा केन इचिकावा शि वासी सोs देस का!:) प्रिफेक्चर साठी 'परगणा' शब्द सांगितल्याबद्दल आभार गणा मास्तर. पेठकर काका, Simmer म्हणजे (द्रव) पदार्थाला उकळी येऊ न देता उष्णता देत राहणे. म्हणजेच द्रवपदार्थाचे मंद आंचेअर बाष्पीभवन करणे. म्हणजे आपण वाफ काढणे म्हणतो तसाच अर्थ आहे का? मग त्याला 'वाफवणे' असा शब्द वापरला तर? बाकी टेबलवेअर म्हणजे उदा. डिनरसेट असला ज्यात बशी, बाऊल(बोल?), चमचे-काटे वगैरे वगैरे आहे तर त्याला मराठीत काही शब्द नाहीये का? -वर्षा
  • Log in or register to post comments

नाही...

प्रभाकर पेठकर
Mon, 09/29/2008 - 09:17 नवीन
आपण वाफ काढणे म्हणतो तसाच अर्थ आहे का? मग त्याला 'वाफवणे' असा शब्द वापरला तर? वाफ काढणे, वाफवणे म्हणजे वाफेवर 'शिजवणे'. 'Simmer ' प्रक्रिये आधी पदार्थ शिजण्याची प्रक्रिया झालेली असते. Simmer प्रक्रियेत फक्त ग्रेव्हीतील पाण्याचा अंश बाष्पीभूत होऊन तेल वर तरंगायला लागते आणि पदार्थाला वेगळी चव आणि चकाकी येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा

कळलं

वर्षा
Mon, 09/29/2008 - 09:37 नवीन
फरक कळला धन्यवाद :) -वर्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

एक संकेतस्थळ

मिसंदीप
Mon, 09/29/2008 - 10:52 नवीन
आपण खालील संकेतस्थळाला भेट द्यावी. http://www.websters-online-dictionary.org/translation/Marathi/
  • Log in or register to post comments

मराठी शाब्दबांध

वर्षा
गुरुवार, 10/02/2008 - 01:00 नवीन
संदीप, संकेतस्थळासाठी आभार. दरम्यानं मलाही जालावर हे एक संकेतस्थळ सापडले. http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php -वर्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसंदीप

शब्दार्थ

भिंगरि
गुरुवार, 10/02/2008 - 03:22 नवीन
Sea weed ला समुद्रि गवत/ समुद्रि वनस्पति हा शब्द जास्त योग्य वाटतो शेवाळापेक्षा. Simmer म्हणजे मंद आचेवर उकळत रहाणे. अर्थात हे सगळ माझ्यामते
  • Log in or register to post comments

हे कुठे

वर्षा
Wed, 08/05/2009 - 01:56 नवीन
हे कुठे विचारावं न कळल्याने मीच काढलेल्या या धाग्यावर विचारतेय. सध्या मी करत असलेल्या एका भाषांतरात मला हा शब्द अडलाय: ’यथास्थिती’ वाक्य असं आहे:’अधिनियम पाचवा याच्या कलम ५ (३) अनुसार किंवा यथास्थिती या नियमापैकी नियम ३-अ च्या उपबंधानुसार रक्कम नमूद करणे. इथे यथास्थितीचा अर्थ काय? कोणी सांगू शकेल काय? धन्यवाद
  • Log in or register to post comments

इथे

विंजिनेर
Wed, 08/05/2009 - 07:21 नवीन
इथे यथास्थितीचा अर्थ काय? कोणी सांगू शकेल काय?
अवांतरः यथास्थिती हा मराठीत फार प्रचलित शब्द नसावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा

ह्म्म.

वर्षा
Wed, 08/05/2009 - 20:16 नवीन
ह्म्म. धन्यवाद विंजिनेर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

स्टेट्स को

तर्री
Wed, 08/05/2009 - 20:37 नवीन
स्टेट्स को असा ईंग्रजी शब्द आहे, जवलचा.
  • Log in or register to post comments

नमस्कार

वर्षा
Wed, 09/23/2009 - 04:30 नवीन
नमस्कार लोकहो, सध्या करत असलेल्या भाषांतरात खालील शब्द अडले आहेत. punch bag bubble wrap stress ball soft toy Creative journal/Diary- रोजनिशी? Crocheting- क्रोशाचे विणकाम? Constructive- भरीव? child line/help line recycling internet- महाजाल? की आंतरजाल? download glamorous make up - रंगभूषा? play dough bedlam cube, geomag, tangle यापैकी मुख्यत्त्वे punch bag, bubble wrap, stress ball, bedlam cube, geomag, tangle यांना मराठीत काय म्हणणार हा प्रश्न पडला आहे. नाहीतर ते तसेच लिहिन. पण तुम्हाला शब्द सुचत असल्यास जरुर सांगा. शिवाय इतर उरलेल्या शब्दांचेही प्रतिशब्द माहित असल्यास सांगा. आभारी आहे.
  • Log in or register to post comments

punch bag bubble wrap:

सुधीर काळे
गुरुवार, 09/24/2009 - 21:21 नवीन
punch bag bubble wrap: बुडबुडे-वेष्टण stress ball soft toy कापडी खेळणं Creative सर्जनशील/उत्पादनशील journal/Diary- वासरी Crocheting- क्रोशाचे विणकाम? Constructive- निर्माणक्षम/शील (as against Destructive-विनाशक्षम) child line/help line recycling: पुनर्वापर internet- आंतरजाल (मायाजाल?) download: अवतरण? glamorous :मोहक, आकर्षक make up - रंगभूषा (बरोबर) play dough: bedlam: खूप गडबड-गोंधळ cube: , geomag, tangle: गुंता ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा

मराठी प्रतिशब्द

सुधीर काळे
Wed, 09/23/2009 - 09:34 नवीन
१) Prefecture (eg. Chiba prefecture): जिल्हा (अख्ख्या जपानमध्ये ४७ प्रिफेक्चर्स आहेत, त्यावरून जिल्हा हा प्रतिशब्द जवळात जवळ वाटतो. "राज्य" क्षेत्रफळाने फार मोठे वाटते.) २) Simmer: मंदाग्नीवर उकळणे ३) Get together: स्नेहसंमेलन ४) Tableware: भोजनसंच ५) Sea weed - सागरी गवत (शेवाळे बरोबर वाटत नाही) ६) Porcelain - चिनी मातीच्या वस्तू ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वर्षा
Wed, 09/23/2009 - 09:44 नवीन
धन्यवाद काळे काका!
  • Log in or register to post comments

हे माझ्या परीने...

सुबक ठेंगणी
Wed, 09/23/2009 - 10:07 नवीन
creative: सृजनशील/ सर्जनशील helpline: तात्काळ सेवा glamorous: वलयांकित (?)/जादुई play dough: चिकणमाती बाकी माहित नाही. इइ बेंक्योनि नारिमाशिता. आरिगतो. :)
  • Log in or register to post comments

क्रिएटीव्

Nile
Wed, 09/23/2009 - 10:28 नवीन
क्रिएटीव्ह ला बराच कल्पक शब्द सुचवलात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

ह्म्म्म...

सुबक ठेंगणी
Wed, 09/23/2009 - 10:39 नवीन
creative ला कल्पक म्हणायचं की सृजनशील हे मला वाटतं संदर्भावरून ठरतं. उदा. एखादी व्यक्ती (मीच का नको?) कल्पक आहे. असं म्हणू शकलो तरी creative minds चं भाषांतर करताना मात्र (मी तरी )"कल्पक मने" न करता "सृजनशील मने"असं करणं पसंत करीन. किंवा creative ideas चं भाषांतर करताना "कल्पक कल्पना" ऐवजी "सृजनशील कल्पना" करणे चांगले नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

निर्मितीक्षम

सुधीर काळे
Wed, 09/23/2009 - 22:43 नवीन
निर्मितीक्षम हा शब्द कसा वाटतो creative साठी? ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

हे काय चालले आहे ??

मिसळभोक्ता
Wed, 09/23/2009 - 12:04 नवीन
मिसळपावाचे उद्दिष्ट काय ? ह्या संकेतस्थळाची तत्त्वे काय ? त्याचा इतिहास काय ? याच साठी केला होता अट्टाहास ? असे तात्याला वाटत असणार ! -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

नाईल, सुबक

वर्षा
Wed, 09/23/2009 - 20:28 नवीन
नाईल, सुबक दोघांनाही धन्यवाद. माझ्याकडील संदर्भात सृजनशील योग्य ठरतय.
  • Log in or register to post comments

प्रति शब्द

विलास आंबेकर
Wed, 09/23/2009 - 21:03 नवीन
मला मराठी तील कैवल्ल्य या शब्दाला मराठी तच काय म्हणतात ते क्रुपया सांगाल का? हा शब्द "कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर" ह्या गाण्यात खुप वेळा आलाय. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

कैवल्य म्हणजे

चतुरंग
Wed, 09/23/2009 - 21:11 नवीन
एकरुप होणे (देवतेशी/देवाशी तद्रूप होणे). (अवांतर - धमाल्या तुझ्यासाठी प्रश्न आहे रे बाबा, कैवल्य म्हणजे काय? ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलास आंबेकर

हा हा हा.....

धमाल मुलगा
Wed, 09/23/2009 - 21:32 नवीन
खरंच की :) मला एका प्रवचनकारबुवांनी सांगितलं होतं कैवल्य म्हणजे आध्यात्मिक आनंद..मोक्ष! (अर्थात, नावाप्रमाणे त्या त्या माणसानं असु नये ह्या नियमाला आम्हीही जागतोच की ;) ) आपला, -(कैवल्याचा मागमुस नसलेला नामधारी कैवल्य ;) ) ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

प्रतिशब्द

सुनिल पाटकर
Wed, 09/23/2009 - 22:16 नवीन
Prefecture- प्रांत Tableware:-मेजोपयोगी
  • Log in or register to post comments

Tableware:-मेजोपय

अजय भागवत
Sun, 10/04/2009 - 12:01 नवीन
Tableware:-मेजोपयोगी चांगला शब्द आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनिल पाटकर

प्रतिशब्द!

विलास आंबेकर
Sun, 10/04/2009 - 11:25 नवीन
वर्षाताई, "कैवल्याच्या चंदण्याला" मधील कैवल्य या शब्दाचा अर्थ कळु शकेल का? मला खुप डोके खाजवुन पण आठवत नाही म्हणुन तुम्हास त्रास देत आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धमाल मुलगा

चेतन
Sun, 10/04/2009 - 16:45 नवीन
http://misalpav.com/user/383 धमाल मुलगा यांना विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलास आंबेकर

कैवल्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/04/2009 - 16:50 नवीन
कैवल्य म्हणजे मुक्ती, मोक्ष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलास आंबेकर

मराठी शब्द

वर्षा
Sat, 05/01/2010 - 00:43 नवीन
मराठी शब्द सुचवा Browse = ’चाळणे’ शब्द कसा वाटतो? Buyer = ग्राहक? (मी कुठेतरी ’खरेदीदार’ असा शब्द वाचला. असा शब्द आहे का मराठीत?) Real estate = ? Disclaimer = ? Post = (उदा. आपण मिपावर टाकतो त्या पोस्ट्स...त्याला काही मराठी शब्द आहे का?)
  • Log in or register to post comments

उत्तरे

हुप्प्या
Sat, 05/01/2010 - 01:33 नवीन
रियल इस्टेट : स्थावर मालमत्ता पोस्ट : प्रकटन, लेख. बायरः गिर्‍हाईक, ग्राहक. डिस्क्लेमरः आगाऊ खुलासा, आगाऊ सूचना. सोपा प्रतिशब्द सुचत नाही.
  • Log in or register to post comments

बर्‍याच दिवसांनी दिसलीस...

सुधीर काळे
Sat, 05/01/2010 - 02:44 नवीन
हॅलो वर्षा, बर्‍याच दिवसांनी दिसलीस. कशी आहेस? काका सुधीर काळे, सध्या मुक्काम विठ्ठलाच्या पंढरपुरीत (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वर्षा
गुरुवार, 05/06/2010 - 08:19 नवीन
धन्यवाद हुप्प्या.
  • Log in or register to post comments

वॉरंटी आणि

वर्षा
गुरुवार, 05/06/2010 - 08:30 नवीन
वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये फरक काय? दोन्हीला मराठीत ’हमी’ म्हणतात ना? की काही वेगवेगळे शब्द आहेत? लॉग-इन व साईन-इन मध्ये फरक काय? दोन्हींचा अर्थ ’प्रवेश करणे’च होतो ना? इंग्रजीत ’Terms & Conditions' असतात त्याला मराठीत काय म्हणतात? बऱ्याच ठिकाणी ’नियम व अटी’ वाचलं आहे. पण Terms & Conditions या दोन्हींचा अर्थ फक्त ’अटी’ च होतो ना? की इथे 'टर्म्स' हे कालावधी (period) या अर्थाने असतो? बाकी, खालील शब्दांना मराठी शब्द हवे आहेत: To promote (eg. Promotional ad) = ? Blond (Hair) = सोनेरी केस? (की ब्लॉंडच म्हणावे?) Rule of thumb = ? Version (e.g full version of a program) Co-branding = ? Cashier's cheque = ? Keyword = ? Alphanumeric = ? Personalize = (eg. Personalize your email) Salary 'range' = यात rangeला काय म्हणावे? Username = काही ठिकाणी ’सदस्यनाम’ लिहिलेले पाहिले, ते बरोबर आहे का? खरं सदस्य म्हणजे member. बाकी ’वापरकर्ता’, उपभोक्ता’, ’उपयोगकर्ता’ हे शब्द userसाठी वापरलेले पाहिले आहेत पण ’वापरकर्त्याचे नाव’ इ. जरा लांबलचक वाटते. आभारी आहे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा