प्रेरणा - प्रभोच चुलीवरच तंदुरी चि़कन
गेल्या आठवड्यात मिपा-मिपा खेळताना प्रभोच चुलीवरच तंदुरी चि़कन पहात होते.
बाजुलाच बसलेल्या नवरोबांची नजर फोटोवर गेली आणि "अरे वा, छान दिसतय. कधी करायच. मी सगळी मदत करतो" अशी फरमाइश सुरु झाली.
याची मदत म्हणजे मला धडकिच भरते. स्वयंपाकघराला अगदि युद्धशाळेच रूप येत.
त्यामुळे 'अरे, हे चिकन किनै जंगलात चुलीवरच छान लागत. आपण पुढल्या कॅम्पिंग ट्रिपला नक्की करुया' वगैरे टाळम् टाळ करायचा मी दुबळा प्रयत्न केला.
पण थंडीला सुरवात होत असल्याने कॅम्पिंग आता ७-८ महिने तरी होणार नाहि आणि कुठल्या गडावर चढून चुलीवर चिकन करायला आम्हाला बहुदा
पुढचा जन्मच घ्यावा लागेल हे पक्क ठाऊक असल्याने नवरोबांनी चिकाटी काहि सोडली नाहि. शेवटी गनिमी काव्याने बच्चे कंपनीला आपल्या गोटात सामिल करून
घेतल्याने मला तह करावाच लागला. तहाच्या अटीनुसार नवरोबांनी आठवडाभर भांडी घासणे ( डिशवाशर लावणे) , केर काढणे ( वॅक्युम क्लिनर ) , कपडे धुणे ( वॉशर-ड्रायर लावणे ), पोरांचा अभ्यास घेणे इत्यादि किरकोळ अटी आणी स्वयंपाक्घरात पाय टाकायचा नाहि या मुख्य अटीवर मांडवली झाली.
नवर्याकडून आठवडाभर व्यवस्थीत काम करून घेऊन शुक्रवारी मायरमध्ये जाऊन मी कॉर्निश हेन ( छोट्या कोंबड्या ) घेऊन आले. त्यांना लिंबू, मीठ आणि हळदीने आंघोळ घातली. तंदुरी मसाला, बचकभर दही आणी आलं-लसूण पेस्ट लावून नवर्याचा अंत बघत फ्रिजमध्ये २४ तास मुरवत ठेवल्या. 'घरची मुर्गी दाल बराबर नाही' हे माहित
असल्याने गपचुप काम करत अजुन एक दिवस वाट पहाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.
दुसरे दिवशी सगळी काम नीट आटोपली गेली आहेत याची खात्री करुन मगच कोंबड्या बाहेर काढल्या. तेलाचा हलका स्प्रे मारला.
अव्हनला हाय वर गरम केल. कोंबडी ग्रील वर ठेवली. १५ मिनीटांनी उलट करून अजुन १५ मिनीट ठेवली. आतापर्यंत वासाने सगळ्यांच्या पोटात कावळे कोकलायला लागले होते. ३० मिनीटांनी गरमा गरम तंदुरी कोंबडी तयार!!
तर मंडळी पेश आहे ग्रील तंदुरी कोंबडी.
वाचने
14950
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय
काय
कोंबडी
कॉर्निश हेन
In reply to कोंबडी by विंजिनेर
..
दिपकशेठ,
In reply to .. by दिपक
हे एक्दम
In reply to .. by दिपक
गचकलो !
असेच
In reply to गचकलो ! by दशानन
मेलो .....
लवंगी काकू काय!!
In reply to मेलो ..... by अवलिया
सॉरी ...
In reply to लवंगी काकू काय!! by लवंगी
ह्म्म्म्म्
In reply to सॉरी ... by अवलिया
छान फोटु
मी सुध्दा ठार संपलो !
छान....
अगदि योग्य शंका
In reply to छान.... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद....
In reply to अगदि योग्य शंका by लवंगी
आईशपथ
खल्लास...
प्रकाटाआ
व्वा......!!अप्रतिम....
खल्लास
एकदम
ती श्रींची इच्छा
In reply to एकदम by श्रीयुत संतोष जोशी
गुड-वन
मस्त
मस्त कल्पना
In reply to मस्त by स्वाती२
धन्य आहेस
जवळच आहे
In reply to धन्य आहेस by प्राजु
छ्या...
लवंगीताईन
नवरोबांनी
तेच तेर गुपित आहे
In reply to नवरोबांनी by मुक्ता
बेश्ट...
कॉर्निश हेन म्हणजेच गेम हेन
In reply to बेश्ट... by एक
आभार
प्रेरणा: लवंगी
मस्त म्हणजे मस्त्च दिसतेय
In reply to प्रेरणा: लवंगी by स्वाती२
धन्यवाद.
In reply to मस्त म्हणजे मस्त्च दिसतेय by लवंगी
तोंडाला पाणी सुटलं...