भूप म्हणजेच भूपाली. हा राग रात्रीच्या वेळी गायला जातो, असं म्हणतात. परंतु आपल्याकडे असंख्य भूपाळ्या आहेत. त्या याच रागातल्या. त्यामुळे हा राग रात्रीचा की पहाटेचा हा वादाचा विषय आहे.
---
उत्तर रात्र उलटून गेलीय. पक्षांचा किलबिलाटही अद्याप सुरू व्हायचा आहे. काही वेळानंतर झुंजूमुजू होणार आहे. अशा धीरगंभीर वातावरणात भूपाळ्यांचे स्वर मनप्रसन्न करतात. या वातावरणातील शांत आणि गंभीर पण प्रसन्नभाव भूपमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. हीच भूपची नादप्रवृत्ती असावी. सा रे ग प ध सा हे सहा स्वर असलेला हा राग त्यामुळेच उत्तररात्रीनंतर पहाटपर्यंत गायला जात असावा, असे वाटते.
असो. चर्चा भूप रागाने सुरू केली असली, तरी ती संपणार आहे मालवून टाक दीप या गाण्यावर!
हे गाणे ऐकताना एकादा एक मित्र म्हणाला, "पटदीप ना रे हा राग.'
म्हटलं, नाहीरे पटदीप नाही. तर म्हणाला, पटदीपच आहे.
जरा दरडावून पुन्हा म्हटलं, पटदीप नाहीच. पटदीप नक्कीच नाही.
मग म्हटला, "बिभास आहे वाटतं.'
मलाही रागाचं नेमकं नाव सांगता येत नव्हता. षडज आहे. रिषभ आहे, गंधार आहे, पंचम आहे. धैवत मात्र वेगळा वाटत होता. त्यामुळं मी त्याला भूपही म्हणू शकत नव्हतो.
घरी जाऊन पेटी घेऊन बसलो. गाण्यात कोमल धैवत आपले अस्तित्व अतिशय लख्खपणे दाखवत होता.
"लाभला...निवांत संग...' यात येणारा मंद्र सप्तकातील पंचम आणि कोमल धैवत, शांत आणि गंभीरतेबरोबर हळवापणाही आणतो.
"मालवून टाक दीप'मधील पंचमावरचा ठहराव तर क्या कहने! गंधारावरून पंचम, पंचमावरून कोमल धैवत, पुन्हा पंचम... मूर्तीमंत आसक्तीच ही; पण ती व्यक्त करताना हळुवारपणा आणि उत्कटता तरी किती असावी?
' यालाच कामातुरता म्हणतात का हो? '
असो. गाण्यात कोमल धैवत आला म्हटल्यावर हा भूप नाही, हे नक्की. मग हा राग कोणता असावा. बराच विचार करत होतो. वाजवून पाहात होतो.
मध्येच कुठेतरी "अबके हम बिछडे' ही गझल वाजवत असल्यासारखे वाटायचे. तर कधी "चढता सूरच धीर धीरे' ही कव्वाली ऐकत असल्याचा भास व्हायचा.
राग कोणता हे कळत नव्हते. तो भूप नव्हता. पददीप तर नव्हताच नव्हता.
यातला कोमल धैवत काही स्वस्थ बसू देत नव्हता. एका हार्मोनियमवादक मित्राला फोन करून विचारले, तर त्यालाही रागाचे नाव सांगता येईना. मिश्र भूप असावा, ही त्याची शक्यता. आणखी एका मित्राला विचारलं, तर कृष्णरंजनी रागाचं नाव पुढे आलं.
मी हे नाव तर प्रथमच ऐकत होतो. त्यामुळे असेल बुवा हा राग, असं म्हणून मी काही थांबलो नाही.
आणखी एका विशेष जाणकार मित्राला फोन केला. तेव्हा तो म्हटला, हा राग आहे भूपेश्वरी. त्यालाच कृष्णरंजनी म्हणतात!
आता आमचं डोक जरा शांत झालं. म्हटलं हां.. आता कसं...
रिषभ तोच, गंधार तोच.. पंचम तोच... फक्त धैवत कोमल झालाय.
भूपमधला "पुरुषार्थ' जाऊन स्त्रीत्वातला हळूवारपणा इथे आलाय... एवढेच!
वाचने
7655
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
सविस्तर लिहिण्याचे
In reply to छान by श्रावण मोडक
छान लिहिले
अरे वा!
घ्या आस्वाद
छान
अरे वा
आणखी एक
छोटेखानी
दुवा मिळेल काय
मी ते जतन
In reply to दुवा मिळेल काय by अन्वय
दूर दूर तारकात ...
हेच म्हणतो
In reply to दूर दूर तारकात ... by नंदा
छान लेख. या
असे कसे
In reply to छान लेख. या by घाटावरचे भट
मालक, आपण
In reply to असे कसे by अन्वय
राग नसावा.
In reply to मालक, आपण by घाटावरचे भट
अतिशय छान माहिती .
केशवराव,
In reply to अतिशय छान माहिती . by केशवराव
संगीतकार आणि श्रेय
In reply to केशवराव, by अन्वय
"मालवून
धन्यवाद
अब के
धन्यवाद
बरे झाले सुधारणा केली
सारेगपधसा..