Skip to main content

((कुणि जाल का, सांगाल का..))

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 18/03/2008 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा कवी अनिल यांची अप्रतिम रचना कुणि जाल का, सांगाल का..आणि कवी चतुरंगशेठ यांचे सुरेख विडंबन..(कुणि जाल का, सांगाल का..) कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कविजना ? जाली तुम्ही खरडू नका, पसरू नका अपुला गळा कंपूत प्रतिसादांनची बरसात आहे लांबली एकमेका चिंब चुंबन देत किर्ती वाढली फार पूर्वीचा तसा हा डाव आजुन चालला आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला सांभाळुनी र्‍हावा जिवा तुम्ही जरासे आपले इतक्यात येथे वाजली कोण्या कवीची पावले सांगाल का या "केशवा", का खोड त्याची काढली आणि खाजेनेच या खरुज आता वाढली

वाचने 10234
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

विडंबनाचे ही विडंबन... मानलं बुवा तुम्हाला.. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रतिसादांनची?? माला??? इतकी तडजोड करायची पाळी यावी? वाईट वाटले. असो. (?)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

नसेला धक्का लागला वाटत.. (धनवंतरी)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

नवंतरी (!)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

जर बरोबर लिहिलं तर मग तुमच्यासारख्या लाढवांना काम काय.. सगळ्यांचा विचार करावा लागतो.. (सर्व सामायिक)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

सगळ्यांचा विचार करता म्हणूनच तुम्ही केशवसुमार :) (!)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

फाजिल गौरसमज आमचे नाही.. आम्ही सुमारच बरे.. (सुमार)केशव

In reply to by बेसनलाडू

आमच काहीतरी पटल तर (समाधानी)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

काय पटते/पटत नाही, आवडते/आवडत नाही हे कळले असेलच/कळेलच (समजूतदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

माला ऐवजी मजला चालले असते का? (पृच्छक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आजुनी च्या ऐवजी अजुनही सुद्धा नसते चालले :) फारच सुमार पृच्छा बाबा तुमची :) (उत्तरदाता)बेसनलाडू

In reply to by आजानुकर्ण

पाटी फुटली आई माला भूक लागली अशी जूनी शाब्दिक दिवाळखोरी ऐकल्याचे आठवत होते.. मजला ही चालले असते (स्मरणशील शाब्दिक दिवाळखोर)केशवसुमार

कंपूत प्रतिसादांनची बरसात आहे लांबली एकमेका चिंब चुंबन देत किर्ती वाढली फार पूर्वीचा तसा हा डाव आजुन चालला आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला हा हा हा! हे बाकी मस्तच रे केशवा.... :) (कंपूबाज) तात्या.

विडंबन आवडले. (हसरा) आजानुकर्ण

आपून तर बॉ केशवाचा फ्यॅनच आहे,पहिल्यापासून.... गोडधोड लाडवापेक्षा मिसळच मस्त लागते... सांभाळुनी र्‍हावा जिवा तुम्ही जरासे आपले इतक्यात येथे वाजली कोण्या कवीची पावले सांगाल का या "केशवा", का खोड त्याची काढली आणि खाजेनेच या खरुज आता वाढली केशवा टेंसन नाय घ्यायचं... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विडंबन

मूळ गीत... केशवा, माधवा, तुझ्या नावात रे गोडवा... प्रेरणा... केशवसुमार आणि बेसनलाडू यांची मैत्रीपूर्ण शाब्दिक चकमक... केशवा, लाडवा नका भांडू ठेवा गोडवा. तरबेज सदस्यांनी विडंबन पुढे चालवावे...

आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला
:))) फक्कड जमलंय राव! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार