Skip to main content

बेरीचे पराठे

लेखक Meghana यांनी बुधवार, 23/09/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार खवय्यानो , झटपट व सोपे ह्या प्रकारातले हे पराठे. लहान मुलांसाठी पण पौष्टिक. साहित्य तूप काढून झालयावर उरलेली बेरी, कणीक, ओवा,मीठ व पाणी कृती बेरी मध्ये ओवा, कणीक व मीठ घालून चांगले एकत्र करावे. त्यात लागेल तेवढे पाणी घालून कणीक भिजवावी. पुरी प्रमाणे थोडी घटटसर असावी. १५-२० मिनिटे ठेवून मग त्याचे पराठे करावे. तव्यावर चांगले भाजून घ्यावे. खमंग लसूण चटणी सोबत खावे. ह्यात करता येण्या सारखी वेरीयेशन्स: कणीक भिजवताना त्यात, लालतिखट किंवा हिरवी मिरची वाटून (चवीप्रमाणे) कांदा किसून मग भिजवावी व पराठे करावे. फोटो काढलेला नसल्यामुळे इथे टाकता आला नाही. तेव्हा हा पाककृती लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न गोड मानून घ्यावा.

वाचने 2786
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मी मुबैत असताना शेजारणीला बेरी आवड्त असे म्हणुन तिला देत असे. ई़कडे तुप वैग्रे नाही करत मी. आता परत गेले कि मस्त बेरिचा उपयोग करेन. सही आयदिया ;;) चुचु

आजवर बेरीची फळं असतात हे माहिती होतं.... उदा. स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्ल्यूबेरी.... हे तुपावरची बेरी म्हणजे काय असतं?

In reply to by पिवळा डांबिस

अहो काका लोणी गॅस वर ठेवुन कढ्वले कि तुप तयार होते आणी खाली जे खरपुस ब्राउन रन्गाचे उरते ति बेरी.. चुचु