हिन्दू माणसाला राग येइल अशी गोश्ट कोणती?

संकेतजी कळके's picture
संकेतजी कळके in काथ्याकूट
15 Sep 2009 - 8:31 pm
गाभा: 

काही दशकांपुर्वी चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरासाठी एक चढाओढ जाहीर केली होती (संदर्भ पुस्तक तिळ आणि तांदुळ प्रुश्ठ संख्या १८७ लेखक --- ग. दि. मा)

तोच प्रश्ण मिपाकरांसठी पुन्हा..

हिन्दू माणसाला राग येइल अशी गोश्ट कोणती??

प्रतिक्रिया

सूहास's picture

15 Sep 2009 - 8:39 pm | सूहास (not verified)

हिन्दू माणसाला राग येइल अशी गोश्ट कोणती??>>>
संकेतजी कळके .... म्हणजे तुम्ही नाही हो...भारताची नालस्ती केली तर हिन्दु माणसाला राग येइल असे मला म्हणायचे होते..

सू हा स...

मिसळभोक्ता's picture

15 Sep 2009 - 9:36 pm | मिसळभोक्ता

हिंदू माणसाला "काका" म्हटले की चीड येते, असा माझा अनुभव आहे.

-- मिसळभोक्ता

प्रकाश घाटपांडे's picture

16 Sep 2009 - 11:38 am | प्रकाश घाटपांडे

विशेषतः मुलींनी काका म्हन्ल की लईच राग येतो ना? आदर व्यकत करण्यासाठी म्हणुन 'काका' हा बाह्य हेतु असला तरी काही चवचालिका या इतरांना काका म्हणुन आपले वय कमी झाल्याचा मानसिक आनंद मिळवतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पिवळा डांबिस's picture

16 Sep 2009 - 10:49 pm | पिवळा डांबिस

हिंदू माणसाला "काका" म्हटले की चीड येते, असा माझा अनुभव आहे.
नाय हो!!!
अलिकडेच मिपावरच्या (आणि एकूणच आंतरजालीय!!) प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने आम्हाला जाहीरपणे एल्.ए.चा काका केलं...
आम्हाला मुळीच चीड आली नाही....
(आम्ही फक्त एक आवंढा गिळला आणि सर्व हिंदू देवतांना प्रार्थना केली की बाबांनो, आता माझी लाज राखणं फक्त तुमच्याच हाती!!!:))

वरील प्रतिसादात 'हिंदू' आणि चीड' हे दोन्ही शब्द आल्याने हा प्रतिसाद अवांतर ठरत नाही!!!!

संताजी धनाजी's picture

17 Sep 2009 - 11:49 am | संताजी धनाजी

हे हे!
- संताजी धनाजी

विकास's picture

15 Sep 2009 - 9:53 pm | विकास

बर्‍याचदा हिंदू माणसास हिंदू म्हणले की राग येतो ;)

सखाराम_गटणे™'s picture

15 Sep 2009 - 9:58 pm | सखाराम_गटणे™

+१

प्रदीप's picture

16 Sep 2009 - 10:46 am | प्रदीप

अगदी बरोबर आहे.

हेरंब's picture

15 Sep 2009 - 10:26 pm | हेरंब

मी हिन्दु आहे आणी मला कोणी 'काफीर' म्हटले तर राग येतो.

शाहरुख's picture

16 Sep 2009 - 1:09 am | शाहरुख

हिन्दू माणसाला राग येइल अशी गोश्ट कोणती??

धागाप्रवर्तकाला (हा शब्द एकदा तरी वापरायची लै इच्छा होती राव) हिंदू माणसाला हिंदू असल्याने कोणत्या गोष्टीचा राग येतो ते पाहिजे का आपले जनरलच ??

हरकाम्या's picture

16 Sep 2009 - 1:28 am | हरकाम्या

माझ्यामते हिंदु माणसाला कधीच राग येणे शक्य नाही. कारण त्याच्यावर वर्षानुवर्षे न राग आणण्याचे संस्कार झालेले आहेत.शिवाय
हिंदु माणुस अजुन जुन्या टाकाउ ग्रंथांतुन बाहेर निघालेला नाही.
सध्या तो " मउ मेणाहुनी आम्ही विश्णुदास "आणि
"एक दिवस वाघाचे आयुष्य जगणे पसंत करण्यापेक्षा अनेक वर्षे शेळीचे आयुष्यजगणे पसंत करतो "

निमीत्त मात्र's picture

16 Sep 2009 - 1:31 am | निमीत्त मात्र

हिंदू कोण ते नक्की झाले का आधी? ;)

मग बघूया त्यांना राग कशाने येतो ते :)

छोटा डॉन's picture

16 Sep 2009 - 7:15 am | छोटा डॉन

प्रश्नाचे स्वरुप बरेच व्यापक आहे, हा प्रश्न फक्त हिंदुपुरता मर्यादीत नाही.
तरीही "विकास" यांच्या वरील प्रतिक्रियेशी सहमत ...

आम्हाला "गर्व से कहो हम हिंदु है ! " असे म्हणायला लै आवडते पण बाहेर गेल्यावर अथवा इतर धर्मीय मित्र-मंडळीत आपल्या भारतात हिंदु म्हणुन राहण्याचे फायदे असण्याचा विषय अथवा त्याच्या ओघाने इतर धर्मियांना होणारा सो कॉल्ड त्रास वगैरे मुद्दे निघाले की आमचे सटकते. मग तेव्हा "तु मला मुद्दाम हिंदु हिंदु म्हणुन का डिवचतो आहेस ? " असे वाक्य येते ...

"भारत माझा देश आहे, माझे भारत देशावर प्रेम आहे" अशी वाक्ये भारतात बसुन उच्चारताना एकदम भरुन का तसेच काहितरी येते. मात्र परदेशात गेल्यावर जेव्हा क्वचित ( किंवा आजकाल सर्रास ) "भारतीयांनी आमच्या जॉब्जवर कब्जा केला व आम्हाला बेकार अवस्थेत जगायला भाग पाडतात" अशा प्रकारच्या युरोपियन / अमेरिकन प्रतिक्रिया वाचल्या / ऐकल्या की मग मात्र आम्हाला आमचा "भारतीय" हा उल्लेख खटकतो.

शिवाय आम्हाला "ब्राम्हण" अथवा इतर उच्चवर्णिय असल्याचा अभिमान ( व काही वेळा अहंकार) असतोच, आपण ते चार-चौघात बर्‍याच वेळा प्रौढीने सांगतो मात्र हयच चार-चौघापैकी कुणी "का रे ए बामना" म्हटले की आमचे सटकते.

तसा आम्हाला "देशस्थ"पणाचा ही भयंकर अभिमान, जणु काही देशस्थ लोकांनीच संस्कार, संस्कॄती वगैरे टिकवुन ठेवली ह्यावर आमचा प्रगाढ विश्वास आहे, बाकीचे आम्हे ह्यासमोर क्षुल्लक समजतो. पण जेव्हा एखादा कोकणस्थ किंवा इतर कोणी " देशस्थ म्हणजे बेशिस्त / देशस्थ ना, मग बरोबर आहे" असे म्हणतो तेव्हा पुन्हा आमचे सटकते ...

तर थोडक्यात काय, आम्हाला एखाद्या गोष्टीचा भयंकर अभिमान वाटतो पण चार-चौघात त्याचा जाणुनबुजुन केलेला उल्लेख नकोसा असतो.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

निमीत्त मात्र's picture

16 Sep 2009 - 7:23 am | निमीत्त मात्र

शिवाय आम्हाला "ब्राम्हण" अथवा इतर उच्चवर्णिय असल्याचा अभिमान ( व काही वेळा अहंकार) असतोच,

हे अतिशय चुकिचे आहे. जातीचा अभिमान/अहंकार असू नये. जात ही काही कुणी कष्टाने कमावलेली वस्तू नव्हे, तेव्हा त्याचा वृथा अभिमान कशासाठी?

छोटा डॉन's picture

16 Sep 2009 - 7:40 am | छोटा डॉन

मुळात धर्म / जात / पंथ वगाइरे आम्ही "मुलभुत गोष्टी" मानतो व त्यावर आम्ही शक्यतो वाद घालत नाहीच.
मात्र आपण इथे जो "वॄथा अभिमान" हा शब्द वापरला म्हणुन ४ शब्द लिहतो ...

>>जातीचा अभिमान/अहंकार असू नये
असहमत,
का नसावा बरे ???

जर तुम्ही अजाणताच फुकाचा अभिमान बाळगत असाल तर तर तुमचे म्हणणे ठिक आहे.
मात्र काही वेळा परिस्थीती वेगळी असु शकत नाही का ?
जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हा तुम्ही अगदी कोरी वही असता की ज्यात काहीही लिहले नसते, हळुहळु मोठ्ठे होत जाल तसे तुमच्या जातीव्यवस्थेनुसार, सामाजीक व कौटुंबिक परिस्थीतीनुसार तुमच्यावर अनेक संस्कार घडत जातात, बर्‍याच नव्या गोष्टी शिकवल्या जातात. ह्याच काळात तुम्हाला आपल्याच जातीतल्या लोकांनी इतिहासात देश/समाज/स्वजात ह्यासाठी दिलेले योगदान वगैरे ह्याची माहिती होते.
मग अशा परिस्थीती आपण नक्की कुठल्या परंपरेचे पाईक आहोत ह्याची एखाद्या माणसाला जर व्यवस्थित जाण असेल तर त्याला त्या परंपरेचा व पर्यायाने ते एपरंपरा ज्या जातीत आहे त्याचा "अभिमान" का असु नये ?

कष्टाने कमावलेली गोष्ट नाही हे बरोबर आहे पण कसे का असेना जी जात व त्याच्या ओघाने जी परंपरा / संस्कार मिळतात त्याचे पालन करण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. मग आपण कष्ट करुन एखाद्या गोष्टीचे पालन / विकास करत असु तर अभिमान का बाळगु नये ?

अभिमान हा जरुर असावा, तो वृथा असण्याचा प्रश्नच नाही ..!!!

बाकी गर्व आणि अभिमान ह्तातली सीमारेषा फार अंधुक आहे, योग्य जाण नसेल तर अभिमानाचे रुपांतर गर्वात होते ...

असो, तुर्तास इतकेच ..

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

निमीत्त मात्र's picture

16 Sep 2009 - 8:51 am | निमीत्त मात्र

जातीव्यवस्थेचा पगडा अजूनही भारतीय मनांतून जात नाही हेच खरे.
'माणूस' ही एकमेव जात भारतातील प्रत्येक नागरीक समजेल तो सुदीन.

आजच्या शिकल्या सवरल्या इंटरनेट वापरणार्‍या पिढीतही जात किती खोलवर रुतलेली आहे ह्याचा उत्कृष्ट नमूना म्हणजे तुमचा हा प्रतिसाद.
अर्थात "मग, त्यात काय चुकलं?" असा प्रतिवाद तुम्ही करालच तेव्हा माझी शरणागती!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2009 - 10:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. मला माझ्या देशाचा अभिमान आहे का?
होय आहे.
(मी भारतीय म्हणून जन्माला येण्यासाठी काय केलं?)
काही नाही.
२. मला माझ्या राज्याचा/भाषेचा अभिमान आहे का?
होय आहे.
(मी महाराष्ट्रात/मराठी भाषिक म्हणून जन्माला येण्यासाठी काय केलं?)
काही नाही.
३. मला माझ्या आई-वडीलांचा अभिमान आहे का?
होय आहे.
(मी त्यांच्या पोटी जन्माला येण्यासाठी काय केलं?)
काही नाही.

मग मला माझ्या (जी काही आहे त्या) जातीचा अभिमान का नसावा?

मी भारतीय आहे म्हणून मी सामान्यतः इतर कोणत्याही देशाच्या नागरीकांचा राग, द्वेष करत नाही. मी मराठी आहे म्हणून इतर भाषिकांचा राग, द्वेष करत नाही. माझे आई-वडील वेगळे आणि ऑफिसमेटचे वेगळे म्हणून मी त्याचा राग, द्वेष करत नाही. मी एका जातीत जन्माला आले म्हणून मला माझ्या जातीबाहेरच्यांचा राग, द्वेष नाही.

डानरावांच्या प्रतिसादाचा अर्थ एवढाच होता, की नको त्या ठिकाणी नको ते संदर्भ वापरलेले आवडत नाहीत. नोकरी-कामाच्या जागी माझा धर्म, पंथ, जात, भाषा, वय इ इ.चा संदर्भाशिवाय आलेले उल्लेख आवडत नाहीत.

राहता राहिला काथ्याकूटाचा विषयः हिंदू म्हणजे नक्की कोण? सगळ्या हिंदूंना कसला राग येतो हे समजायला मला पंजाबी, बंगाली, तामिळ, असमिया इ.इ. लोकांच्या आचार-विचारांबद्दल काय माहित आहे? इतर भाषिक सोडून द्या, मला खान्देश, वर्‍हाड (म्हणे माझे अर्धे जीन्स वर्‍हाडी आहेत) इथल्या परंपरांबद्दल किती माहिती आहे? मला मुंबई आणि पुण्याबाहेरचा महाराष्ट्र किती माहित आहे?
आणि नसेल तर मी उगाच इथे टंकण्यात वेळ आणि मिपाची ब्यांडविड्थ का फुकट घालवत आहे?

अदिती

शाहरुख's picture

16 Sep 2009 - 11:01 am | शाहरुख

शेवटचा परिच्छेद वगळता, +१०००

("तुम्हाला जातीचा अभिमान वाटतो का" असा कौल टाकलेला) शाहरुख

छोटा डॉन's picture

16 Sep 2009 - 11:48 am | छोटा डॉन

अदितीला माझा मुळ प्रतिसाद व त्यानंतर दिलेले उत्तर ( पक्षी : प्रतिवाद ) १००% योग्य समजला आहे असे वाटते.

डानरावांच्या प्रतिसादाचा अर्थ एवढाच होता, की नको त्या ठिकाणी नको ते संदर्भ वापरलेले आवडत नाहीत. नोकरी-कामाच्या जागी माझा धर्म, पंथ, जात, भाषा, वय इ इ.चा संदर्भाशिवाय आलेले उल्लेख आवडत नाहीत.

करेक्ट ...!!!
१००% सहमत, माझ्या प्रतिसादात गर्भितार्थ हाच होता, मात्र त्यातले "जात" वगैरे निवडक शब्द / संदर्भ बाजुला काढुन त्याच दिशेने विचार केल्याने त्यातुन दुसरा अर्थ ध्वनित होत असेल तर त्यात दोष माझा कसा ? ;)

बाकी चालु द्यात, उगाच जात वगैरे काढुन तासनतास भांडण्याच्या कल्पनेनेच आम्हाला अंमळ झोप येते. तेव्हा प्रथेनुसार आमची "शरणागती" जाहीर करत आहोत.
आम्हाला जे आणि जेवढे बोलायचे आहे ते बोलुन झाले आहे :)

------
(सविस्तर)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

अदिती , डॉण्या ,
दोघांनाही +१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
कवटी

प्रकाश घाटपांडे's picture

16 Sep 2009 - 11:14 am | प्रकाश घाटपांडे

बाकी गर्व आणि अभिमान ह्तातली सीमारेषा फार अंधुक आहे, योग्य जाण नसेल तर अभिमानाचे रुपांतर गर्वात होते ...

सहमत पण आता अस्मितेला कुठे बसवायच?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विशाल कुलकर्णी's picture

17 Sep 2009 - 12:04 pm | विशाल कुलकर्णी

डानराव..
मुजरा स्विकारा ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मिसळभोक्ता's picture

16 Sep 2009 - 10:58 pm | मिसळभोक्ता

तसा आम्हाला "देशस्थ"पणाचा ही भयंकर अभिमान, जणु काही देशस्थ लोकांनीच संस्कार, संस्कॄती वगैरे टिकवुन ठेवली ह्यावर आमचा प्रगाढ विश्वास आहे, बाकीचे आम्हे ह्यासमोर क्षुल्लक समजतो. पण जेव्हा एखादा कोकणस्थ किंवा इतर कोणी " देशस्थ म्हणजे बेशिस्त / देशस्थ ना, मग बरोबर आहे" असे म्हणतो तेव्हा पुन्हा आमचे सटकते ...

डॉन्या,

अशावेळी फक्त "ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी" हे एक नाव उच्चारले की सगळे कोब्रा गप्प बसतात.

-- मिसळभोक्ता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2009 - 7:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुस्लीमांची प्रगती, मुस्लीमांना मिळणा-या सवलती, मुस्लीमांची अरेरावी, मुस्लीमांची संस्कृती, या आणि अशाच काही गोष्टीमुळे (काही)हिंदू माणसांना राग येतो. :)

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2009 - 10:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुस्लीमांची प्रगती, मुस्लीमांना मिळणा-या सवलती, मुस्लीमांची अरेरावी, मुस्लीमांची संस्कृती, या आणि अशाच काही गोष्टीमुळे (काही)हिंदू माणसांना राग येतो.

अरे बाप रे, इतरांच्या प्रगतीचा राग येणारे लोकं हिंदू किंवा इतरही कोणत्या धर्मात आहेत याचा मला व्यक्तीशः प्रचंड राग येत आहे.

आणि कुणाच्याही संस्कृतीचा राग का ब्वॉ येतो प्राध्यापकसाहेब? सुसंस्कृत माणसाला संस्कृतीचा नाही विकृतींचा राग येतो.

बाकी प्रा.डॉ., सामान्यीकरण करून (काही लोकांच्या नावाखाली) झोडपणं चालू ठेवा. निषेध तरी कसा करणार? मराठी शिकवणार्‍या संपादकांचीच ही भाषा ... चालू द्या ...

अदिती

अवलिया's picture

16 Sep 2009 - 10:52 am | अवलिया

संपादक मराठी शिकवतात? मला वाटायचे प्राध्यापक मराठी शिकवतात !
अरेरे ! संपादक जर शिकवायला लागले तर "माती"च आहे.... :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2009 - 11:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>सुसंस्कृत माणसाला संस्कृतीचा नाही विकृतींचा राग येतो.

प्राध्यापक असलो काय आणि नसलो काय, संपादक असलो काय आणि नसलो काय. पण, वाटलेले बोलल्याशिवाय होत नाही.त्यातल्या त्यात तोंड फुटकं असल्यामुळे मराठी संस्थळावर वाटते ते खरडल्याशिवाय होत नाही. आणि हे लिहितांना कोणाला काय वाटते, त्याचाही विचार आम्ही करत नाही. केला नाही. जे वाटतं ते बोलतो हे आपण जाणताच. असो, सुंसंस्कृत माणसाला संस्कृतीचा राग येतो की विकृतीचा माहित नाही. पण इतिहास मोठा विचित्र आहे. मुस्लीम जेव्हा भारतात आले तेव्हा येथील संस्कृती कशी होती मला माहीत नाही. पण येथील संस्कृती आणि श्रद्धेची मोठी हेळसांड आक्रमकांनी केली. याला इतिहास साक्ष आहे. देवांच्या मूर्तींना तोडले, पाण्यात फेकून दिले. तिर्थक्षेत्रांची झालेली विटंबना वगैरे इत्यादी इथपासून तर आमच्या मराठवाड्यातल्या निजामी राजवटीला हद्दपार करण्यापर्यंत जो लढा द्यावा लागला. तो जसा एक जुलमी राजवटीविरुद्धचा, स्वातंत्र्याचा लढा जसा होता तसा तो एका संस्कृतीविरुद्धही होता असे मला वाटते. अशा जखमांचे व्रण घेऊन जगणारे सुसंस्कृत वगळले तरी दोन वेगवेगळ्या संस्कृतीचा लढा कायमच इथे पाहण्यात आला आहे. त्या आणि केवळ त्याच कारणामुळे या देशाची फाळनीही झाली हे सर्वांना ज्ञात आहे. आमच्या देशात बाहेरुन येणारे लोक आमच्यावर राज्य करु पाहतात. धार्मिक दहशत निर्माण करु पाहतात. आम्ही मुळ येथील असूनही आमच्या अनेक दररोजच्या गरजांबरोबर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांशी लढत असून उपर्‍या माणसाचे लाड इथे पुरवल्या जातात. हे अनेक हिंदुंना सहन न होणारेच आहे. विदा नाही-आकडेवारी नाही. पण हा असंतोष काही हिंदु माणसाच्या मनात खदखदत असतोच यात शंकाच नाही. म्हणून तर सच्चर आयोग म्हणजे मुस्लीमांचे लाड आहेत. अल्पसंख्या़क संस्थांना कोणतीही पात्रता न पाहता शासकीय अनुदाने, शिक्षण संस्था दिल्या जात आहेत, हे मतांचे राजकारण आहे. हे आणि असे विचार करणारे काही हिंदू नक्कीच आहेत. (इतर धर्मातही असतील/ नसतील) म्हणून म्हणतो वरील उल्लेखलेल्या गोष्टींचा काहींना नक्की राग येतो.

आणि हो, केवळ मी हे बोलतो म्हणून माझ्याकडे बोट दाखवून कदाचित आपल्या विचारातला समजूतदारपणा एकवेळ वाचकांच्या निदर्शनास येईल.
पण, लां*** नो, या देशातून चालते व्हा. मुस्लीमांना आश्रय देऊन आपण निखारे बांधून घेतले असे म्हणना-यांनी महाराष्ट्रात सत्ता आणली ती काही विकासाच्या प्रश्नावर नाही. तर कोणत्या तरी एका संस्कृतीच्या विरोधातलाही तो भाग होताच. कोणाला तरी शिव्या दिल्यानंतर व्वा ! काय मनातले भाषण झाले असे म्हणनारे हजारो नक्कीच होते. म्हणून वरील मुद्यांचा विचार करता सुसंकृतांचे माहित नाही. पण शोधले तर खूप लोक सापडतील ज्यांना वरील मुद्यांचा राग येतो.

>>सामान्यीकरण करून (काही लोकांच्या नावाखाली) झोडपणं चालू ठेवा.

चालायचंच. खरं बोललेले कोणाला आवडते म्हणा. असो, आपला आणि आपल्या विचाराचा आम्ही आदरच करतो. तेव्हा आपण आमच्याविषयी काय अपेक्षा घेऊन वावरता माहित नाही. पण, सत्य असलेल्या काही गोष्टी स्वीकारण्याची सवय माणसाने कोणत्याही वयात लावून घेतली पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

16 Sep 2009 - 2:53 pm | परिकथेतील राजकुमार

मुस्लीमांची प्रगती, मुस्लीमांना मिळणा-या सवलती, मुस्लीमांची अरेरावी, मुस्लीमांची संस्कृती, या आणि अशाच काही गोष्टीमुळे (काही)हिंदू माणसांना राग येतो.

किती % हिंदुना राग येतो ह्याचा काही विदा उपलब्ध आहे का ?

वरील वक्तव्य हे आपण स्वानुभवावरुन केले आहेत काय ? वरील वक्तव्याला काही आधार आहे का ? नसल्यास (काही) हिंदुचा त्यांना मुस्लीमद्वेष्टे ठरवुन करण्यात आलेल्या ह्या विनाकारण नालस्तीचा मी जाहीर निषेध करतो आणी 'योग्य' संपदकांनी ह्याची 'योग्य' दखल घ्यावी अशी विनंती करतो.

टाईपरायटर हृदयसम्राट
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2009 - 11:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती % हिंदुना राग येतो ह्याचा काही विदा उपलब्ध आहे का ?
नाही.
वरील वक्तव्य हे आपण स्वानुभवावरुन केले आहेत काय ?
हो....! मला वरील काही गोष्टींचा राग येतो.
वरील वक्तव्याला काही आधार आहे का ?
खूप आहेत. पण असे आधार कोणाला सांगावे, याला माझ्या काही मर्यादा आहेत.
हिंदुचा त्यांना मुस्लीमद्वेष्टे ठरवुन करण्यात आलेल्या ह्या विनाकारण नालस्तीचा मी जाहीर निषेध
आपणास काय निषेध व्यक्त करायचा तो करा. खरं म्हणजे सर्वच हिंदु असा विचार करतात असे म्हटले असते तर गोष्ट वेगळी होती. पण, असेही काही असण्याची शक्यता आहे. हे तुम्ही का नाकारत आहात ?

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

17 Sep 2009 - 12:49 am | टारझन

किती % हिंदुना राग येतो ह्याचा काही विदा उपलब्ध आहे का ?

काय रे परा ? % म्हंटलं की ७० .. हा आकडा कसा उभा राहिला नाही तुझ्या मनात ? कि 'कोदा'च्या 'विदा' वर तुला संशय आहे ?

असो ................. चालू द्या
बाकी बिरूटे साहेब ... तुम्ही अंमळ पंगाच घेताय की हो हिंदु जणांशी .. असल्या कमेंट्स टाकून ? ;)
नवा फब्लिकशिटी श्टंट ? हॅहॅहॅ .. पण तुम्हाला असल्या ष्टंट्स ची काय गरज ?

-( भांडणप्रेमी) टारोबा स्लेजर

परिकथेतील राजकुमार's picture

17 Sep 2009 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार

हो....! मला वरील काही गोष्टींचा राग येतो.

मगा अशावेळी 'काही हिंदुंना राग येतो' च्या ऐवजी 'एका हिंदुला राग येतो' असे म्हणावे.

खूप आहेत. पण असे आधार कोणाला सांगावे, याला माझ्या काही मर्यादा आहेत.
एखादा आधार सांगीतलात तरी पुष्कळ होईल. नाहितर उगीच तुम्ही म्हणताय म्हणुन आम्ही विश्वास का ठेवायचा ?

उद्या मी म्हणीन की बिरुटे प्रोफेसरच नाहीत. माझ्या ह्या म्हणण्याला खुप आधार पण आहे पण असे आधार कोणाला सांगावेत, याला माझ्या काही मर्यादा आहेत.

आपणास काय निषेध व्यक्त करायचा तो करा. खरं म्हणजे सर्वच हिंदु असा विचार करतात असे म्हटले असते तर गोष्ट वेगळी होती. पण, असेही काही असण्याची शक्यता आहे. हे तुम्ही का नाकारत आहात ?

तुम्ही फक्त स्वतःचे उदाहरण दिले आहेत. तुम्ही म्हणजे 'काही' हिंदु न्हवेत. आणी आता तुम्ही 'शक्यता आहे' हा शब्द वापरत आहात, कालपर्यंत तर तुम्ही असे काही हिंदु आहेतच ह्यावर ठाम होतात.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

गुंडोपंत's picture

17 Sep 2009 - 7:03 pm | गुंडोपंत

सर तुमचे म्हणणे बरोबर आहे.

या असल्या चवचाल सहिष्णुंनीच वाट लावली आहे आपल्या देशाची, शेळपट लोकांमुळे सगळ्यांनाच त्रास झाला आणि होतोय.

या देशाला बाटवणार्‍यांची कीड लागली ती आज पोखरून टाकते आहे. तरी डोळे उघडत नाहीत. आज फक्त बांग्लादेशात अत्याचार होतायेत ते उद्या मुस्लीम संख्या महाराष्ट्रात वाढल्यावर येथे होणार नाही असे नाहीच.

जालावर एक सर्च द्या हिंदु कन्व्हर्टीं टू मुस्लीम पहा किती निकाल मिळतात, अगदी यु ट्युबच्या व्हिडियो सकट!

आणि किती मुस्लीम कन्व्हर्टीं टू हिंदू असा सर्च द्या.
पाहा काय मिळते.

ख्रिश्चन आणि मुसलमान येणार जनतेला फसवून भुलवून बाटवून जाणार आपण शेळपटपणे 'राग येण्याची शक्यता आहे का' याचा विचार करत बसणार.

म्हणून मला सरांचे म्हणणे पटले, त्यांच्याशी सहमत आहे.

मगा अशावेळी 'काही हिंदुंना राग येतो' च्या ऐवजी 'एका हिंदुला राग येतो' असे म्हणावे.

नव्हे दोन म्हणा, जोवर गुंड्याभाऊ जीवंत आहे तोवर!
आणि हो सरांच्याच बरोबर आहे.

एखादा आधार सांगीतलात तरी पुष्कळ होईल. नाहितर उगीच तुम्ही म्हणताय म्हणुन आम्ही विश्वास का ठेवायचा ?

कशाला विश्वास ठेवायची गरज आहे ? नसलेलाच बरा.

तुम्ही फक्त स्वतःचे उदाहरण दिले आहेत. तुम्ही म्हणजे 'काही' हिंदु न्हवेत. आणी आता तुम्ही 'शक्यता आहे' हा शब्द वापरत आहात, कालपर्यंत तर तुम्ही असे काही हिंदु आहेतच ह्यावर ठाम होतात.

मी आहे ना हिंदु आणि त्या गोष्टीचे ठाम उदाहरण.

आपला
ठाम
गुंडोपंत तोगडीया

सहज's picture

16 Sep 2009 - 7:52 am | सहज

मिपाकरांसठी कै च्या कै प्रश्ण असलेले धागे वाचुन

Nile's picture

16 Sep 2009 - 7:58 am | Nile

असले फालतु, रटाळ कौल वाचुन आणि ते सुरु करणार्‍या लोकांचे आय डी पाहुन.

सचीन जी's picture

16 Sep 2009 - 1:30 pm | सचीन जी

>> हिन्दू माणसाला राग येइल अशी गोश्ट कोणती?

'गोष्ट' हा शब्द 'गोश्ट' असा लिहिल्याने कदाचित राग येइल बुवा!

अलिबाबा अन् ४० चोर!
या गोष्टीत एकाही हिंदुला स्थान नव्हते! म्हणून हिंदु माणसाला राग येत असावा!

मिसळभोक्ता's picture

16 Sep 2009 - 11:01 pm | मिसळभोक्ता

मर्जीना ही छुपी हिंदू होती, असे ३७व्या चोराचे म्हणणे आहे.

-- मिसळभोक्ता

विकास's picture

16 Sep 2009 - 11:50 pm | विकास

मर्जीना ही छुपी हिंदू होती, असे ३७व्या चोराचे म्हणणे आहे.

म्हणून तर म्हणतात ज्याची त्याची मर्जी!

सूहास's picture

16 Sep 2009 - 3:12 pm | सूहास (not verified)

अवांतर :
एकाच धर्माला "टारगेट" करून लेख पाडायचा टारगटपणा आता बास झाला. काहि सदस्यांनी देखील असल्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलेले पाहून आश्चर्य वाटले.सदर लेखकानी आपली प्रतिभा जरा सकस व चांगल्या साहित्यनिर्मितीवर वापरली तर अतिशय आनंद होईल.

प्रेषक : सुहास ( मंगळ, 09/15/2009 - 15:12) .
माझ्याच अवांतराशी सहमत आहे.

मी कुणालाही टारगेट केलेले नाही. उलट अभिनंदनच करत होतो.
खरे म्हणजे माझ्याच य्या खोडसाळ प्रतिक्रियेमुळे माझाच प्रतिसाद उडण्याची शक्यता आहे.... याची पाई-पाई भरपाई तुम्हाला करुन द्यावी लागेल.

चपटी .

बाळ्कोबा's picture

16 Sep 2009 - 4:15 pm | बाळ्कोबा

"मुसलमान माणसाला राग येइल अशी गोश्ट कोणती?" असा धागा काढला नाही की हिंदू ला राग येतो....
हिंदू माणसांच्या भावनांचा एवढा गांभीर्याने विचार करून धागे काढणार्यांची चेष्टा केली की हिंदू माणसाला राग येतो....हिंदूंच्या भावनांची इतकी काळजी आजकाल कितिसे लोकं करतात....

टारझन's picture

16 Sep 2009 - 11:29 pm | टारझन

काय पाणचट पणा चाल्लाय राव ...
आता ***पलिकडे काही करू शकत नाही :)
मालक काय ते पाहोत :)

-(*****) टारझन

Nile's picture

17 Sep 2009 - 12:19 am | Nile

'चपला अन चांदण्या सुटीवर गेल्या की काय?' असं विचारल्यावर काही हिंदुना राग येतो म्हणे! अन मग जिथे वाटप करायचे ते सोडुन इतर 'उडवा-उडवी' सुरु होते. :)

विकास's picture

17 Sep 2009 - 12:40 am | विकास

'चपला अन चांदण्या सुटीवर गेल्या की काय?' असं विचारल्यावर काही हिंदुना राग येतो म्हणे!

असा राग मिसळपावी धर्मियांना होतो. ;)

विकि's picture

17 Sep 2009 - 12:10 pm | विकि

मराठी हिंदु काय अथवा कोणत्याही माणसाला राग येईल अश्या गोष्टी -
तुमचे आडनाव काय? गाव काय?कोकणातले का तुम्ही?तुमची जात काय? मगच आम्ही मैत्रीचा विचार करू.

गुंडोपंत's picture

17 Sep 2009 - 9:47 pm | गुंडोपंत

खालील सर्व दुवे वाचून मला राग आला.

हे वाचा कविता होते नूर फातिमा.
http://www.muslimconverts.com/newmuslims/From_Kavita_to_Nur_Fatima.htm
आणि ही साईट ते अभिमानाने सांगते, मिरवते!

या शिवाय हे पाहा ब्राह्मण ते मुसलमान प्रवास

http://islam.thetruecall.com/modules.php?name=News&file=article&sid=150

१५ हिंदु एकावेळी मुसलमान करून घेतले असा झाकिर नाईकचा दावा.
हा घ्या व्हिडियो!
http://www.youtube.com/watch?v=oJYCfhcsrnY

हे पाहा Ten rules for converting educated Hindus
http://vikki76.sulekha.com/blog/post/2006/11/10-rules-to-convert-educate...

आणि चर्च चा थम्ब प्रोजेक्ट
Project-THUMB a major initiative taken up by evangelical groups with specific focus THUMB stands for (T)ribals ,(H)indus, (U)nattached/atheist/communist, (M)uslim, (B)uddhist
अधिक माहिती येथे http://www.crusadewatch.org/index.php?option=com_content&task=section&id...

काही राग येतोय? नाही ना?
छे!! कसा येणार? कारण आम्ही हिंदु सहिष्णु असतो ना?
आणि आपण अजून चर्चा करू ना...?

काय म्हणता?

आपला
रागीट
गुंडोपंत

शाहरुख's picture

17 Sep 2009 - 10:35 pm | शाहरुख

एखादा माणूस त्याचा हिंदू धर्म बदलून मुसलमान अथवा ख्रिस्ती झाला तर आपल्याला त्या माणसाचा राग येतो का त्याला तसे करण्याबद्दल आमिष दाखवणार्‍यांचा ?

पक्या's picture

17 Sep 2009 - 10:05 pm | पक्या

हिंदू ने मुस्लीमांवर राग व्यक्त केला की काही हिंदूंना राग येतो.