अनेकानेक प्रकारच्या चीजकेकच्या रेशिप्या उपलब्ध आहेत त्यातील ही एक पाकृ खास टार्याच्या बड्डे निमित्त!
टारोबाचा बड्डे असल्याने कॅलरींबिलरींचा विचार तात्पुरता बाजूला सारुन कॅलरीबाँब असणारी ही पाकृ देते आहे.
साहित्य- १किलो मागर(लो फॅट) क्वार्क/ चक्का/ केफिर लेबनी चीज. कमी फॅटवाला चक्का किवा लेबनी चिज घावे.
चक्का किवा लेबनी चीज किवा मागर क्वार्क यातील काहीही एक उपलब्धतेनुसार घेता येईल.
२०० ग्राम बटर/मार्गारिन
२५० ग्राम साखर
१०० ग्राम मैदा,१चिमूट मीठ
६ अंडी
२ चमचे वॅनिला अर्क
१चमचा बेकिंग पावडर
१चमचा लिंबाचा रस+ १/२ लिंबाची साल किसून
२चमचे रम मध्ये भिजवलेले मूठभर बेदाणे ( हे ऑप्शनला टाकू शकता)
१/२ चमचे ब्रेडक्रम्स किवा मैदा
कृती- रममध्ये बेदाणे भिजवून केक ची पुढची कृती करायला घेणे. रम नको असेल तर नुसते बेदाणेही घालता येतील. बेदाणेच नको असतील तर बिनाबेदाण्यांचाही केक करता येईल. टारुका बड्डे है भाई.. आपल्याला हवे तसे ऑप्शन्स घ्या.
बटर भरपूर फेटणे. साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे, वॅनिला अर्क घालून फेटणे. लिंबाचा रस व साल घालून फेटणे. मैदा+बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ घालून फेटणे. क्वार्क/चीज /चक्का घालून फेटणे. रममधील बेदाणे घालणे व सारखे करणे.
केकच्या मोल्डला बटर लावणे. त्यावर ब्रेडक्रम्स/मैदा भुरभुरणे. मोल्ड आपटून जास्तीचा मैदा/ब्रेडक्रम्स बाहेर काढून टाकणे.
अवन प्रिहिट करायचा नाही. १६५ ते १७० अंश सेल्शियस ला ७० ते ८० मिनिटे बेक करणे. केक झाला की अवन बंद करुन ५ ते ७ मिनिटे केक अवन मध्येच राहू देणे व नंतर बाहेर काढणे.
हॅपी बड्डे टारोबा म्हणून ताव मारणे,:)
वाचने
11240
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेय
हाहाहा...
In reply to हेय by पर्नल नेने मराठे
:-)
मस्त
जाऊ दे...
जबरी!!!
मायक्रोव्हेव
In reply to जबरी!!! by ऋषिकेश
कोटि कोटि
चीजकेक
ज ह ब ह र्या!!
फ्रेश चीज
In reply to ज ह ब ह र्या!! by प्राजु
धन्यवाद स्वातीताई..
In reply to फ्रेश चीज by स्वाती दिनेश
स्वातीताई!
वा..सुरेख...
सुंदर केक!
हॅ हॅ हॅ
काल मी
In reply to हॅ हॅ हॅ by दशानन
मग झाले का मोदक?
In reply to हॅ हॅ हॅ by दशानन
>>कोणी तरी
In reply to हॅ हॅ हॅ by दशानन
अरे बापरे
In reply to हॅ हॅ हॅ by दशानन
लै
केक मस्तच
मस्त केक.
लेबनीज चीज बद्द्ल थोडेसे.. प्राजुताईंसाठी
तिखट..
In reply to लेबनीज चीज बद्द्ल थोडेसे.. प्राजुताईंसाठी by आशिष सुर्वे
सही ग
मस्त
वा .. मस्त
छान--पण---
धन्यवाद
छ्या!!!
In reply to धन्यवाद by स्वाती दिनेश
हो तेच म्हणतो मी!
In reply to छ्या!!! by बिपिन कार्यकर्ते
मस्त!